मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण
गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती, त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झालेय.
CM Eknath Shinde And Raj Thackeray : मालेगावमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पोहचले आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.. यावर चर्चा होणार का? राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आज सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी पोहचले आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पहिली भेट नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि पाडवा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली होती. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत सात ते आठ वेळा भेट झाली आहे. गणपतीच्या निमित्तानेही यांची भेट झाली होती. तर कधी सदिच्छा भेट झाली होती. घर पाहण्यासाठीही राज ठाकरेंच्या घरी याआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पोहचले होते. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सहकुटुंब स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आमंत्रण स्विकारले असून ते आता राज ठाकरेंच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चेचा उधाण येणार आहे.
गतवर्षी दिवळीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. तेव्हाही अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. त्यामुळे ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
आणखी वाचा :
मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात; शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट