Yavatmal News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) वचनपूर्ती सोहळा आज यवतमाळच्या (Yavatmal News) किन्ही मैदानात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न होतं आहे. मात्र या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी गोंधळ घातल्याची माहिती पुढे आली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी समाजाच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सऱ्यांचे लक्ष वेधलं. दिग्रस येथील ठाणेदार यांच्या बदलीच्या मागणीसाठी या महिला आक्रमक झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही काळ या कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या महिलांना बाहेर काढलं आणि त्यांची समजूत काढलीय. मात्र या कृत्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात लाडक्या बहीणींनी घातला गोंधळ
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थिती माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपन्न होतोय. यवतमाळच्या किन्ही मैदानात हा सोहळा पार पडतोय. महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम अंतर्गत लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सवांद साधला. यावेळी जवळपास 30 हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.
ठाणेदाराच्या बदलीच्या केली मागणी
मुख्यमंत्री येत असताना महिलांची डाव्या आणि उजव्या बाजूला संवाद साधण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी 300 फूट लांबी रॅम्प तयार करण्यात आला आहे. यावरूनच प्रमुखपाहुणे आणि मान्यवर मंचावर आले. मात्र या कार्यक्रमादरम्यान यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील काही महिलांनी एकच गोंधळ घालत घोषणाबाजी केलीय. दिग्रस येथील ठाणेदाराने एका प्रकरणात तक्रार देण्यासाठी आलेल्या अमोज प्रकाश चव्हाण याला बेदम मारहाण केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. परिणामी, मारहाण करणाऱ्या ठाणेदाराच्या बदलीच्या मागणी घेऊन या महिला आज आक्रमक झाल्या आहे. यावेळी त्यांनी आपली मागणी लावून धरत घोषणाबाजी केली आणि सऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
हे ही वाचा