एक्स्प्लोर
Advertisement
12 एकर क्षेत्र, 200 कोटींची गुंतवणूक, जपानी ‘होरिबा’ नागपुरात
बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरात 12 एकर क्षेत्रात 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु होणाऱ्या या हा प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या एक हजार व्यक्तींना रोजगार मिळणार आहे.
नागपूर : जगभरातल्या अनेक देशांमध्ये जाळं निर्माण केलेल्या होरिबा या जपानी कंपनीने नागपुरातल्या बुटबोरी एमआयडीसीमध्ये प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. होरिबा कंपनी वैद्यकीय उपकरणे तयार करते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी होरिबा कंपनीच्या प्रकल्पाचं भूमीपूजन केलं. बुटबोरी एमआयडीसीच्या एकूण 12 एकर क्षेत्रात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
होरिबा या जपानी कंपनीच्या माध्यमातून भारतातील वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येईल. शिवाय होरिबानंतर इतर जपानी कंपन्याही महाराष्ट्रात आणि भारतात गुंतवणूक करुन त्यांचे उद्योग सुरु करतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरात 12 एकर क्षेत्रात 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु होणाऱ्या या हा प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या एक हजार व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. नागपूरच्या या प्रकल्पात होरिबा कंपनी मानवी रक्तातील पेशी तपासण्याचे यंत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या विशेष रसायनाचे उत्पादन करणार आहे. डिसेंबर 2019 पर्यंत हा प्रकल्प सुरु होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement