Breaking News LIVE : चंद्रपूरमध्ये 25 वर्षीय मुलाचा 20 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला

Breaking News LIVE Updates, 9 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Sep 2021 09:53 PM
चंद्रपूरमध्ये 25 वर्षीय मुलाचा 20 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला

चंद्रपूरमध्ये 25 वर्षीय मुलाचा 20 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला. रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय. चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर ही घटना घडलीय. युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती.

कर परतावा भरण्याची मुदत केंद्र सरकारने 31 डिसेंबर पर्यंत वाढवली

कर परतावा भरण्याची मुदत केंद्र सरकारने पुन्हा वाढवली असून  थेट 31 डिसेंबर ही कर परतावा भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. दर वर्षी 31 जुलै ही अंतिम मुदत असते, कोरोनामुळे ती 30सप्टेंबर करण्यात आली होती. नव्या वेब पोर्टलमध्ये येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आणखी मुदत वाढविण्यात आली आहे. 

पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी

पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.  DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन कारवाई करण्यात आली आहे.

मराठवाडा विभागातल्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीसाठी 200 कोटींचा निधी


मराठवाडा मुक्ति दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय... निजाम काळातल्या मराठवाडा विभागातल्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या पुनर्बांधणी आणि दुरुस्ती साठी 200 कोटींचा रुपयांचा निधी दिला आहे.  मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या शाळांना याचा लाभ होणार आहे.  मराठवाड्यातल्या 718 शाळातल्या 1623 वर्गखोल्यांचे साठी राज्य सरकार दोनशे कोटी रुपये खर्च करणार याशिवाय मराठवाड्यातल्या 1050 शाळा दुरुस्त केल्या जाणार आहे. 

समृद्धी महामार्गच काम करणाऱ्या मोंटो कार्लो कंपनीला औरंगाबाद खंडपीठाने जोरदार दणका

जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गच काम करणाऱ्या मोंटो कार्लो कंपनीला औरंगाबाद खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे,  प्रशासनाने लावलेला 327 कोटी 62 लाखांच्या दंड वसुलीला कोर्टाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या महामार्गाचे काम करताना जालना जिल्ह्यातून या कंपनीने 3.71 लाखांचे अवैध मुरूम उत्खनन  केले होते तर  बदनापूर तालुक्यता सुद्धा  3.35 लाखांचे अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात आले होते,  या दोन्ही प्रकरणात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करण्यात आलं होतं याप्रकरणात जालना तहसीलदार यांनी164 कोटी 62 लाख तर बदनापूर तहसीलदार यांनी 163 कोटी इतका दंड लावला होता या विरोधात कंपनी हाय कोर्टात गेली होती. हाय कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने प्रशासनाने लावलेला दंड योग्य असल्याचं सांगत कंपनी ची याचिका फेटाळली आहे...त्यामुळं आता या कंपनीला अवैध उत्खनन प्रकरणी दंड भरावा लागणार आहे, राज्यभरात समृद्धी महामार्गाच्या कामात अवैध उत्खनन झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत मात्र पहिल्याच वेळेस असा दंड लावण्यात आला आणि कोर्टाने सुद्धा तो योग्य ठरवलं आहे

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालयासमोर गोंधळ

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटलांच्या कार्यालयासमोर गोंधळ झाला. आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर काळी शाई फेकली. याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगेसह काही महिलांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. शेडगे यांच्या प्रभागातील दापोडी परिसरात पालिकेकडून खोदकाम सुरू आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नगरसेविका शेडगे महिलांना घेऊन आयुक्त कार्यालयासमोर पोहचल्या. यावेळी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा त्यांचा हेतू होता, पण ती शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. मग या महिलांनी आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर शाई फेकली. त्यामुळे पालिका इमारतीत गोंधळ उडाला. मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी भाजा नगरसेविका शेडगे सह काही महिलांना ताब्यात घेतलं.

शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये  जोरदार सशस्त्र राडा

साताऱ्यात दोन राजे समर्थकांमध्ये रात्री राडा झाला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खा. उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये  जोरदार सशस्त्र राडा झाला.  या प्रकरणी आ.शिवेंद्रराजे भोसले समर्थक नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.  या राड्यात ५ जण जखमी झाले आहेत. बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी भोसले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बाळू खंदारे याच्या आॕफिस समोर गाडी लावण्यावरून हा राडा झाल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहाजण दोषमुक्त, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहाजण दोषमुक्त, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय, अंजली दमानिया हायकोर्टात धाव घेणार 

महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर


22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत, 4 ऑक्‍टोबरला निवडणूक


काँग्रेस राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला पाठवणार? 


मुकुल वासनिक यांची मागच्या वेळी हुकलेली संधी परत मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेह-याचाच विचार होणार


राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतंच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमलं आहे

नाशिकच्या फुल बाजारात मंदी

हरतालिका आणि गणेशोत्सव जवळ येताच नाशिकच्या फुलबाजार आणि भद्रकाली परिसरात फुलं आणि पुजेचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळते. मात्र यंदा पावसाचा फटका फुलांच्या विक्री व्यवसायाला बसत असून आज पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे फुल बाजारात ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून येते आहे

ट्रेकर्सच्या प्रसंगावधानामुळं रेल्वेचा अपघात टळला

दूधसागर येथे ट्रेकिंग करण्यास गेलेल्या बंगलोरच्या तरुण ट्रेकरसच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा अपघात टळला. दूधसागर धबधब्यापासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे मार्गावर एक झाड कोसळून आडवे पडले होते. बंगलोरच्या कौशिक, प्रज्वल, मनीषा, प्रीतीश आणि विनोद या ट्रेकर्सनी रेल्वे ट्रॅकवर झाड पडलेले पाहिले. तेवढ्यात त्यांना रेल्वेचा हॉर्न ऐकू आला. झाड पडले होते, तेथे वळण होते. त्यामुळे रेल्वे पायलटला झाड दिसणे शक्य नव्हते. ट्रेकर्सनी प्रसंगावधान राखून लाल जॅकेट घातलेल्या एकाला त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उभं केले. अन्य जणांनी हातात कपडे घेवून फडकावून रेल्वे पायलटला रेल्वे थांबवण्यासाठी जागरूक केले. झाड पडलेल्या ठिकाणापासून केवळ दहा मीटर अंतरावर रेल्वे येवून थांबली आणि अनर्थ टळला. रेल्वे पायलट आणि त्याचे सहाय्यक रेल्वेतून उतरून आले. नंतर ट्रेकर्स आणि रेल्वे पायलट यांनी रेल्वे ट्रॅकवरून पडलेले झाड बाजूला केले. नंतर रेल्वे मार्गस्थ झाली. रेल्वे पायलटनी बंगलोरच्या ट्रेकर्सना धन्यवाद देवून अपघात टाळण्यास मदत केल्याबद्दल आभार मानले.

पार्श्वभूमी

गंगा जमुना वस्तीत छुपं तळघर अन् भुयारी मार्ग, अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं, भाजपचा गंभीर आरोप


नागपूर : नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतल्या 188 कुंटणखाण्यात छुपं तळघर आणि भुयारी मार्ग असून त्या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं. परराज्यातून अपहरण करून किंवा फसवून आणलेल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलींना हार्मोनचं इंजेक्शन देऊन कोवळ्या वयातच शारीरिकदृष्ट्या देह व्यापारासाठी तयार केलं जातं. अनेक महिने अंधारलेल्या तळघरात ठेऊन या मुलींना मानसिकरीत्या देह व्यापारासाठी मजबूर केलं जातं, असे गंभीर आरोप भाजपनं केले आहेत. पोलिसांनी या कुंटणखान्यांच्या आत लपलेल्या या तळघरांना उध्वस्त करावं, अशी मागणीही भाजपनं केली आहे.


वारांगणांचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांनी अशा तळघरांचा आरोप बिनबुडाचा असल्याचं सांगत आरोप करणारे भाजपवाले आजवर झोपले होते का? त्यांचे सरकार असताना हे कुंटणखाने आणि अल्पवयीन मुलींना डांबण्यासाठी असलेले तळघर त्यांना दिसले नाही का? असा सवाल उचलला आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 7 कुंटणखाने सील केले असून इतर ठिकाणी पुन्हा देह व्यापार दिसून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


नागपूरच्या मध्यस्थानी वसलेली ही गंगा जमुना वस्ती. वरकरणी इतर कोणत्याही सामान्य वस्ती सारख्या दिसणाऱ्या या वस्तीतील प्रशस्त इमारतीत माणुसकीला काळिमा फासणारे धंदे चालत असल्याचे आरोप होत आहेत. गंगा जमुना वस्तीच्या अवतीभवती राहणारे नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या इमारतींमध्ये अनेक कुंटणखाने असून त्यांच्या खाली छुपे तळघर आणि भुयारी मार्ग आहेत. या तळघरात परराज्यातून अपहरण करून आणलेल्या किंवा गरीब पालकांकडून खरेदी केलेल्या शेकडो अल्पवयीन मुलींना डांबून ठेऊन त्यांना मारहाण केली जाते. एवढंच नाहीतर या अल्पवयीन मुली कोवळ्या वयात देह व्यवसायासाठी शारीरिक दृष्ट्या तयार व्हाव्यात यासाठी त्यांना हार्मोनचं इंजेक्शन दिलं जात असल्याचा गंभीर आरोप भाजापनं केला आहे. प्रत्येक अल्पवयीन मुलीला जोवर ती देह व्यवसायासाठी होकार देत नाही, तोवर शारीरिक यातना देऊन अंधारात डांबलं जातं. तिचं मानसिक खच्चीकरण करत तिला होकार देण्यासाठी मजबूर केलं जात असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेते आणि याच वस्तीतच्या शेजारी लहानाचे मोठे झालेल्या मनोज चापले यांनी केला आहे. दरम्यान, गंगा जमुनाच्या अवतीभवती राहणाऱ्या सामान्य महिलांनी वस्तीतील वेश्या व्यवसायामुळे आंबट शौकीन आता त्यांच्या घरापर्यंत येऊन तुमचे किती दर (वेश्या व्यवसायसाठी किती दर घेता) आहे, असे विचारू लागल्याचे आरोपही केले आहेत.


Sachin waze : बायपास सर्जरीसाठी रुणालयात दाखल होण्याची परवानगी द्या; सचिन वाझेची एनआयए कोर्टाला विनंती


मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेनं पुन्हा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाचे दरवाजा ठोठावले आहेत. विशेष एनआयए न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकीय उपचारांसाठी वाझेला भिवंडीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील वोक्हार्ट अथवा बॉम्बे रुणालयात दाखल करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज वाझेनं दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.


जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरीक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. दरम्यान तळोजा कारागृहात असलेल्या वाझे याला हृदयाशी संबंधित त्रास असल्यानं न्यायालयाच्या परवानगीनंतर 30 ऑगस्ट रोजी त्यांना भिवंडी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र तिथं वैद्याकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिय करण्याची गरज निर्माण झाल्यानं आपल्यावर मुंबईतील बड्या रुणालयात वैद्याकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्या, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.