
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील यंदाची चैत्री यात्रा रद्द
यात्रा काळात देवावर होणारे सर्व नित्योपचार आणि परंपरा पाळल्या जाणार असल्या तरी मंदिरं 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने एकही भाविकाला चैत्री यात्रेला येत येणार नाही.

पंढरपूर : राज्यभर कोरोनाची दुसऱ्या लाटेमुळे रोज हजारो नवीन रुग्ण बाधित होत असल्याने राज्यभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे . अशात पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने 23 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
यात्रा काळात देवावर होणारे सर्व नित्योपचार आणि परंपरा पाळल्या जाणार असल्या तरी मंदिरं 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने एकही भाविकाला चैत्री यात्रेला येत येणार नाही. यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून जगभरातील भाविकांना देवाचे 24 तास दर्शन घेता येणार असल्याने भाविकांनी बसूनच चैत्रीचा सोहळा साजरा करावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.
चैत्री एकादशी दिवशी होणारी विठूरायाची पूजाही अधिकाऱ्यांच्याच हस्ते होणार असून कोरोनामुळे मंदिर समिती सदस्यांनाही पाचारण केले जाणार नाही . कोरोनाचे राज्य सरकारने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करीत एकादशीचा कोर्टानं सोहळा देखील मंदिर कर्मचारीच करणार आहेत . पंढरपुरातील प्रमुख चार यात्रांपैकी चैत्री सोहळा असून या सोहळ्याला प्रामुख्याने मुंबई , कोकण , कोल्हापूर आणि कर्नाटक भागातील हजारो भाविक येत असतात .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
