एक्स्प्लोर

Cyclone Tauktae : मुख्यमंत्र्यांनी अमित शाहंना दिली तोक्ते चक्रीवादळासंदर्भातील तयारीची माहिती

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवणे, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी पूर्ण खबरदारी

मुंबई : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे  सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात  आला आहे. एकिकडे कोरोनाचं संकट असतानाच अशा परिस्थितीमध्येच वादळही धडकल्यामुळं रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी सावधगिरीचे निर्देश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी शाहंना दिली. 

Cyclone Tauktae Video : तोक्तेचा कहर; केरळमध्ये समुद्रकिनारी बंगला जमीनदोस्त 

सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन आणि वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना  विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली महत्त्वाची माहिती 

सागरी किनाऱ्याच्या अगदी जवळ डोलवीचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प आहे. येथील डबल फिडर विद्युत पुरवठा आणि मजबूत वायरिंग यामुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेतही नुकसान होणार नाही. तरी देखील महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सागरी किनाऱ्याजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( २३० मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स  ( १२० मेट्रिक टन), लिंडे तळोजा ( २४५ मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (१२० मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड ( १२० मेट्रिक टन), असे साधारणत: ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जामनगरहून १६० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा टँकर्सद्वारे उद्यापर्यंत पोहचत आहे. जामनगर येथेही १८ मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने जामनगर प्रकल्पात जर काही प्रश्न उद्भवल्यास डोलवी, मुरबाड,तळोजा आणि भिलाईहून राखीव साठा मागवता येईल. 

मच्छिमारही सतर्क... 

सागरी जिल्ह्यातील मच्छीमारांना यापूर्वीच चक्रीवादळासंदर्भात आगाऊ इशारा देण्यात आला असून ते सर्व बोटींसह किनाऱ्यांवर परतले आहेत. पालघरमधील काही मच्छिमार परतत आहेत.  किनाऱ्यांवरील कच्ची घरे रिकामी करण्यात आली आहेत. किनारी भागातील कुठलीही आरोग्य यंत्रणा कच्च्या घरात/ बांधकामात नाही हे पाहण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध असून, यात रेमडीसीव्हीर , फेवीपिरावीर, मिथाइल प्रेडनिसोलोन , डोक्सीसिलीन, पॅरासिटामोल, हेप्रीन , एम्फोटेरीसीन बी आणि चाचणी किट्स, पीपीई इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील हे पाहण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 May 2024Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊतTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget