एक्स्प्लोर

शरद पवारांची दुष्काळाची मागणी म्हणजे राजकारणासाठी राजकारण : मुख्यमंत्री

राज्यात दुष्काळसदृश नाही तर दुष्काळच घोषित करावा अशी परिस्थिती आहे. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळसदृश शब्दावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यानी पलटवार केला आहे. शरद पवारांचा दुष्काळ म्हणजे राजकारणासाठी राजकारण असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

"तुमच्या काळात दुष्काळ शब्दच तुम्ही उडवून 'टंचाईसदृश्य' शब्द ठेवला होता. तुम्ही सत्तेत होते तेव्हा, 'दुष्काळ' शब्दच नव्हता. मात्र आम्ही दुष्काळ शब्द वाढवून 'दुष्काळसदृश्य' असे जाहीर केले आहे. तुम्ही दुष्काळ म्हणा, महादुष्काळ म्हणा, आम्ही उपयोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये", असा टोलाही मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

राज्यात दुष्काळसदृश नाही तर दुष्काळच घोषित करावा अशी परिस्थिती आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली.

तांत्रिकदृष्टया संपूर्ण दुष्काळ घोषित करता येत नाही, म्हणून दुष्काळसदृश अशी टर्म वापरात आल्याची चर्चा आहे. मात्र ही निव्वळ फसावफसवी असून संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनीही केली आहे. दरम्यान, 180 तालुक्यांमध्ये टँकर, चारा, वीज, शालेय सवलती देण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यामुळे आता त्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात होईल. 180 तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.

राज्यात सरासरीच्या केवळ 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दुष्काळसदृश भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीमही महाराष्ट्रात येईल. त्यानंतर मदतीचीही घोषणा केली जाईल.

राज्यात 'या' उपोययोजनांना सुरुवात 

- जमीन महसुलातून सूट

- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती

- कृषी पंपाच्या बिलामध्ये सूट

- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट

- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट

- पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना

- टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

संबंधित बातम्या 

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
Babanrao Taywade: ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा
ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Protest: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
DK Shivkumar : कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार? संभाव्य मंत्र्यांची यादी समोर 
कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार? संभाव्य मंत्र्यांची यादी समोर 
Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Embed widget