एक्स्प्लोर

..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा

चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कोल्हापूर: अखिल भारतीय किसान सभेने चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी -चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची बनली आहे. यासाठी विविध आंदोलनं केली तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे किसान सभेने काल कागल इथं सुमारे 45 मिनिटं महामार्ग रोखून धरला. मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलै 2018 रोजी महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर, शेतकऱ्यां च्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा गेल्या 20 वर्षांपासून इथे पाणीप्रश्न भेडसावत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नदीवर चुकीच्या सर्वेक्षणाने चिकोत्रा नदीवर धरण बांधल्याने, हे धरण भरतच नाही, त्यामुळे धरणक्षेत्रातील 32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे. चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने 1996 मध्ये झुलपेवाडी (ता. आजरा) इथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. धरणासाठी चुकीचा सर्व्हे झाल्याने अधिकाऱ्यांनी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही उपाय सुचवले आहेत. नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य केल्यास, हा प्रश्न सुटेल, असं किसान सभेचे कागल तालुका अध्यक्ष संभाजी यादव यांनी सांगितलं. मोर्चाचे नेतृत्व अखिल भातीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. संभाजी यादव , कॉ. शिवाजीराव मगदूम, दयानंद पाटील नंद्याळकर यांनी केले. ..तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा, चिकोत्रा धरणग्रस्तांचा इशारा यावेळी संपूर्ण पुणे - बेंगलोर महामार्ग सेवा रस्त्यासह अडवला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी पाठबंधारे विभागाचे अधिकारी एस.एम. खतकल्ले आणि आर. आय. पाटील, तसेच प्रभारी तहसीलदार श्री गवळी यांनी आंदोलकांना चिकोत्राचे गळती काढण्याचे काम उद्यापासून तात्काळ हाती घेतले आहे, असे लेखी उत्तर दिले. त्याचबरोबर दिंडेवाडी - बारवे  या अर्धवट राहिलेल्या धरणाचे काम तात्काळ सुरु करणेबाबत कोणती ठोस कार्यवाही करणार याबाबतचे लेखी पत्र दिले. दिंडेवाडी - बारवे प्रकल्प पूर्ण  झाल्याशिवाय किसान सभेचा लढा चालूच राहिल, असा इशारा आंदोलकांनी दिला. संभाजी यादव म्हणाले, “या सरकारने 11 जून 2018 रोजीच्या लेखी आश्वासन न दिल्यास, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर 1 जुलै 2018 रोजी शेतकऱ्यांच्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढू” आंदोलकांच्या मागण्या काय? 1) हेळ्याचा देव येथून वाया जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 2) आरळगुंडी येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 3) भावेश्वरी मंदिर (दिंडेवाडी) परिसरामधून जाणारे पाणी  चिकोत्रा धरणात वळवा. 4) म्हातारीचे पठार व शिवारबा पठार येथून जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवा. 5) चिकोत्रा धरणाची गळती ताबडतोब काढा. 6) हिरण्यकेशी नदीकडे जाणारे अतिरिक्त पाणी कॅनॉल मधून चिकोत्रा धरणात वळवा. 7) पुनर्वसनासह दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण करा. 8) चिकोत्रा धरणाचे जलस्तोत्र बळकटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन मंडळातून ताबडतोब तरतूद करा.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget