Bullock Cart Race LIVE : राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी, वाचा प्रत्येक अपडेट्स

Bullock Cart Race : Bailgada Sharyat Latest Updates बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत महत्वाचा निर्णय झालाय. सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे

abp majha web team Last Updated: 16 Dec 2021 12:32 PM
पुणे विमानतळावर आमदार महेश लांडगे यांचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या लढ्याचे नेतृत्तव करणारे आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी नवी दिल्ली येथून पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यतप्रेमी यांनी जल्लोषात स्वागत केले.

बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे लवकर मागे घ्या-गोपीचंद पडळकर

न्यायालयाने बैलगाडी शर्यत सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता आता सरकारने बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे 8 दिवसांच्या आत मागे घ्यावेत, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.


 

हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय- नाना पटोले

सुप्रीम कोर्टाने बैलगाड़ी शर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेख नानांनी आवर्जून केला. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असंही नाना पटोले म्हणाले.


 

बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले...! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बैलगाडी शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजचे बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाची वैभवही सगळ्यांना पाहता येईल. 
शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केले आहे.  

शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी, बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा -  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

  मुंबई दि. 16 :- राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे.बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे  बैलगाडा प्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पुर्तता आज झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.


            मंत्री श्री.केदार म्हणाले, गेली 4 वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होती. शासनाने बैलगाडी शर्यत प्रेमींना आश्वस्त करुन, न्यायालयात शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजू मांडली. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा विषय होता या निर्णयामुळे ते आनंद व्यक्त करीत आहेत. बैलांवर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या निर्णयामुळे त्यांना अर्थिक हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            बैलगाड्या शर्यती बाबत  सर्वोच्च न्यायालयामध्ये आज  सुनावणी झाली.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ  मुकुल रोहतगी तसेच ॲड.सचिन पाटील यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय यांनी २०१४ मधील आदेशातील तरतुदीचा विचार करून  तसेच महाराष्ट्र राज्याने २०१७ साली बैलगाडा शर्यतबाबत केलेला कायदा व त्या अंतर्गत गठित नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यासाठी समान न्याय गृहीत धरून बैलगाडा शर्यतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून राज्य शासनाने बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत १९६० चा कायद्याला अनुसरून जी नियमावली केली आहे, त्या नियमावलीला अधीन राहून बैलगाडा शर्यती सुरू करण्यास परवानगी दिलेली असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

 बारामती तालुक्यात निर्णयाचे स्वागत करत आनंद साजरा
महाराष्ट्रात  बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  बारामती तालुक्यात  देखील या निर्णयाचे बैलगाडा  मालकांनी  मोठ्या उत्साहात  निर्णयाचे स्वागत करत आनंद साजरा केलाय.  
बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.


बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बैलगाडी शर्यतीना परवानगी मिळाल्याने शेतकरी आनंदी - भाजप आमदार रवींद्र चव्हाण 

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं .याबाबत बोलताना चव्हाण यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता बैलगाड्यांच्या शर्यती सुरू व्हावा असे शेतकऱ्यांना वाटत होत ,बैल गाड्या शर्यती सुरु करण्याची त्यांची मागणी होती. ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल किंवा राज्यातील इतर भागात देखील ही परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना निश्चितच आनंद झाल्याचं सांगितलं 

बैलगाडी शर्यत सुरू झाल्याचा आनंद - पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार


- बैलगाडी शर्यत सुरू झाल्याचा आनंद 


- चार वर्षानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाला



- सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातल्या लोकांना मोठा आसरा दिला.. 


- बैलगाडी शर्यत कुठे तरी स्टे झाला होता.. ती पुन्हा सुरू केल्यान शतशः समाधान आणि आनंद व्यक्त करतो.. 


- राज्य शासनातर्फे सर्व ऍडव्होकेट लोकांनी जिकरीने प्रयत्न केले.. त्यांचे कौतुक.. 


- चार वर्षानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला.. त्याबद्दल हर्ष, समाधान व्यक्त करत कौतुक करतो.. 


- अशाच प्रकारे लोंकांच जनकल्याणच, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्यास

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आता यश आलं- अजित पवार

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आता याला यश आलं आहे. यासाठी अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील यांनी प्रयत्न केले. यासाठी आम्हाला अनेकवेळा दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या. अनेकवेळा याच राजकारण झालं त्यांनी पोस्टर देखील लावले होते. निवडणूकित मतं मिळवण्यासाठी काहीजणांनी बैलगाडा शर्यत सुरू करू असे आश्वासन दिलं होतं.

बरीच वर्ष राज्यातील शेतकरी लढा देत होता- अजित पवार

बरीच वर्ष राज्यातील शेतकरी लढा देत होता. अनेक सरकारं आली आणि गेली. मात्र न्यायालयात विषय असल्यानं काही होऊ शकलं नाही. मात्र आता कोर्टानं परवानगी दिली आहे. ही आनंदाची बाब- अजित पवार

भंडारा उधळत, फटाके फोडत ठिकठिकाणी जल्लोष

बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी मिळाली, याचा आनंद पुणे जिल्ह्यातील बैलगाडा चालक-मालक आणि शौकिनांनी साजरा केला. भंडारा उधळत, फटाके फोडत ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय.

या निकालानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे

या निकालानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली


 

राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा

Bullock Cart Race : Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला. 

पार्श्वभूमी






Bullock Cart Race : Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहितगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला. 


बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. 


बैलगाडा शर्यती बाबत सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती सी टी रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली.  राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी आज युक्तिवाद केला.  बैल हा धावणारा प्राणी आहे की नाही याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालाद्वारे त्यांनी काही मुद्दे मांडले. यानंतर पेटा या संस्थेच्या वतीने  बैल हा धावू शकणारा प्राणी नाही, बैलाचे पोट मोठे आहे. त्यामुळे तो धावू शकत नाही असा पेटाचे वकील अॅड ग्रोव्हर यांनी युक्तिवाद केला.  


बैलगाडा शर्यतीवरील ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती.  


बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या. बैलांवरील अमानुष अत्याचार थांबावेत म्हणून अशा शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी प्राणी मित्र करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'








 






- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.