एक्स्प्लोर

ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दु:ख, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले, अटलबिहारी वाजपेयींनींही इंदिरा गांधींना समर्थन दिलं होतं 

भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Devendra Fadnavis : भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावरही (Shivsena Thackeray group) टीका केली. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली आहे. याचं दु;ख असल्याचे फडणवीस म्हणाले. आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा देशावर झालेला हल्ला असेल अशावेळी विरोध करणे, मुर्खासारखी वक्तव्य करणं सुरु आहे, देशाची जनता त्यांना माफ करणार नाही असे फडणवीस म्हणाले. बांगलादेशच्या युद्धावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होते असेही फडणवीस म्हणाले. 

युद्धपरिस्थितीत देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही

दुश्मन ज्यावेळी आपल्या देशावर हल्ला करत आहे, त्यावेळी भारत देशातील सर्वच पक्षांनी कधी राजकारण केलं नाही हा देशाचा इतिहास असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेना ठाकरे गट देशाचा इतिहास विसरली याचे मला दु:ख असल्याचे फडणवीस म्हणाले. या देशाचा असा इतिहास आहे की, जेव्हा युद्धपरिस्थिती असते किंवा देशावर झालेला हल्ला असतो, त्यावेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशा  स्थितीत विरोध करणे  सुरु आहे, त्यांना देशाची जनता माफ करणार नाही.  

सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकारचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेमंडळी अधिक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर तातडीने सर्वपक्षीय बैठक घेत सर्व घटनाक्रमाची माहिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नेमक्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. 

पाकिस्तानच्या नागरिकांनी 48 तासात देश सोडावा

पाकिस्तानचे जे नागरिक भारतात आले आहेत, त्यांनी पुढच्या 48 तासात देस सोडावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल अन्यथा कारवाई असे फडणवीस म्हणाले. त्यांची लिस्ट काढली जात आहे, आम्ही माहिती घेत आहोत. पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्यावर भारतात राहू नये आम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवणार आहोत असे फडणवीस म्हणाले. पाकिस्तानी अॅक्टर आणि प्लेयर यांच्याबाबतीत आमच्या मनात कोणतीही सहानभूती नाही असे फडणवीस म्हणाले. 

राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. आतातरी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे फडणवीस म्हणाले. आता तरी राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल बोलताना विचार करतील असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Embed widget