एक्स्प्लोर
तटकरेंवरील पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन, दमानियांचा आक्षेप
तटकरेंवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीला तीन दशकं पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं त्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या "समग्र" या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे तटकरेंवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अजित पवार, संजय राऊत, सुप्रीया सुळेंचीही उपस्थिती आहे. https://twitter.com/anjali_damania/status/916273969984163842 https://twitter.com/anjali_damania/status/916275253021638661 https://twitter.com/anjali_damania/status/916288015420542976 https://twitter.com/anjali_damania/status/916319794345005057
आणखी वाचा























