Breaking News LIVE Updates : दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, November 08 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 08 Nov 2021 08:38 AM
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, आमदार मिटकरी यांची ट्वीटरवर माहिती. सायबर सेलकडे केली तक्रार

न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार - परिवहन मंत्री अनिल परब

कोर्टोच्या आदेशाचं कुणीही उल्लंघन करु नये, अन्यथा कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ. न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार,  Pakistan Cricket बोर्डाची माहिती

24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार,  Pakistan Cricket बोर्डाची माहिती

मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवेंच्या जयंतीनिमित्त Googleकडून मानाचा मुजरा

Dr. Kamal Ranadive’s 104th Birthday: मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवे यांची आज 104वी जयंती. डॉ कमल रणदिवे यांच्या जयंतीनिमित्त आज Googleनं त्यांना अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा केला आहे. गुगलनं  Doodle च्या माध्यमातून बायो मेडिकल संशोधक असलेल्या  डॉ. कमल रणदिवे (Dr. Kamal Ranadive) यांच्या कामाची ओळख जगाला करुन दिली आहे. डॉ कमल रणदिवे यांचं कॅन्सरवरील संशोधन महत्वाचं ठरलं होतं. त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देत सन्मानित केलं आहे. 


डॉ. कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 साली पुण्यात झाला होता. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ आणि आई शांताबाई दिनकर समर्थ. वडील दिनकर पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कमल रणदिवे या पहिल्यापासून हुशार विद्यार्थीनी होत्या. आपलं शिक्षण फर्ग्यूसन कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालयातून एमएससी केली. त्यांनी 3 मे 1939 रोजी गणित तज्ञ जे. टी. रणदिवे यांच्याशी लग्न केलं.  कमल रणदिवे यांनी मुंबईतील  टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम केलं. सोबतच त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी देखील घेतली.  सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तामिळनाडूत मुसळधार पाऊस; 'रेड अलर्ट' जारी

Heavy Rain in Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आयएमडीनं येणाऱ्या दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागांत 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 




आयएमडीकडून रेड अलर्ट जारी 


हवामान विगानं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आयएमडीनं रेड अलर्ट जारी केला आहे. 

मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये; सविस्तर वाचा काय आहे प्रकरण

मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)आला होता. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचं झालं असं आशिष चंचलानी (ashish chanchlani) हा युट्युब स्टार उल्हासनगर मध्ये राहतो. आशिष चंचलानीला दिग्दर्शक रोहित शेट्टी याने तुला भेटण्यासाठी मी उल्हासनगरमध्ये नक्की येईल असे वचन दिले होते. मित्राला दिलेले हे वचन काल त्याने  पूर्ण केले. वाचा सविस्तर


आर्यन खान एनसीबीच्या SIT समोर चौकशीसाठी अनुपस्थित, कारण आलं समोर

Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रविवारी एनसीबीच्या एसआयटीनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु, आर्यन खान (Aryan Khan) काल (रविवारी) चौकशीसाठी हजर राहिला नाही. एनसीबीनं आर्यन खानला रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान, चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण तरिही आर्यन खान गैरहजर राहिला. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (NCB) च्या रडारवर असलेला आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं पालनं करणं आर्यनसाठी बंधनकारक असणार आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे, आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करावं. जर आर्यननं या अटींची पूर्तता केली नाही, तर मात्र आर्यनचा जामीन रद्द होऊ शकतो. असं असलं तरीही आर्यननं काल (रविवारी) एनसीबी कार्यालयात चौकशीला जाणं टाळलं. यावरुन सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय की, आर्यन चौकशीसाठी का उपस्थित नव्हता? याचं कारण आता समोर आलंय. 




मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला थोडा ताप होता. त्यामुळं त्यांनं एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणं टाळलं. आर्यन खानच्या मॅनेजर्सनं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु, आशा आहे की, सोमवारी (आज) आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहिल. दरम्यान, काल (शनिवारी) अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची एनसीबीच्या एसआयटीनं चौकशी केली. दोघेही संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले होते. 

वारकरी बांधवांना मोठा दिलासा, यंदा कार्तिकी यात्रा होणार तर पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत आज पालखी मार्गाचं भूमिपूजन

केंद्र सरकारकडून वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या असलेल्या 10 हजार कोटींच्या पालखी मार्ग (Palakhi Marg) शुभारंभ सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होत आहे. आषाढी वारीसाठी आळंदी व देहू मधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रध्देचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. 


या मार्गाचे श्रेय मिळविण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी याचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होता . 

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एबीपी माझा लाईव्हवर...

एबीपी माझा लाईव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 


पार्श्वभूमी

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.


तिकडे मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठक होतेय. याशिवाय एसटीचा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेलाय. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.  सध्या 250 बस आगार पैकी 160 बस डेपो बंद आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झालीय.


संपाला पाठिंब्याबाबत 17 संघटनांची मुंबईत आज बैठक


एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याविषयी आज, सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईत कृती समितीची बैठक होणार आहे. समितीत नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सर्व आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे.  राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही 28 टक्के  महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी एसटीतील 17 कामगार संघटनाच्या कृती समितीने 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्चन्यायालयात सुनावणी


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. याप्रकरणी आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात तूर्त कोणताही आदेश देत नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या महाधिवक्त्यांना सोमवारी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार 


एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार झालंय. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती 3 महिन्यांत न्यायालयाला अहवाल देणार असल्याचं कळतंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.