एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान
महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी राज्यात ऑपरेशन लोटस सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलंय. एप्रिल किंवा उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा, असं म्हणत ऑपरेशन लोटसवर देखील टीका केली.
जळगाव : एप्रिल किंवा उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलंय. तुम्हाला लोटलं तरी ऑपरेशन लोटस कसं? आव्हान स्वीकारणे आणि देणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाचं आव्हान स्वीकारलंय. 20 ते 25 वर्ष ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी नाही. तर ज्याच्या विरोधात लढलो त्यांनी विश्वास दाखविल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जळगाव येथील जाहीक कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार -
कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा उपाय नाही. कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव येथे दिले.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात पडताळणीबाबतचा निकाल 3 ते 4 दिवसात येण्याची शक्यता
सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिव्यावरुन सुप्रिया सुळेंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, शेतकरी हा आपल्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहील. प्रत्येक शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत म्हणून शासन कृतिशील कार्यक्रम तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच मुबलक पाणी हवे आहे, याची मला कल्पना आहे. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. भारताला संपन्न राष्ट्र बनवायचे असेल तर शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान द्यावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्राच्या सहकार्याची गरज - शरद पवार
शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवण्यासाठी केंद्राने राज्याला सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
Chandrakant Patil | राज्यातील सरकार फसवं, शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफीही फसवी : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement