एक्स्प्लोर
कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात 17 ऑगस्टला सुनावणी
मालेगावच्या बॉम्बस्फोटातील आरोप कर्नल पुरोहित यांना हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर 17 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असं सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं.

नवी दिल्ली : मालेगावातील 2008 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात 17 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या जामिनाविरोधात दाखल याचिकेवरही याच दिवशी सुनावणी होईल. मालेगावातील 2008 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला हायकोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला होता. सबळ पुराव्याअभावी हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी कर्नल प्रसाद पुरोहीत यांना मात्र जामीन देण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. काय आहे प्रकरण? मालेगावमध्ये एका दुचाकीमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते. या स्फोटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एटीएसने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 11 जणांना अटक केली होती. जानेवारी 2009 मध्ये एटीएसने सर्वजणांविरोधात मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. 2011 मध्ये मालेगाव स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. 2011 साली या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. 2014 साली सत्तांतर झालं. त्यानंतर एनआयएने दोन वर्षात नव्याने तपास करत, साध्वीसह सहा जणांविरोधात सबळ पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासह सर्व आरोपींवरील मोक्का हटवला
ब्रेस्ट कँसरच्या उपचारांसाठी साध्वी प्रज्ञासिंहची हायकोर्टाकडे जामिनाची मागणी
आणखी वाचा























