पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटनासाठी खुला
मागील साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र ताडोबात जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना कोविड विषयक काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.

चंद्रपूर : पुनश्च हरीओम म्हणत सरकारने अनेक गोष्टींवरील बंदी हळूहळू उठवली. यात चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्वच पर्यटन स्थळं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता तब्बल तीन महिन्यांनी पर्यटन स्थळं सुरु होत असल्याने व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
ताडोबा व्यवस्थापनाने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहेय. 15 एप्रिल 2021 पासून कोरोना दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात बंद आला होता. 4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटनासंबंधी गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जून पर्यंत कोअरभागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. थेट प्रवेशद्वारावर जाऊन पर्यंटकांना बुकिंग करावे लागणार आहे. 1 जुलै पासून नियमाप्रमाणे पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने असणार बंद मात्र बफर मध्ये 1 जुलै पासून पर्यटन सुरू राहण्याची शक्यता आहे. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांचा मोठा दबाव होता बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी नियमांसह स्वतंत्र आदेश काढणार आहे. मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले आहे तर कोविडसदृश्य लक्षणं आढळल्यास एखाद्या पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे.
ऐन हंगामात ताडोबा व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनावर आधारित हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झालं आहे. रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ आणि 151 बिबटे असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
