Breaking News LIVE : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचं लॉर्ड्स कसोटीत शतक साजरं!

Breaking News LIVE Updates, 12 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Aug 2021 11:03 PM
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचं लॉर्ड्स कसोटीत शतक साजरं!

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचं लॉर्ड्स कसोटीत शतक साजरं!
राहुलच्या शतकाला नऊ चौकार आणि एका षटकाराचा साजरा.

शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय

शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात. शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून घेतला निर्णय. कोविड काळात एखाद्या विद्यार्थ्याने फी भरली नाही तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. ज्यांनी यावर्षीची फी पूर्णपणे भरली आहे, त्यातील 15 टक्के फी पुढील फिमध्ये समाविष्ट करावी किंवा पालकांना ती परत करावी. शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. 15 टक्के फी कपात करण्यासाठी अनेक मंत्र्यानी मंत्रीमंडळ बैठकीत विरोध केल्याची सूत्रांची माहिती. त्यामुळे अनेक कॅबिनेटमध्ये हा निर्णय प्रलंबित होता. अखेर आज शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय  काढून घेतला निर्णय.

बदलीसाठी शरद पवारांचा आवाज काढत सचिवांना फोन

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आवाज काढत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना फोन आला.  अनोळखी व्यक्तीने बदलीसाठी शरद पवार यांचा आवाज काढत आशिष कुमार सिंह यांना  फोन केला. गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

खासदार शरद पवार आणि संजय राऊत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंच्या भेटीला

Breaking News LIVE : खासदार शरद पवार आणि संजय राऊत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंच्या भेटीला
 https://marathi.abplive.com/news/maharashtra/breakingn-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-12-2021-maharashtra-political-news-school-reopen-news-corona-alert-998453

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेवर हायकोर्ट समाधानी

मुंबई महापालिकेची घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहिम योग्य दिशेनं - हायकोर्ट,


ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेवर हायकोर्ट समाधानी,


घरोघरी लसीकरण मोहीमेतंर्गत अंथरुणांवर खिळलेल्या नोंदणीकृत एक चतुर्थांश जेष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण,


30 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान 4889 पैकी 1317 नागरिकांना लसी देण्यात आल्याची पालिकेकडनं हायकोर्टात माहिती,

राज्यात 17 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर

राज्यात 17 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर

मुंबईत आज आणि उद्या सरकारी केंद्रावर लसीकरण ठप्प

मुंबईत आज आणि उद्या सरकारी केंद्रावर लसीकरण ठप्प, लोकल पाससाठी दोन डोसची अट असताना लसीकरणाला ब्रेक लागल्यानं नाराजी

...तर मंगळवारी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार : भाजपचे आमदार राम कदम यांचा राज्य सरकारला इशारा

भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भुमीका घेतलीय... सरकारने मंदिरांबाबात निर्णय घेतला नाही, तर मंगळवारी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचा इसारा आमदार राम कदम यांनी दिलाय. यावेळी दर्शनासाठी मंदिरातील कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन करत दर्शन घेणार असल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.

शिर्डी : राज्यातील मंदिरांबाबत भाजप पुन्हा आक्रमक

महाराष्ट्र अता पुन्हा अनलॉकच्या दिशेने जात आहे. राज्यात हॉटेल, बार रेस्टोरेंट रात्री 10 वाजेपर्यत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील मंदिरांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. या विरोधात अता भाजप पुन्हा आक्रमक झालं आहे. शिर्डी मधील साई मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने साई मंदिराला साकडं घालण्याचं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. हे आंदोलन टप्याटप्याने तीव्र करण्यात येणार आहे. 

20 ऑगस्टला देशातले विरोधी पक्षांचे नेते पुन्हा एकवटणार, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. त्यात 20 ऑगस्टला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखिल उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. पेगॅसस आणि कृषी कायद्याविरोधात काँग्रेससह अन्य पक्ष आक्रमक पवित्रा घेणार आहेत.

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल, नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणं, जातीवाचक शिवीगाळ करणं आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्यानं आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याची तक्राप पत्नीनं केली आहे. 

पार्श्वभूमी

FYJC Admission : अकरावी CET रद्द, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत


मुंबई उच्च न्यायालयानं अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली. पण त्यामुळे आता अकरावी प्रवेशप्रक्रियेवेळी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. अंतर्गत मुल्यमापनद्वारे जे गुण विद्यार्थ्यांना दहावीत मिळाले आहेत. त्या गुणांच्या आधारे आता अकरावीत प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षी दहावीच्या ऐतिहासिक निकालामुळे आलेला गुणांचा फुगवटा आणि 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवतांची संख्या पाहता नामांकित कॉलेजमध्ये 95 टक्के गुणसुद्धा कमी पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


अकरावी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयानं सुनावला आणि पुन्हा नामांकित कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश घ्यायचं विद्यार्थ्यांचं टेन्शन काही प्रमाणात का होईना आणखी वाढलं. त्याचं मूळ कारण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झालेला दहावीचा निकाल आणि त्यात मिळालेले भरघोस नव्वदीच्या पार गुण. त्यामुळे तुम्हला 90 टक्के पेक्षा जास्त गुण जरी मिळाले असतील तरी तुम्हाला नामांकित कॉलेज मिळेल याची शाश्वती नाही. याचं कारण नव्वदी पार गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.


Drugs Case : सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला कोर्टाचा दणका, पुन्हा एकदा जामीन फेटाळला


दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा कोर्टानं फेटाळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ पिठाणीचा जामीन अर्ज एनडीपीएस कोर्टात दाखल करण्यात आला होता. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला. 


नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, म्हणजेच एनसीबी (NCB)चे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी यासंदर्भात आणखी माहिती देताना सांगितलं की, सिद्धार्थच्या जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला असून तो जामिनासाठी पात्र नव्हता. दरम्यान, यापूर्वीबी सिद्धार्थ पिठाणीनं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, सिद्धार्थला त्याच्या लग्नासाठी 25 जून रोजी कोठडीतून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सिद्धार्थने 2 जुलै रोजी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो एनसीबीच्या ताब्यात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.