एक्स्प्लोर
बीडमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू
बीड : बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला हा अपघात झाला आहे.
आज रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसचा हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या बसवरचं ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं बस एका अवघड वळणावर रस्ता सोडून उलटली आणि 100 फुटांवर जाऊन थांबली.
दरम्यान अपघात झालेल्या बसचा ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता असं प्रवाशांनी सांगितलं आहे. अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement