एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छबू नागरेची तीन बँक खाती सील
नाशिक : बनावट नोटा छपाईप्रकरणी अटकेत असलेल्या छबू नागरेची 3 बँक खाती सील करण्यात आली आहेत.
छबू नागरेचे विश्वास बँक, हैदराबाद बँक आणि स्वत:च्याच मायक्रो फायनान्स पतसंस्थेत खाते होते. ही तिन्ही बँक खाती सील केली आहेत. तसंच या खात्यांमधील साडे सात लाख रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलीस छबूच्या आणखी एका साथीदाराचाही शोध घेत आहेते.
राष्ट्रवादीचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या छबू नागरेला 1 कोटी 35 लाखाच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली होती. त्याच्यासह अकरा जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तसंच छबू नागरेसह 11 जणांना अटक केली. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं. फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर,1 स्कॅनर, आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्या.
1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत
बनावट नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी नागरे आपल्या अॅक्सेस मायक्रो फायनान्स पतसंस्थेचा वापर करायचा, असा संशय आहे. दरम्यान छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला दाखल होण्याची दाट शक्यता आहे. प्रकरण काय आहे? नाशिक पोलिसांनी गुरुवारी 22 डिसेंबरला मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली. संबंधित बातम्याबनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला?
नाशिक बनावट नोटा प्रकरण : 11 आरोपींच्या घरांची झडती
1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement