एक्स्प्लोर
नवी मुंबईतली अनधिकृत बांधकामं पाडण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तूर्तास दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली. पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. मुंढेंनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखावी, यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्यासह सर्वपक्षीयांनी येत्या सोमवारी बंदची हाक दिली होती.…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
नवी मुंबईत गावठाणांशेजारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी हातोडा चालवला होता. त्यांच्या याच कारवाईला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोध केला. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करु नये अशी मागणी म्हात्रे यांनी केली होती. पण मुंढे यांनी आपण गावाशेजारील घरांवर कारवाई करत असल्याचं स्पष्ट करुन कारवाई थांबवायला नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही बंदची घोषणा करण्यात आली होती. नवी मुंबईतील गावठाणांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर येत्या पावसाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा, आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला होता.संबंधित बातम्या :
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















