Gadchiroli News गडचिरोली : गडचिरोलीच्या कुरखेडा येथून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. यात कुरखेडा तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात एका युवतीचे शव मृत स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज (24 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आली असून गडचिरोलीचे (Gadchiroli Crime) उपविभागीय पोलिस अधिकारी आणि कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन युवतीचे शव ताब्यात घेत, येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय.
दरम्यान, प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. तर मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टमनंतर स्पष्ट होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र प्राथमिक तपासणीत युतीच्या शरीरावर मार लागल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत. तसेच गळाही आवळलेला नाही. त्यामुळे पोस्टमार्टमनंतर नेमकं मृत्यूचे कारण स्पष्ट होणार.
मृत्यूमागील गूढ कायम
या प्रकरणातील मृतकच्या आईच्या म्हणण्यांनुसार, काल रात्री मृतक तरुणी 10 वाजताच्या दरम्यान घराबाहेर गेली होती. त्यानंतर ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत तीचा शोध घेतला असता सकाळी तिच्या मृत्यूची बातमी समोर आलीय. हे वृत्त कळताच मृतकाच्या आई ने एकच हंबरडा फोडला काही दिवसा पूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आई वर या घटनेने आकाशाएवढे संकट कोसळले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोलीत मूक निदर्शने
महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोलीत मूक निदर्शने करण्यात आलीय. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस -शिवसेना ठाकरे गट आणि रा. कॉ. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मूकनिदर्शनात सहभाग घेतलाय. स्थानिक गांधी चौकात कार्यकर्त्यांनी बदलापूर घटना आणि राज्य सरकारच्या निष्क्रिय भूमिकेचा काळ्या पट्ट्या लावून निषेध केलाय. राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळेच अशा घटनांना वाव मिळत असल्याची टीका काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांनी केलीय.
मुंबईत अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार
बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.
हे ही वाचा