दिल्ली : कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. अनलॉक-4 च्या नियमानुसार तब्बल 188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला झाला आहे. यादरम्यान पर्यटकांना मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असणार आहे.


17 मार्चपासून ताजमहाल आणि आग्रा येथील किल्ला बंद होता. 188 दिवसानंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र गाईलाईननुसार एका दिवशी ताजमहालमध्ये पाच हजार आणि आग्र्याच्या किल्ल्यात 2500 पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. दोन्ही ऐतिहासिक स्थळावर तिकिट काउंटर बंद असणार आहे.


ऑनलाईन तिकिट सेवा


पर्यटकांना एएसआयच्या वेबसाईटवरून तिकिट बुक करावे लागणार आहे. तिकिटावरील क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी म्हणाले, नविन गाईडलाईनुसार शाहजहान आणि मुमताजच्या मुख्य कबरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकावेळी फक्त पाच पर्यटकांना जाण्याची मुभा आहे. संग्रहालय देखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटकांना पार्किंगसह सर्व तिकिट ऑनलाईन बुक करावी लागणार आहे.


मास्क अनिवार्य 


पर्यटकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. त्याचबरोबर मास्क लावणे अनिवार्य आहे. शू कवर, पाण्याची बॉटल, टिश्यू पेपर आदी पर्यटकांनी कचरापेटीत टाकावे. स्मारकात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे. लक्षणविरहीत पर्यटकांना परिसरात प्रवेश मिळणार आहे. स्मारकात ग्रुप फोटो काढण्यास मनाई आहे.


ज्या गाईडकडे अधिकृत लायसन्स आहे फक्त त्या गाइडना स्मारकात प्रवेश मिळणार आहे. हस्तशिल्प एंपोरियम 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे.


बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून 50 टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत.


संबंधित बातम्या :



Unlock 4 | देशात आजपासून 'या' 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू; महाराष्ट्रात कधी सुरू होणार शाळा?