एक्स्प्लोर

नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चर्चा, पदाधिकाऱ्यांकडून निष्ठेचं शपथपत्र

शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं शपथपत्रही भरून घेण्यात आलं. आता याबैठकीतला एक उद्धव ठाकरेंचा एक व्हीडिओ समोर आलाय.  ज्यात सर्व नाशिकचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या बाजूने घोषणा देत आहेत.

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर आज नाशिक आणि मालेगावच्या नगरसेवकांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मालेगाव शहर आणि नांदगावच्या आमदारांनी बंड केल्यानं नाशिकच्या शिवसेनेत फूट पडलीय. त्यामुळे पक्ष सावरण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर चर्चा केली. त्यांच्याकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं शपथपत्रही भरून घेण्यात आलं. आता याबैठकीतला एक उद्धव ठाकरेंचा एक व्हीडिओ समोर आलाय.  ज्यात सर्व नाशिकचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या बाजूने घोषणा देत आहेत.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते  म्हणाले, नाशिकची शिवसेना एकसंघ आहे. प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता खरं तर नाही मात्र कोर्टातली प्रक्रिया आहे म्हणून लिहून दिले आहे. आज मातोश्रीवर यायला मिळालं  याचा आनंद आहे. ज्यांना निवडून दिलं ते गेले मात्र ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते शिवसैनिक जागेवरच आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे यांची हीच खरी शिवसेना आहे असं प्रतिज्ञापत्रात आम्ही लिहून दिलं. शिवाय आम्ही उद्धव ठाकरे यांना आमच्या शहरासाठी वेळ मागितला आहे.


नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चर्चा, पदाधिकाऱ्यांकडून निष्ठेचं शपथपत्र

नाशिक शहर, मालेगाव, इगतपुरी, सिन्नर, मनमाड या ठिकाणच्या शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाशिकचे 32 नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले. 

ज्यात झालेल्या सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakaray) शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) काढली आहे.  शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील झाल्याने, त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील नेते आता सक्रीय होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेमुळे दुसऱ्या फळीला बळ मिळत असून, या यात्रेतील उत्साह त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.  ठिक-ठिकाणी शिवसंवाद यात्रेला होणारी गर्दी पाहता शिवसेना पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे. 

 

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget