एक्स्प्लोर

पीकविम्यातून 50 टक्के कर्जवसुलीचा निर्णय अखेर मागे

मुंबई : रब्बी हंगामाच्या पीकविमा रकमेतून 50 टक्के रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचे आदेश जिल्हा बँक आणि सहनिबंधकांना दिले होते. सहकार आयुक्तांच्या या आदेशानंतर विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर अखेर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. सरकारची अखेर माघार “पीकविम्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच्या सरकारमध्ये 100 टक्के पीकविमा कर्जाच्या रकमेत वर्ग केला जात होता. मात्र, आमच्या सरकारने केवळ 50 टक्के रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावरही विरोधकांनी राजकारण सुरु केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये म्हणून निर्णय मागे घेत आहोत.”, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. धनंजय मुंडेंचं सरकारवर टीकास्त्र “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सभागृहात होत असताना, पीकविम्याची 50 टक्के रक्कमच खात्यात वर्ग करण्याचं परिपत्रक काढलं गेलं. कामकाज करताना बँकेचं हित बघायचं आणि कर्जमाफीवेळी बँकेच्या दिवाळखोरीचं कारण पुढे करायचं, हे सरकारचं दुटप्पी धोरण आहे.”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवेळी केली. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांचा अधिकार : मुंडे “पीकविम्याची रक्कम सरकार कापू शकत नाही. कारण तो शेतकऱ्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आपली चूक झाकण्यासाठी विरोधकांकडे बोट दाखवायचा सरकारचा धंदा सुरु आहे.”, असेही धनंजय मुंडे म्हणाले. सहकार आयुक्तांनी पीकविम्याबाबत काय आदेश दिला होता? "यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्याचवेळी, बँकांची आर्थिक स्थिती कर्जाच्या वसुली अभावी कमकुवत होत आहे, ही बाब लक्षात घेता नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी बँकांकडून देय असलेल्या पीकविमा नुकसान भरपाईच्या रकमेमधून 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून देय पीक कर्ज वसुलीसाठी समायोजित करण्यात यावी.", असा आदेश सहकार आयुक्तांनी काढला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
Crime : दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
Team India : जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Suraj Chavan Rada | मारहाण प्रकरणी Suraj Chavan यांची दिलगिरी, गैरसमज दूर करणार
Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
Mumbai Rains | पुणे, Mumbai मध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले, चाकरमान्यांना त्रास
Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
Crime : दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
Team India : जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
Shivendraraje Bhosale on Chhava Sanghatna : छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा, म्हणाले, 'दादागिरी, जबरदस्ती चालणार नाही'
छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा, म्हणाले, 'दादागिरी, जबरदस्ती चालणार नाही'
डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
त्रिभाषासूत्रीचा प्रश्न संसदेतील अधिवेशनात; महाराष्ट्र शासनाने GR रद्द केल्यानंतर केंद्राकडून भूमिका स्पष्ट
त्रिभाषासूत्रीचा प्रश्न संसदेतील अधिवेशनात; महाराष्ट्र शासनाने GR रद्द केल्यानंतर केंद्राकडून भूमिका स्पष्ट
हाती चाकू घेतलेल्या सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली; अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण, गुन्हा दाखल
हाती चाकू घेतलेल्या सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली; अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण, गुन्हा दाखल
Embed widget