Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असून जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षानी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यातील सर्व प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अवैध वस्तु आणि पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी वाशिम जिल्हा (Washim) प्रशासनाने जिल्ह्याच्या 12 सीमा भागावर चेकपोस्ट उभारण्यात आली असून यात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, वाशिम –यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर एका स्विफ्ट कार मधून एक लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम या पथकाने जप्त केली आहे.
कारमध्ये सापडली 1 लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम
नियमानुसार 50 हजार पेक्षा अधिक रक्कम निवडणुकीच्या काळात बाळगणे हा गुन्हा समजला जातो. जर 50 हजार पेक्षा अधिक रक्कम असेल तर त्या बद्दलची माहिती प्रशानाला कळवणे गरजेच असते. मात्र असा नियम असतानाही एका सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या कारमध्ये 1 लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम बाळगली. चौकशी दरम्यान हि रक्कम जमीन खरेदी व्यवहाराकरिता बँकेतून काढण्यात आल्याची माहिती कारचाकाने दिली. त्यानंतर जप्त केलेल्या रक्कमेची विड्रॉल डॉक्युमेंट आणि जमिनी खरेदी व्यवहाराचे डॉक्युमेंट पाहिल्यानंतर पुढील कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे सोपविण्यात आलीय. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.
देशी दारुने भरलेल्या 15 पेट्या केल्या जप्त
छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर आपली गस्त वाढवली आहे. दरम्यान, आमगाव ते देवरी मार्गावर 2 ईसम चारचाकी वाहनात अवैद्यरित्या देशी दारू भरून वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये देशी दारूनी भरलेले एकूण 15 खरड्याचे बाक्समध्ये 480 नग बॉटल आढळून आल्या.
प्राथमिक माहितीनुसार यामध्ये 180 मिली देशी दारू भरलेले असून उर्वरीत 5 बाक्स मध्ये 500 नग देशी दारू 90 मिलीने भरलेल्या आढळून आल्या ज्याची एकूण किंमती 51,100 रुपये इतकी आहे. या मालासह पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड किंमती अंदाजे 1,55,000 रुपये असा एकूण 2,06,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या