Maharashtra Breaking News LIVE : अनिल देशमुख यांचे जावई गौरव देशमुख यांचं 10 जणांनी अपहरण केलं, देशमुख कुटुंबियांचा आरोप

Maharashtra Breaking News LIVE Updates, 1 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Sep 2021 08:35 PM
अनिल देशमुख यांचे जावई गौरव देशमुख यांचं 10 जणांनी अपहरण केलं, देशमुख कुटुंबियांचा आरोप

अनिल देशमुख यांचे जावई गौरव देशमुख यांचं 10 जणांनी अपहरण केलं, देशमुख कुटुंबियांचा आरोप

चाळीसगाव गावाच्या पूरग्रस्तांना कोकणच्या धर्तीवर मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

चाळीसगावच्या पूरस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, चाळीसगाव गावाच्या पूरग्रस्तांना कोकणच्या धर्तीवर मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन, सध्या पंचनामे प्राथमिक पातळीवर आहेत, दोनचार दिवसात पंचनामे पूर्ण झल्यावर आढावा घेऊन होणार निर्णय, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पूरग्रस्तना मदत करण्याची केली होती मागणी

चंद्रकांत पाटलांसह पुण्यातील भाजपच्या अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल

चंद्रकांत पाटलांसह पुण्यातील भाजपच्या अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल, परवानगी नाकारल्यानंतरही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी विरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पेट्रोल, डिझेल, गॅस महागल्यानं सामन्य जनता त्रस्त : राहुल गांधी

पेट्रोल, डिझेल, गॅस महागल्यानं सामन्य जनता त्रस्त, जीडीपी म्हणजे जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल जीडीपी वाढला, महागाईवरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका 

डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती वादात, निवृत्तीनंतरच्या नेमणूक प्रकरणी तक्रार दाखल

डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती वादात, निवृत्तीनंतरच्या नेमणूक प्रकरणी तक्रार दाखल; सुधीर आल्हाट यांची ऍड असीम सरोदे यांच्या माध्यमातून तक्रार, मुख्य सचिव आणि आरोग्य शिक्षण विभाग व आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार, नियुक्ती रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, अॅड असीम सरोदे यांची माहिती

मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट, सोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ

मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट, सोबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ

भाजपच्या नगराध्यक्ष डॉक्टरांवर सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची तक्रार

बीड जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे  नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असं कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत, जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच धारूरचा विद्यमान नगराध्यक्ष आहे. या विरोधात डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनकडून  हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. या गुन्हा विरोधात आज असोसिएशन च्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

Maharashtra live updates: अशोक चव्हाणांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक, अज्ञात महिलेकडून घरावर दगड फेक करण्यात आलीय. नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील आनंद निलयम या अशोक चव्हानांच्या घरावर दगडफेक करण्यासात आलीय. सदर दगड फेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्यात. त्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सदर महिला ही गतिमंद असल्याची माहिती मिळतेय. सदर महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

जयंत पाटलांचा उद्यापासून सुरु होणारा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा रद्द

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उद्यापासून मराठवाडा मध्ये सुरु होणारा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा रद्द. मराठवाडामधील पूरपरिस्थितीमुळे दौरा रद्द. आता राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेऐवजी पुराच्या पाहणीचा जयंत पाटील करणार दौरा करणार. 

गणेश मूर्तिकार पुन्हा संकटात; दहा टक्केसुद्धा मूर्तींची बुकिंग नाही

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर असलेला गणेश मूर्तीचा कारखाना या कारखान्यांमध्ये दरवर्षी गणेश मूर्ती तयार केल्या जातात मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने वर्षभराचे आर्थिक नियोजन हे फक्त गणेशोत्सवावर अवलंबून असते. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असताना या वर्षी प्रशासनाने चार फूट पेक्षा कमी उंचीच्या मूर्ती तयार करण्यास परवानगी दिल्याने कारागीर अडचणीत आले आहे. ते कारण मूर्तीची उंची जितकी जास्त तितका कारागिरांचा आर्थिक फायदा जास्त, परंतु या वर्षी चार फूट उंचीचा तयार करण्याचे आदेश आल्याने कारागीर आर्थिक अडचणीत आले आहेत. तर दहा दिवसांवर गणेश उत्सव घेऊन ठेपला तरीही म्हणावी अशी गणेशमूर्तींची बुकिंग सुद्धा झाली नाही फक्त दहा टक्के मूर्तींची बुकिंग झाल्यामुळे कारागिरांना  आर्थिक संकटात आले आहे

देशातील कोरोनाची सद्यस्थिती

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 28 लाख 10 हजार 845
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 93 हजार 644
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 78 हजार 181
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 20
एकूण लसीकरण : 65 कोटी 41 लाख 13 हजार लसीचे डोस

भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या

कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 28 लाख 10 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 93 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 78 हजार रुग्ण अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहेत. 

देशात 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

भारतात एका दिवसात 40 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एक दिवसापूर्वी देशात 30,941 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आज बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,965 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 33,964 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


यापूर्वी देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. बुधवारी 46164, गुरुवारी 44658, शुक्रवारी 46759, शनिवारी 45083 आणि सोमवारी 42909 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे, केरळात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव. केरळात काल दिवसभरात कोरोनाच्या 30,203 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

विनाअनुदानित घरगुती सिलेंडर 25 रुपयांनी महागला, गेल्या 8 महिन्यांत 190 रुपयांची वाढ

नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडर आणखी महाग झाला आहे. आज एक सप्टेंबरपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते. यापूर्वी एक जुलै रोजी घरगुती गॅसचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. 


आता 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर दिल्ली-मुंबईत 884.5 रुपये, कोलकात्यात 911 रुपये आणि चेन्नईत 900.5 रुपयांनी विकण्यात येत आहे. यापूर्वी सिलेंडर क्रमश: 859.5 रुपये, 886 रुपये आणि 875 रुपये विकण्यात येत होता. घरगुती एलपीजी सिलेंडरच नाही, तर 19 किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलेंडरही महाग झाला आहे. दिल्लीत औद्योगिक वापरासाठीचा सिलेंडर 1618 रुपयांऐवजी 1693 रुपयांना विकला जात आहे. 

झोपाळा खेळताना गळफास, पिंपरी-चिंचवडमध्ये 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात झोपाळा खेळताना गळफास लागून एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी तिचे आई-वडिल घरात नव्हते. खेळता खेळता ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितंलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


पिंपरी चिंचवडमध्ये एका आठ वर्षीय मुलीचा झोपाळा खेळताना गळफास लागून मृत्यू झाला आहे. रुपीनगर परिसरात 29 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली. सुमैय्या शेख असं मृत मुलीचं नाव असून तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी ती आपल्या बहिणींसोबत घरात खेळत होती. त्याचवेळी खिडकीला पडदा लावण्याच्या लोखंडी पाईपला स्कार्फ बांधून सुमैय्यानं झोपाळा तयार केला. त्यात बसून झोका घेताना अचानक तिला गळफास बसला आणि तिचा श्वास रोखला गेला. बहिणींनी तिच्या गळ्याचा स्कार्फ काढला आणि तिला रुग्णालयात नेलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला प्रकरण, निषेधार्थ अंबरनाथ नगरपरिषद मध्ये प्रशासकीय कामकाज बंद

अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. या हल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे कापली गेली तर  त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर यांच्यावर देखील हल्ला झाला, याचा निषेधार्थ आज अंबरनाथ नगरपरिषद मार्फत प्रशासकीय कामकाज बंद ठेऊन निषेध करण्यात आला आहे, फक्त अत्यावश्यक सेवा या सुरू राहतील अशी माहिती पालिका तर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, पुणे महापालिकेचे पत्र 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, त्यामुळे तयारीत रहा असं पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना देण्यात आलं आहे. रुग्णालयांनीही कोविड नियंत्रणाची तयारी सुरू करावी, पत्राद्वारे सूचित करण्यात आले. महापालिकेने कोरोनाच्या दोन लाटांमध्ये सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. 


 

वडेट्टीवारांच्या सोलापुरातील निर्धार मेळाव्यात चोरट्यांचा डल्ला

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात चोऱ्या झाल्याची घटना घडलीय. ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती निर्धार मेळाव्यात एका शिक्षकाच्या गळ्यातील चेन, नगरसेवकाच्या खिशातील आठ हजार रुपये तर एका पदाधिकाऱ्याचे पाकीट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सोलापुरातील गंगा लॉन्स येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. याचाच फायदा घेत चोरट्यानी डल्ला मारल्याचे समोर येत आहे

काँग्रेस आणि गांधी परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

चित्रपट अभिनेत्री पायल रोहतगी आणि एका अज्ञात इसमा विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

भाजप नेते किरीट सोमय्या  नाशिक दौऱ्यावर, भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी करणार

भाजप नेते किरीट सोमय्या  नाशिक दौऱ्यावर असून ते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्ताची पहाणी करणार आहेत. किरीट सोमय्या  थोड्याच वेळात आर्म स्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली ला भेट देणार आहेत. मागील आठवड्यात सोमय्या यांनी भुजबळ यांच्या मालमत्तवर प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यावर भुजबळ यांनी कोणतीच करावाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात होताच किरीट सोमय्या यांच्या रडारवर पुन्हा छगन भुजबळ आल्याचं दिसत आहे. 

माजी आमदार आर एम वाणी यांचं निधन

शिवसेना नेते आणि माजी आमदार आर एम वाणी यांचं निधन. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. औरंगाबाद विजापूर मतदारसंघाचं वाणी यांनी 15 वर्ष प्रतिनिधित्व केलं. आपल्या जागी मुलाला नाही तर कार्यकर्त्यांला आमदारकीचं तिकीट देणारा नेता हरवला.

पुरग्रस्तांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांची पदयात्रा, सामूहिक जलसमाधीचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आजपासून पदयात्रा काढून जलसमाधी आंदोलन करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरू होईल. पाच सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी या ठिकाणी पदयात्रा पोहोचेल. तोपर्यंत पूरग्रस्त नागरिकांना सरकारने दिलासा दिला नाही तर सामूहिक जलसमाधी घेतली जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

रत्नागिरी : आजपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेनं धावणार

रत्नागिरी : गावागावात वाहतुकीमध्ये एसटी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. कोरोना आला आणि एसटीची सेवा थांबली. लॉकडाऊनमधील शिथिलता मिळत असताना एसटी काही पूर्ण क्षमतेनं धावत नव्हती. पण, गणेशोत्सवाच्या तोंडावर आता रत्नागिरी जिल्हावासियांना एक खुशखबर मिळाली आहे. कारण, आजपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्यात एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्यामुळे एसटी सुरु झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. वस्तीच्या गाड्यांसह सर्वच गाड्या आता पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. तसेच एसटीला देखील यातून चांगला महसुल मिळणार आहे. 

चाळीसगावात पाऊस थांबला, पुराचं पाणी ओसरलं, पुरामुळं मोठं आर्थिक नुकसान

जळगावातील चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूरस्थिथी निर्माण झाली होती. चाळीसगाव तालुक्यातील 750 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आतापर्यंत एका महिलेचा या पुरात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच अद्याप कोणती बेपत्ता असल्याची तक्रार मिळालेली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून दिली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या कन्नड घाटात आणि डोंगरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस काल झाला. त्यामुळे घाटात जवळपास 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अद्यापही औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. 

पार्श्वभूमी

Chalisgaon Flood : चाळीसगावात पुराचं पाणी ओसरलं, 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती


जळगावातील चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूरस्थिथी निर्माण झाली होती. चाळीसगाव तालुक्यातील 750 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आतापर्यंत एका महिलेचा या पुरात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच अद्याप कोणती बेपत्ता असल्याची तक्रार मिळालेली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून दिली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या कन्नड घाटात आणि डोंगरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस काल झाला. त्यामुळे घाटात जवळपास 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अद्यापही औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. 


जळगावच्या तळेगावात 145 मिमि, तर चाळीसगावात 90 मिमि पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. सध्या पुराचं पाणी ओसरलं असून अनेक गावांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. चाळीसगावात दूध उत्पादक पट्ट्यात तडाखा बसल्यानं 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. पंचनामे आणि तातडीची मदत यासाठी गतीनं सूत्रं हलवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 


प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता आणि विस्तार/मंडळ अधिकारी, अशी पथकं नेमून वैद्यकीय तपासणी, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि शुद्धीकरण, मृत पशूंची शास्त्रीय विल्हेवाट, नुकसान पंचनामे तात्काळ सुरु करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी दर्जाचे विशेष अधिकारी नियुक्त करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्वच्छतेसाठी पंचायत समिती आणि नागरपालिकेकडून नियोजन केलं जात असून तात्पुरत्या निवाऱ्यातील नागरीकांसाठी मूलभूत सुविधांचं नियोजन केलं जात आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक किटचे वाटप सुरु असून समाजसेवी संस्थांची भरघोस मदत मिळत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक स्वतः सकाळपासून घटनास्थळी हजर असून गावांना भेटी देत आहेत. 


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिलासा, त्यांच्या विरोधातील न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द


बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणं जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना चांगलंच भोवलं होतं. या प्रकरणात उच्च न्यायालयानं बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रवींद्र जगताप यांची बीडमधून बदली झाली सुद्धा मात्र याच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयातून दिलासासुद्धा मिळाला आहे. न्यायालयानं त्यांच्या विरोधात सुरु केलेली न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द केली असून त्या संदर्भात निकालपत्रात ओढलेले काही ताशेरे देखील निकालपत्रातून वगळण्यात आले आहेत.


2011 ते 2020 च्या दहा वर्षांच्या काळात बीड जिल्ह्यात झालेल्या नरेगा मधल्या घोटाळ्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणी प्रशासनानं तपास करावा, असे न्यायालयानं सांगितलं होतं. मात्र बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या काळात या प्रकरणाकडं दुर्लक्ष झाल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं आणि त्याच वेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवीद्र जगताप यांची बदली करा, असे आदेश काढले होते. त्यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजवण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी पदावरून रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली, मात्र त्यांना अद्याप कोठे नियुक्ती देण्यात आलेली नाही.
 
या घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा न्यायालयानं पुनर्विचार करावा आणि अवमान प्रक्रियेतून दिलासा द्यावा, अशी याचिका रवींद्र जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान जगताप यांच्या वकिलांनी न्यायालयाला रविंद्र जगताप यांच्यावर कोरोना नियंत्रणाची असलेली जबाबदारी, जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा असलेला तुटवडा या बाबींची माहिती देण्यात आली.  या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्याचा किंवा कोणाला वाचविण्याचा जगताप यांचा हेतू नव्हता, असं प्रकर्षानं मांडण्यात आलं. न्यायालयानं अवमान प्रक्रियेतून जगताप यांना दिलासा दिला असून नोटीस रद्द केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.