Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर शहरापासून जवळच असलेल्या खामखेड शिवारातील एका सर्जिकल कॉटन युनिटला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक लागलेल्या या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळातच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. कालांतराने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, तोपर्यंत या आगीत कोट्यावधी रुपयांचे साहित्य जळून खाक झालं होतं.
आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान
बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) खामखेड शिवारात असलेल्या या सर्जिकल कॉटन युनिटमध्ये जवळपास 15 ते 20 मजूर काम करतात. या ठिकाणी वैद्यकीय वापरासाठी लागणारा कापूस तयार करून वैद्यकीय यंत्रणाना पुरविण्याचे काम केल्या जात होते. दरम्यान, युनिटमध्ये मजूर काम करत असताना अचानक आग लागली. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे मजूर बाहेर आले आणि या आगीची माहिती त्यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस (Buldhana Police) करत आहे.
मिरवणुकीत हातात तलवार घेऊन नाचणे पडले महागात
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे शिवजयंती मिरवणुकी दरम्यान हातात तलवार घेऊन दहशत पसरवत नाचणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. देशभरात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली असून जिल्हाभरात शस्त्र बंदी लागू करण्यात आली आहे. असं असताना हा युवक शिवजयंतीच्या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन नाचत होता. दरम्यान, पोलिसांनी याची दखल घेऊन तात्काळ या तरुणाविरुद्ध कारवाई केली. यात जळगाव जामोद पोलिसांनी शस्त्र बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी तरुण अद्यापही फरार असून पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या