Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर

Continues below advertisement

Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई: मान्सूनचा हंगाम सुरु झाल्यापासून मुंबईत हवा तसा किंवा मुसळधार पाऊस नसल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, रविवारी रात्रीपासून मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली लावली आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत (Mumbai Rain) आणि लगतच्या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाची संततधार लागून राहिल्याने एकीकडे मुंबईकर सुखावले असले तरी त्यासोबत येणाऱ्या विघ्नांचा सामनाही आता शहरवासियांना करावा लागणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर  परिरसरात काल रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने अनेक सखल भागांमध्ये नेहमीच्या परंपरेप्रमाणे पाणी साचले आहे. (Water Logging in Mumbai)

दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram