एक्स्प्लोर

भुजबळांचा राजकीय आयुष्यात मागे वळून बघताना सगळ्यात सुखावणारा क्षण कोणता

Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली.

Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली. 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला आहे. मागील पाच दशकात देशातील आणि राज्यातील राजकारण आणि समाजकारण छगन भुजबळ यांनी खूप जवळून पाहिले आहे. ज्या  पक्षातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली, त्या शिवसेनाच्या सध्याच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे.  पण तीस वर्षांपूर्वी 1991साली शिवसेना नेतृत्वाला असेच आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं होतं. शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस या प्रवासात छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत. नगरसेवक ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं छगन भुजबळ यांनी भूषवली आहेत. छगन भुजबळ यांच्यातील राजकीय नेता घडवणारी शिवसेना सध्या सर्वात कठीण काळातून जात आहे. तर छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षासमोरही मोठी आव्हानं आहेत. या सर्वांविषय छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर उत्तरं दिली आहेत.

Q. 75 वर्ष पूर्ण झाले, यावर तुम्हाला विश्वास बसतोय का?

50 व्या वर्षी होतो, तसेच आताही वाटत आहे. खरं म्हणजे हे वाढदिवस वैगरे आपल्या हातात नसतात. आपण जरी येऊ नको अस म्हटलं तरी ते येतातच.प्रत्येकाच्या आयुष्यात न बोलवता वाढदिवस येतात. त्यासाठी काही करावं लागत नाही.

Q. मागे वळून पाहाताना, असा कोणता वाढदिवस होता का? ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होतात?

60 व्या वर्षी झालेला वाढदिवस शिवाजी पार्कवर झाला होता. त्यावेळी विलासराव देशमुख, शरद पवार यांच्यासारखे महाराष्ट्रातील नेते तर होतेच.  त्याशिवाय इतर राज्यातीलही नेते आले होते. त्यामध्ये लालू प्रसाद यादव, फारुख अब्दुला यांच्यासारखे नेते आणि लोकं आले होते. शिवाजी पार्क संपूर्ण भरलं होतं. वाढदिवसाची सभा शिवाजी पार्कवर फक्त छगन भुजबळ यांचीच झाली असेल. हा वाढदिवस कायम माझ्या आठवणीत राहिल.

Q. बाळासाहेब ‘लखोबा लोखंडे’ का म्हणायचे?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर भाषणामध्ये आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करु असी घोषणा केली होती. नेमकं मी गृहमंत्री झालो. त्यावेळी सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. अचानक गृहमंत्रालयाकडून एक फाईल आली, त्यामध्ये सर्व पोलिसांचे रिपोर्ट्स होते गुन्हा नोंदवायला हवा..आता मी केलं नाही तर लोकं म्हणणार श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही. सर्व केसेस संपवल्या होत्या, तर ही केस कशी राहिली. त्यांचेच सरकार असताना फाईल्स राहिली कशी...? त्यानंतर मी सही केली. बाळासाहेबांना अटक झाली. आयुक्तांना सांगितलं की, त्यांना तुरुंगात वैगरे घेऊन जाऊ नका, जामीन मागितला तर देऊन टाका.. असे सांगितलं होतं. जामीन नाही मिळाला तर काय करायच... तर मातोश्री हेच जेल आहे असे म्हणायचं अन् त्यांना तिथेच ठेवायचं. असं ठरवलं होतं. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला. काँग्रेस प्रवेशावर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला.

Q. 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागे वळून पाहाताना सर्वात सुखावलेलं काय वाटतेय? कशाचा खूप आनंद वाटतोय?

अनेक चांगल्या गोष्टी माझ्या हातून सुदैवानं घडल्या आहेत.  1985 साली मुंबईचा महापौर झाल्याची आठवण मला सातत्यान आठवते. अतिशय लोकप्रिय महापौर मुंबई आणि राज्यातही प्रसिद्ध झालो होतो. ट्रॅफिक अलर्ट, बॉम्बेचं मुंबई यासारखे निर्णय झाले.

Q. राजकीय आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत वाटते? शिवसेना सोडलेली की बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा घेतलेला निर्णय?

शिवसेना सोडण्यामागे काही कारणं होती. वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा 1985 विधानसभेत आमदार होतो. तर विधानपरिषदेवर मनोहर जोशी आमदार होते. मंडल आयोग जाहीर झालाच पाहिजे अशा आम्ही घोषणा करायचो. त्यावेळी व्हीपी सिंह यांनी मंडळ आयोगाची घोषणा केली. त्याला बाळासाहेबांचा विरोध सुरु झाला. त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आमच्यामध्ये विरोधाभास जाणवू लागला. पोटाला जात नसते, त्यामुळे जातीवरुन आरक्षण मिळता कामा नये, असे बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्याचवेळी मी भटक्या विमुक्त जातींचा मोर्चा निघाला होता, त्यांच्याबरोबर आरक्षण मिळावं म्हणून मी आंदोलनात होतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर भाषणामध्ये आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करु असी घोषणा केली होती. नेमकं मी गृहमंत्री झालो. त्यावेळी सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. अचानक गृहमंत्रालयाकडून एक फाईल आली, त्यामध्ये सर्व पोलिसांचे रिपोर्ट्स होते, गुन्हा नोंदवायला हवा..आता मी केलं नाही तर लोकं म्हणणार श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही. सर्व केसेस संपवल्या होत्या, तरीही केस कशी राहिली. त्यांचेच सरकार असताना फाईल्स राहिली कशी...? त्यानंतर मी सही केली. बाळासाहेबांना अटक झाली. आयुक्तांना सांगितलं की, त्यांना तुरुंगात वैगरे घेऊन जाऊ नका, जामीन मागितला तर देऊन टाका.. असे सांगितलं होतं. जामीन नाही मिळाला तर काय करायच... तर मातोश्री हेच जेल आहे असे म्हणायचं अन् त्यांना तिथेच ठेवायचं. असं ठरवलं होतं.  तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला. काँग्रेस प्रवेशावर बाळासाहेब ठाकरे यांनी  ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला.

Q. नथुराम यांच्याबद्दलची भूमिका? त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

त्यावेळीच मी माझी भूमिक स्पष्ट केली होती. माझ्या तोंडामध्ये चुकीचे शब्द टाकले गेले होते. नथुरामाचे पुतळे उभा करावे, असे मी म्हटलोच नव्हतो.

Q. बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा आणि माघार, नेमकं काय घडलं होतं?

डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेत माझं नाव 'सामना'मध्ये छापून आलं. मात्र मला न्यायालयाने निर्दोष सोडलं. त्यामुळे मी बाळासाहेबांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावेळी सामनामधील माझ्या अब्रुनुकसानीच्या अग्रलेख प्रकरणी बाळासाहेब यांना अटक होणार होती. मात्र मी कोर्टात जाऊन केस मागे घेतली. यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर परत कधीच टीका केली नाही आणि मी देखील केली नाही.

Q. शिवसेनेतून बंड कसा केला...?

त्यावेळी आम्ही 18 जण शिवसेनेतून बाहेर पडलो होते. 54 पैकी 18 जणांनी आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण 10 दिवसानंतर आमच्यामधील 6 जणांनी पुन्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुन्हा एक तृतांश आमदार बाहेर पडले होते. पुढच्या निवडणुकीत आमच्यातील दोन तीन निवडून आले. विधानसभेत अद्यापही रेकॉर्ड आहे. आम्हाला सोडलं नसते, त्यामुळे आम्ही बाहेरच होतो. आमचा शपथविधीच नागपूरला झाला. मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तेथून जो काचाचा पडल्या होत्या त्या माझगावच्या घरापर्यंत होत्या.बाहेरही कुठेही निघालो तर आडवे यायचे दगड वैगरे फेकायचे... काँग्रेसवाले काही वाचवायला येत नव्हते. हळू हलू पुढे गेलो... ती परिस्थिती शिवसेनेत जाऊ शकत होतात, पण बाहेर नाही....

Q. तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता?

शरद पवार आणि विलासराव देशमुख

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget