एक्स्प्लोर
नवविवाहित दाम्पत्याची लूट, फोटोंमध्ये आरोपीचा चेहरा कैद
![नवविवाहित दाम्पत्याची लूट, फोटोंमध्ये आरोपीचा चेहरा कैद Chandrapur Newly Married Couple Looted Accused Capture In Photo Latest Update नवविवाहित दाम्पत्याची लूट, फोटोंमध्ये आरोपीचा चेहरा कैद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/13193808/Chandrapur-Newly-married-loot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : चंद्रपुरात एका नवविवाहित दाम्पत्याला देशी कट्ट्याच्या धाकाने लुटल्याची घटना समोर आली आहे. जमनजट्टी भागातील शाह बाबा यांच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ भर दुपारी लुटीचा प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे लुटीपूर्वी दाम्पत्याने काढलेल्या फोटोंमध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला आहे.
चंद्रपूरच्या भिवापूर वॉर्ड परिसरात राहणारे गजेंद्र करकाडे हे आपली पत्नी, भाऊ आणि मेहुणी यांच्यासोबत दर्शनाला गेले होते. हा परिसर काहीसा निर्जन आणि शहरापासून लांब असल्यामुळे या परिसरात लोकांची विशेष वर्दळ नसते. याचाच फायदा घेत दर्गा परिसरात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना देशी कट्ट्याचा धाक दाखवत लुटलं.
दागिने आणि रोख रक्कम मिळून 50 हजारांचा ऐवज आरोपीने हिसकावून घेतला. मुख्य म्हणजे हे दाम्पत्य या परिसरात फिरत असताना काही फोटो काढत होते. त्या फोटोंमध्ये हा आरोपी कॅमेरात कैद झाला आहे. पोलीस या छायाचित्राच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)