एक्स्प्लोर
सांगलीतील चोर गणपतीची प्रतिष्ठापना, दीडशे वर्षांची परंपरा
सांगली : वाजत-गाजत आणि मिरवणूक काढत गणपतीचं आगमन आपण पाहिलं आहे. मात्र, सांगलीतील एका गणपतीची गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच प्रतिष्ठापना केली जाते. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या माध्यमातून चोर गणपती बसवण्यात येतो. या गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे.
गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र त्या अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही कळू न देता गणपतीची स्थापना होते. या प्रथेला 'चोर गणपती' म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो.
कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती
सांगलीमध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जाते. विशेष म्हणजे, या मूर्तीचे विसर्जन केलं जात नाही. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवून मूर्तीचे जतन केले जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement