Breaking News LIVE : मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Breaking News LIVE Updates, 30 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2021 07:25 PM
राज्यात 74 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, आज 18600 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद

राज्यात 74 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, आज 18600 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद, तर 22532 रुग्ण कोरोनामुक्त, तर 24 तासात 402 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 66 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. तर 1327 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 61 हजार 226 झाली आहे. रिकव्हरी रेट 94 टक्के झाला आहे. सध्या 27 हजार 322 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील डबलींग रेट 414 दिवसांवर गेला आहे. तर ग्रोथ रेट 0.16 टक्के झालाय.

केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता

केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता. पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार. महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस होणार. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरु

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन आला आहे. मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालय कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. 

कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती सुरूच

डोंबिवली जवळील अंतार्ली गावात कोरोना नियम बाजूला सारत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली असताना न्यायालयाचे आदेश झुगारून कल्याण ग्रामीण भागात बैलगाडा शर्तींचे आयोजन केले गेले आहे.तर स्थानिक मानपाडा पोलिसांना याबाबत काहीच माहिती नसल्याचं समोर आलय

मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर टँकर पलटी , बोरघाटात अपघात
आज सकाळच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या टँकरचा बोरघाटात अपघात झाला. यावेळेस, बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत मुंबईकडे येणाऱ्या टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मार्गावर पलटी झाला. यामुळे, टँकरमधील मळी रस्त्यावर सांडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. तर, रस्त्यावर सांडलेल्या मळीचा द्रव काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. 

 
मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर टँकर पलटी , बोरघाटात अपघात
आज सकाळच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या टँकरचा बोरघाटात अपघात झाला. यावेळेस, बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत मुंबईकडे येणाऱ्या टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मार्गावर पलटी झाला. यामुळे, टँकरमधील मळी रस्त्यावर सांडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. तर, रस्त्यावर सांडलेल्या मळीचा द्रव काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. 

 
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरुन मवाळ भूमिका घेऊ नये- चंद्रकांत पाटील

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरुन मवाळ भूमिका घेऊ नये, सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवून द्यावं. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य 

ममत बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे कानाडोळा करुन चालणार नाही : शिवसेना खासदार संजय राऊत

ममत बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे कानाडोळा करुन चालणार नाही, गुजरातप्रमाणे इतर राज्यांना न्याय का मिळत नाही? : शिवसेना खासदार संजय राऊत

काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळे देशाचा कारभार सुरु : शिवसेना खासदार संजय राऊत  

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण, पण देशात अजूनही अनेक कामं प्रलंबित आहेत. काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळे देशाचा कारभार सुरु : शिवसेना खासदार संजय राऊत  

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी होऊन अपघात, चालक जखमी

रायगड : मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात टँकर पलटी होऊन अपघात घडला आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टँकरचा अपघात झाला असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टँकर पलटी झाला आहे. मळी भारलेला टँकर मुंबई लेन वरून पुणे लेनवर जाताला उलटला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अपघातात चालक जखमी झाला आहे. 

पाण्यात वाहून गेलेल्या एका मुलीचे शव सापडले, इतर तिघांचा शोध सुरु

काल रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे पाण्यात वाहून गेलेल्या चार मुलांपैकी एका मुलीचे शव सापडले आहे. इतर तिघांचे शोध सुरू आहे. आरती पारशेट्टी (वय 12) असे या मृत मुलीचे नाव आहे. जिथे बुडाली होती तिथून जवळपास 200 मीटर अंतरावर आरतीचा मृतदेह आढळला आहे.

सिंधुदुर्ग :  तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील विद्युत पुरवठा तेरा दिवस खंडित

सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील विद्युत पुरवठा तेरा दिवस खंडित झाला होता. एबीपी माझाच्या बातमीनंतर महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेचे खांब उभे करण्याचे काम महावितरणकडून सुरु आहे. आज सिंधुदुर्ग किल्यावरील वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बुलढाणा : शाळेतील चिमुरड्यांकडून करून घेतल्या जात आहे विलगीकरन कक्षाच्या स्वच्छता गृहाची साफसफाई

बुलढाणा : शाळेतील चिमुरड्यांकडून विलगीकरन कक्षाच्या स्वच्छता गृहाची साफसफाई करुन घेतली जात आहे. संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावातील घटना. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात बोलताना गट विकास अधिकाऱ्यांनी मला काही घेणे देने नाही, असं म्हटलं आहे. सध्या ग्रामीण भागात शाळा विलगीकरन कक्षात रूपांतरित करण्यात येत आहेत. 

अमरावती : हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिनी तोडफोडीनंतर हिंदु स्मशान संस्थेचे तीन महत्त्वाचे निर्णय

अमरावती : हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिनी तोडफोडीनंतर हिंदु स्मशान संस्थेने तीन निर्णय घेतले आहेत. स्मशानात दोन गॅसदाहिन्याद्वारे मृतकांचे होत असलेले अंतिम संस्कार करण्याचे काम आजपासून थांबविण्यात येत आहे. स्मशानभूमीत अस्तित्वात असलेल्या दोन गॅसदाहिनीद्वारे मृतकांचे अंतिम संस्कार करण्याचे काम सुरु ठेवण्याबाबत आम्हाला लेखी परवानगी द्यावी. तरंच गॅसदाहिन्या सुरु होतील. सोबतच जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी तिसरी गॅसदाहिनी उभारण्याची व कार्यान्वित करण्याची लेखी परवानगी द्यावी.

राज्यात शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये हजारच्या घरात नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात काल 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.


राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.

पार्श्वभूमी

ABP News-C voter Survey: पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण? लोकांच्या मनात कोण?


मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी न्यूज-सी-व्होटर्सनने महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरुन देशाच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं. यासाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केलं आहे. यात जनतेला अनेक प्रश्न विचारले गेले, त्यातील एक प्रश्नही विचारला गेला की पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रश्नासाठी बर्‍याच मोठ्या नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवली गेली.


तुमच्या मते पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण?



  • नरेंद्र मोदी- 44.14 टक्के

  • राहुल गांधी - 12.36 टक्के

  • सोनिया गांधी - 2.91 टक्के

  • मनमोहन सिंह- 6.55 टक्के

  • योगी आदित्यनाथ - 1.22 टक्के

  • ममता बॅनर्जी  - 0.34 टक्के

  • अरविंद केजरीवाल - 3.85 टक्के

  • इतर- 13. 76 टक्के

  • सांगता येत नाही - 14.87 टक्के 


अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीका होताना दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती आहे. 


सलाम! पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर धौंडियाल यांची वीरपत्नी भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू


देशसेवेत रुजू होण्याचं अनेकांचंच स्वप्न असतं. पण, मुळात हे स्वप्न बाळगणं आणि प्रत्यक्षात देशसेवेत रुजू होऊन या देशासाठी प्राणही त्यागण्याची तयारी दाखवणं यासाठी खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज लागतं. अशीच जिद्द आणि समर्पकता दाखवली होती भारतीय सैन्यातील मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनी. देशाच्या सेवेत असताना त्यांना पुलवामा येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलं. फेब्रुवारी 2019 ला मेजर धौंडियाल यांनी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्वं आणि त्यांची देशाप्रती असणारी ओढ ते मागेच ठेवून गेले. 


मेजर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला, पत्नीला पुरता धक्काच बसला होता. पण, अखेर नियतीही या कुटुंबापुढे झुकली आणि मेजर धौंडियाल याच्या पत्नीनं सारं धाडस एकवटत जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात केली. मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी निकीता धौंडियाल यांनी नुकतंच भारतीय सैन्यातील आपली सेवा सुरु केली असून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे शनिवारी त्यांना लेफ्टनंट पद बहाल करण्यात आलं. 


Rain in Jalgaon : जळगावात दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस; तोक्ते चक्रीवादळाप्रमाणे मदतीसाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती


जळगाव : जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावातील घरांचंही या पावसात नुकसान झालं असून वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केली असून तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणाला ज्या पद्धतीने मदत मिळाली तशी मदत जळगाव जिल्ह्यासाठी मिळण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.


जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठच्या गावांमध्ये वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल आणि तारांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.