एक्स्प्लोर

पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अजित पवार म्हणाले...

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुणे :  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी

शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. आज होणारी बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने आढळराव पाटील यांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी आढळरावांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात संघर्ष पाहायला मिळात आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात आज बैलगाडा शर्यती होणार होत्या. मात्र, ऐनवेळेस या शर्यती रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय.  मात्र, शिवसेनेचे  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सने हा निर्णय घेतल्याची आठवण करून दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन व बैलगाडामालक व बैलगाडाप्रेमी यांच्या भावनांचा आदर ठेवत 1 जानेवारी 2022 रोजी होणारी बैलगाडा शर्यत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत.

आढळराव पाटलांचे ठिय्या आंदोलन
बैलगाडा शर्यत अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी मी भरविलेली बैलगाडा शर्यत हणून पाडली. ही मोठी शर्यत होईल आणि माझं नाव मोठं होईल म्हणून ही खेळी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अचानक शर्यत रद्द झाल्याने बैलगाडा मालक-चालक, शौकीन नाराजी व्यक्त करतायेत. जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी काल सायंकाळी सहा वाजता अहवाल मागवला. तेव्हा त्यांनी शर्यतीला संमती दिली आणि रात्री उशिरा अचानक शर्यतीला स्थगिती दिली. यावेळी पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

16 डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Embed widget