एक्स्प्लोर

सात जिल्ह्यातील तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा

7 जिल्हयातील तलाठी पदभरतीतील एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे.

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, 7 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरुन 7 जिल्हयातील सन 2019 तलाठी पदभरतीतील एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत कळवण्यात आले आहे.

2019 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या परवानगीने सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित 8 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच 8 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने 9 सप्टेंबर 2020 रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Jalgaon Crime News: ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget