एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या सभेत छावा संघटनेची घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी केली. पैठणमधील सभेत हा प्रकार घडला. मात्र घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं. तसेच पूर्णा-नांदेड महामार्गावरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको करण्यात आला होता.
नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी गंगापूर आणि पैठणमध्ये सभा घेऊन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पण पैठणमधील सभेवेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतलं आहे.
तर दुसरीकडे परभणी-नांदेड महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी पूर्णा नांदेड महामार्गावर हा रास्तारोको करण्यात आला. यावेळी जवळपास दोन तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement