एक्स्प्लोर

Breaking News LIVE Updates : समीर वानखेडे भाजपचे पोपट आहेत का? नवाब मलिकांचा सवाल

Breaking News LIVE Updates, 28 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Breaking News LIVE Updates : समीर वानखेडे भाजपचे पोपट आहेत का? नवाब मलिकांचा सवाल

Background

Maratha Reservation : ...मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) भाजप खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काल सोलापुरात संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा होती. त्यावेळी संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. तर, महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही त्यांनी सुनावलंय. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमच्या  इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही, असंही संभाजीराजे म्हणाले. खासदार संभाजीराजे म्हणाले की, आम्ही मूक आंदोलन केलं, शांतपणे चर्चा केली पण तुम्हाला काही फरक पडत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत.  यापुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आता भेटणार नाही, आमचे समन्वयकही भेटणार नाहीत.

Buldhana Urban : बुलडाणा अर्बनमधील विशेष आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी

आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन.  बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत काल सकाळपासून एक 11 जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं आहे. या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं आहे. रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे. अजूनही हे पथक चौकशी करत आहे. दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत जाता येत नाही. प्रसारमध्यामांना कुठलीही माहिती या पथकाकडून किंवा बुलढाणा अर्बनकडून दिली जात नाहीये. बुलढाणा अर्बनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करणारे हे पथक आहे.

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मान्यता

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीची (ईपीसी) मान्यता मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता 2,117 कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल. आठ वर्षांचा कालावधी काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन असून या प्रकल्पांतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. 

21:52 PM (IST)  •  28 Oct 2021

समीर वानखेडे भाजपचे पोपट आहेत का? नवाब मलिकांचा सवाल

समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत का? असाही सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. 

21:50 PM (IST)  •  28 Oct 2021

वानखेडेंविरोधात कायदेशीर कारवाई करणार, नवाब मलिक यांचा इशारा

मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

21:46 PM (IST)  •  28 Oct 2021

मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो- नवाब मलिक

मुंबई ड्रग्जप्रकरणी अटक झालेल्या आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो तर, अनेकांना फसवले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

18:44 PM (IST)  •  28 Oct 2021

वसई-विरारच्या तीन नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश 

वसई-विरार महापालिकेतील तीन विद्यमान नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. हे तीनही नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे असून त्यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

17:21 PM (IST)  •  28 Oct 2021

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

किरण गोसावी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा आधी नोंद होताच.  आता आणखी दोन गुन्हे नोंद करण्यात आले.  त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
* ईन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट 66 D अंतर्गत एक गुन्हा नोंद करण्यात आलाय. 
* त्याचबरोबर बनावट कागदपत्रे वापरुन बॅकांचे व्यवहार करण्याचा गुन्हा नोंद आहे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget