बुलढाणा : शाहजहान व मुमताज ची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहेत. मुमताजसाठी शाहजहान ने ताजमहाल बांधला. पण आजच्या युगातील शाहजहानने आपल्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी चक्क ताजमहलसारखं दिसणारं घरच बनवलं आहे. शिक्षकी पेशात असणाऱ्या या आजच्या शाहजहानने हुबेहूब ताजमहल सारखं दिसणारं घर आपल्या पत्नीला गिफ्ट दिल आहे.


बुऱ्हाणपूर येथील पेशाने शिक्षक असलेले आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांची पत्नी मंजूषासाठी हे घर बाधलंय. आनंद प्रकाश चौकसे अस या शिक्षकाचं नाव असून आपली पत्नी मंजुषा चौकसे हिला हे घर भेट दिल आहे. या हुबेहूब ताजमहल सारख्या घराला चारमिनार, चार बेडरूम्स, एक किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम असून हे घर बांधायला अनेक राज्यातील कारागिरांची मदत घेण्यात आली आहे. हे घर बांधायला आनंदप्रकाश यांना तीन वर्षे लागली आहेत. आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी आनंद प्रकाश यांनी हे घर बांधलं आहे. आता या घराची चर्चा देश-विदेशात होत आहे. आनंदप्रकाश हे शिक्षक असून त्यांचं मॅक्रो व्हिजन अकॅडमी नावाने बुऱ्हाणपूर येथे फाईव्ह स्टार निवासी विद्यालय आहे. ते स्वतःला सध्याही शिक्षकच म्हणवून घेतात.


हे घर बांधल्यामुळे आता प्रि-वेडिंग शूटसाठी व लग्न झालेले जोडपे इथं फोटो काढण्यासाठी तसेच अनेक पर्यटक घर बघण्यासाठी येत आहेत. बाहेरून ताजमहल सारख जरी हे घर दिसत असेल तरी आतून मात्र आलिशान व सर्व सोयीयुक्त हे घर आहे.


मुमताजचा मृत्यू हा बुऱ्हाणपूर या शहरात झाला होता. मृत्यूपूर्वी शाहजहानने मुमताजला वचन दिल होत की तुझ्यासाठी मी ताजमहल बांधणार. पण ताजमहलचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच बऱ्हाणपूर शहरात मुमताजचा मृत्यू झाला. त्यावेळी बांधकाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे सहा महिने मुमताजचा मृतदेह हा बुऱ्हाणपूर येथे एका वास्तूत ठेवला होता. त्या वास्तूला आजही काला ताजमहल म्हणून ओळखला जात. तापी नदीच्या काठावर असलेल्या बुऱ्हाणपूर शहरात ताजमहल बांधण्याचं शहाजहानने ठरवलं होत. पण राजस्थान मधून मार्बल आणण्यासाठी अडचण येणार म्हणून त्यांनी आग्रा शहराची निवड केली. ताजमहल बांधून पूर्ण झाल्यावर मुमताजचा मृतदेह आग्रा येथे नेऊन ताजमहलमध्ये दफन करण्यात आला.


चौकसे कुटुंबाला आजही अनेक लोक ताजमहल  सारखं घर बांधल्याने सांगतात की ताजमहल तर एक कब्र आहे. पण त्याकडे चौकसे दुर्लक्ष करून आपण फक्त ही एक वास्तू म्हणून याकडे पाहत असल्याचं सांगतात. 


महत्त्वाच्या बातम्या :