Breaking News LIVE : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा नाशिक, पुण्यानंतर कोल्हापुरातही गोंधळ, पेपर चुकीचा दिला

Breaking News LIVE Updates, 24 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 24 Oct 2021 06:00 PM
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा नाशिक, पुण्यानंतर कोल्हापुरातही गोंधळ, पेपर चुकीचा दिला

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा नाशिक आणि पुण्यानंतर कोल्हापुरात देखील गोंधळ


3 वाजता देण्यात येणारा पेपर 4.30 वाजता दिला, तो देखील चुकीचा..


लॅब टेक्निशियनचा पेपर नर्सिंगला आणि नर्सिंगचा पेपर लॅब टेक्निशियनच्या परीक्षार्थींना

शिवसेनेच्या पुण्याईमुळेच भुजबळ अद्याप राजकारणात टिकून : संजय राऊत

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता आणखीन वाढलाय. आज नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांनी छगन भुजबळांना इशारा दिलाय. आता नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्या, असा इशाराच संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिलाय. तर शिवसेनेच्या पुण्याईमुळेच तुम्ही राजकारणात टिकून आहात असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावलाय. 

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जवळपास निश्चित

नाशिक- 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जवळपास निश्चित , डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार साहित्य संमेलन, 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भरणार सारस्वतांचा मेळा, स्वागताध्यक्ष  छगन भुजबळ सोमवारी  करणार घोषणा, 


भुजबळ नॉलेज सीटीमध्ये होणार साहित्य संमेलन

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक

तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची हजारोंची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. www.tuljabhavani.in या संकेतस्थळावरुन मंदिरातील वेगवेगळ्या विधींसाठी ऑनलाईन रक्कम मागितली, मागील 2 वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद आहेत. तरीही या संकेतस्थळावर हे सगळे विधी उपलब्ध आहेत, असं दाखवून अनेक भाविकांना गंडा घालण्यात आला आहे. फसवणूकीच्या तक्रारीनंतर उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून चौकशी करण्याचे आदेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वेबसाइट्सवर मंदिरातील विधींसाठी रक्कम ऑनलाईन मागितली जाते. मागील 2 वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद आहेत. 

मौका... मौका... भारत-पाकिस्तानमधील हाय व्होलटेज सामना

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सलामीलाच भारताची आज पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी गाठ पडणार आहे . हा सामना आज दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल दोन वर्षांनी आमनेसामने उभे ठाकणारयत. 

Petrol Diesel Price : देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं

Petrol Diesel Price 24 Oct 2021 : भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळं आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत, अशातच सातत्यानं वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर त्यांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत. 


देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रति लिटर आहेत. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रति लिटर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.52 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 100.59 रुपये प्रति लिटर आहेत. 

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 24 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Deglur Bypoll : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये; गोपीचंद पडळकरांची टीका


Deglur Bypoll : Nanded News : देगलूर बिलोली मतदारसंघाच्या निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात वातावरण आता तापलंय. दररोज प्रत्येक पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभांचा धुरळा आता उडू लागला आहे. काल भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्राचारार्थ देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा येथे एक सभा पार पडली. या सभेत भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर सडकून टीका केली.  


सभेत बोलताना पडळकरांनी आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान आरोग्य विभागानं अक्षम्य चुका करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी आरोग्यमंत्र्याना परीक्षेचं योग्य नियोजन करता आलं नाही. आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान अगोदर वेळेवर परीक्षा होणार, असं सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हाल आपेष्टांची पर्वा न करता मध्यरात्री विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून एका झटक्यात परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ग्रामीण भागातून, दुर्गम परिसरातून येणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय मुलामुलींचं आणि पालकांचं नुकसान आणि हाल झाले. तर ह्या परीक्षेच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीटही मिळालं नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता, जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात आणि बाहेर देशाचे परीक्षा केंद्र असल्याचे पत्ते होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल, असे म्हणणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली, असे सांगून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या पाड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यामुळे अशा पद्धतीनं वागणाऱ्या या आरोग्य मंत्र्याची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असल्याची सनसनाटी टीका देगलूर बिलोली निवडणूक प्राचारार्थ असलेले भाजप प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी काल (शनिवारी) बोलताना  केली आहे.


IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'


T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा करत विराट कोहली अन् कंपनीला धक्का दिलाय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.


भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सुर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्या शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. विराटच्या या वक्तव्यावरुन भारतीय संघ पाच गोलंदाज आणि सहा फलंदाज या सुत्राने मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेय.  दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जाडेजा, बुमराह आणि शामीचं स्थान निश्चित मानलं जात आहे. जाडेजासोबत दुसरा फिरकीगोलंदाज कोण? अनुभवी अश्विन की वरुण चक्रवर्ती अन् राहुल चहर यांची वर्णी लागणार. एका जागेसाठी या तीन गोलंदाजामध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. उर्वरित एका वेगवान स्थानासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चूरस आहे. याशिवाय काम चलावू म्हणून कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा पर्याय उपलब्ध आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.