Breaking News LIVE : द. मा.  मिरासदार यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Breaking News LIVE Updates, 2 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Oct 2021 07:34 PM
आज मुंबईत कोरोनाची 405 नवीन प्रकरणे

आज मुंबईत कोरोनाची 405 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बरे झाल्यानंतर घरी गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 495 झाली, तर आज 6 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या मुंबईत 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

द. मा.  मिरासदार यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास

द. मा.  मिरासदार यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 


 

शारदीय नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नियम जाहीर

शारदीय नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेताना भाविकांना काही नियम पाळणे गरजेचे आहे. त्यानुसार आज कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने काही नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये भाविकांनी दर्शन घेण्याआधी 48 तास ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करावे लागणार आहे. बुकिंग करताना मोबाईलनंबर आणि आधारकार्ड नंबर द्यावा लागणार आहे. नवरात्र उत्सवात दररोज 16 तास देवीचे दर्शन खुले राहणार आहेत. प्रत्येक तासाला किमान 600 भाविक देवीचे दर्शन घेतील अशा पद्धतीची व्यवस्था देवस्थान समितीकडून केलीय. त्याचबरोबर 10 वर्षाच्या आतील मुलांना दर्शनासाठी घेऊन येऊ नये अशा पद्धतीची विनंती देखील जिल्हा प्रशासनाने केली आहे. शिवाय भाविकांना केवळ देवीचं दर्शन घेता येणार आहे, कोणत्याही प्रकारे ओटी किंवा प्रसाद मंदिरामध्ये घेऊन येऊ नये अशा पद्धतीची विनंती देखील जिल्हा प्रशासनाने केली आहे.

कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणार्‍या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही त्यांचं मनोबल वाढवणारी गोष्ट आहे. दोन वर्षापासून या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत देखील सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने तसेच जबाबदारीने पार पाडले हे प्रशंसनीय आहे. नगर विकास विभागाने त्यांचे कौतुक करायचे ठरवले ते उचित आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते आणि शहराचे तसेच नागरिकांचे आरोग्य ठीक राहण्यास मदत होते. या सफाई मित्रांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात

मंत्री आणि सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा नियमांचे उल्लंघन, मंत्री जयंत पाटील यांच्या स्वागताला रात्री मोठी गर्दी

मंत्री आणि सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा सरकारी नियमांचे उल्लंघन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जयंत पाटील यांच्या स्वागताला रात्री मोठी गर्दी



-देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्यां समर्थकांनी केली मोठी गर्दी



- सरोज आहिरेच्या फेसबुक पेजवरून स्वागताचे लाईव्ह प्रक्षेपण



- सरकार एकीकडे सोशल डिस्टसिग, तोंडाला मास्क लावण्याचे निर्देश देते



-मुंबईत क्लीन अप च्या नावाने लूट सुरू असतानाच आमदार, मंत्री, आणि पक्षीय कार्यकर्ते मात्र सरकारी आदेश, नियम पायदळी तुडवीत आहेत

शेगाव श्री संत गजानन महाराज मंदिर येत्या 7 तारखेला भक्तांसाठी उघडणार, फक्त ई पास धारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार 

श्री संत गजानन महाराज मंदिर येत्या 7 तारखेला भक्तांसाठी उघडणार, फक्त ई पास धारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार 


दररोज फक्त 9000 भक्तांनाच दर्शनाचा लाभ घेता येईल.


10 वर्षाचे आतील व 65 वर्षावरील भक्तांना मंदिरात प्रवेश नाही.

मंत्री आणि सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा सरकारी नियमांचे उल्लंघन

सरकार एकीकडे सोशल डिस्टसिग, तोंडाला मास्क लावण्याचे निर्देश देते तर दुसरीकडे मंत्र्यांकडूनच कोरोना नियम धाब्यावर बसवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जयंत पाटील यांच्यां स्वागताला काल रात्री मोठी गर्दी झाली होती. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या समर्थकांनी ही मोठी गर्दी केली. सरोज आहिरेच्या फेसबुक पेजवरून स्वागताचे लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते. मुंबईत क्लीन अप च्या नावाने लूट सुरू असतानाच आमदार, मंत्री, आणि पक्षीय कार्यकर्ते मात्र सरकारी आदेश, नियम पायदळी तुडवीत आहेत.

पुणे एअरपोर्टवर पवार-गडकरींची बैठक

पुणे एअरपोर्टवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक.  पुणे एअरपोर्टच्या जागेसंदर्भात ही बैठक असल्याच सांगीतली जातेय.  गडकरींना भेटण्यासाठी पवार एअरपोर्टवर पोहचलेत तर नितीन गडकरी नागपूरहून अहमदनगरला जाण्यासाठी पुणे एअरपोर्टवर पोहचलेत.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार महात्मा गांधीजींना आदरांजली वाहताना म्हणाले की, गांधीजींनी देशाला सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवून दिलं. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार असून तो अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करुन आदरांजली वाहिली.


माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शास्त्रीजींनी देशाला 'जय जवान जय किसान'चा नारा दिला. त्या नाऱ्याची आजही गरज असून तोच नारा देशाला बलशाली बनवेल. शास्त्रीजींना देशातल्या शेतकरी, सैनिकांबद्दल कणव होती. ते सामान्य माणसाचं दु:ख जाणणारे पंतप्रधान होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचले होते.  पंतप्रधान झाले तरी जीवनाखेरपर्यंत त्यांची राहणी साधी राहीली. देशवासियांसाठी मृदू असलेले शास्त्रीजी देशाच्या शत्रूंसाठी वज्राहून कठोर होते. देशाचे कणखर पंतप्रधान म्हणून त्यांचं जीवन युवकांना, भावी पिढीला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करुन त्यांनाही जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

शाहीन चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर, भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्यानं भारताला धोका नाही

शाहीन चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर, भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्यानं भारताला धोका नाही,


शाहीन चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग ताशी १३० किमीपर्यंत पोहोचला,


पुढील २४ तासात पाकिस्तानच्या माकरान किनारपट्टीला लागून सरकेल, त्यानंतर पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेला सरकत ४ आॅक्टोबरला ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 2 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.


आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती
Gandhi Jayanti 2021 :  देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती.  सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. स अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. 


दीर्घकाळापासून प्रलंबित  महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर 
मुंबई :  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर काल महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील 4534 उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.महावितरण कंपनीतील विद्युत  सहाय्यक  पदांच्या एकूण 5000 पदांसाठी 9 जुलै  2019 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 466 जागा वगळता उर्वरित 4534 जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे.यानुसार खुल्या प्रवर्गातून 1984 पदांचा तर अनुसूचित जातीसाठी 375 अनुसूचित जमातीसाठी 236, विमुक्त जातीसाठी 109, भटक्या जमाती(ब)साठी 80, भटक्या जमाती ( क)साठी 118, भटक्या जमाती (ड)साठी 44, विशेष मागास प्रवर्गासाठी 81 व इतर मागास वर्गासाठी 1507 पदांचा निकाल जाहीर  करण्यात आला आहे.


Mumbai Unlock: मुंबईत 7 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी


Mumbai Unlock : राज्यात आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालल्यानं आता हळू हळू निर्बंध शिथिल केले जाऊ लागले आहेत.  मुंबई महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळांमध्ये एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करून धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी 7 ऑक्टोबर पासून देण्यात आली आहे.


राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु  
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार  असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.  यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.