एक्स्प्लोर

'त्या' माणसांमुळे मी खामगाव सोडतोय, चिठ्ठी लिहून शंकर महाराज बेपत्ता

शंकर महाराज बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली असून, अनुयायांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथून जवळच असलेल्या शेलोडी इथल्या जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. काही जणांच्या त्रासामुळे आपण निघून जात असून शोध घेण्याचा प्रयत्न करु नये, असं महाजारांनी एका पत्रात लिहून ठेवलं. भक्तांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प.पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरुन काही जणांकडून त्यांना हेतूपुरस्सरपणे त्रास दिला जात होता. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचं शंकर महाजारांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. त्या' माणसांमुळे मी खामगाव सोडतोय, चिठ्ठी लिहून शंकर महाराज बेपत्ता 'जागृती'मधील वाद विकापोला जात असल्याचं निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात 'तपोवन'ची निर्मिती केली. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते. परंतु, या वादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी 'तपोवन' सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली आहे. यासंदर्भात जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो दिला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात 'तपोवन' इथे बैठक सुरु होती. अखेर महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. शंकर महाराज बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली असून, अनुयायांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच 'तपोवन' इथे दाखल झाले असून, महाराज सुखरुप परत यावेत, यासाठी हनुमान चालिसा पठण आणि सामूहिक प्रार्थना केली जात आहे. खामगाव आणि परिसरात या अध्यात्मिक गुरुंचा बराच मोठा भक्त परिवार आहे. महाराज अज्ञात स्थळी निघून गेल्याने भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय महाराज मोबाईलचा वापर करत नसल्याने त्यांना शोधण्यास अडचणी येत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 
रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget