Breaking News LIVE : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद
Breaking News LIVE Updates, 28 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 292 कोरोना रुग्णांची नोंद तर 42 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झालीय.
पालघर जिल्ह्यात कोरोना चा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लादण्यात आले असूनही,, काही नागरिक या निर्बंधांचे उल्लंघन करत असून आज पालघर चे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी अचानक पणे अंधार पडल्यावर पालघर मधील समुद्रकिनाऱ्यांवर धाड टाकली यावेळी नांदगाव बीचवर उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली
दुपारी बारा वाजता मुंबई येथील पक्ष कार्यालयात होणार प्रवेश सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची माहिती. वैशाली माडे 'झी'च्या 'सारेगमप' हिंदी आणि मराठी स्पर्धेच्या विजेत्या. त्यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' या गीतामूळे मिळाली वेगळी ओळख.
कोरोनाचा उद्रेक सुरूच. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारांचा टप्पा ओलांडला. आज 2275 रुग्णांची नोंद. गेल्या वर्षी एका दिवसांत 1500 च्यावर रुग्ण आढळले नव्हते. दुसरी लाट शहरवासीयांचं चांगलंच कंबरडे मोडले.
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या वाळू माफियांच्या तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या यांत्रिकी सायबर बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून आणून नष्ट केल्या आहेत. राजेगावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तडीपार आरोपी विष्णू उर्फ लाला बलभीम अमनर हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही साथीदारांसह अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने भीमा नदीच्या पात्रातच छापा घातला. यावेळी त्या ठिकाणी आढळलेल्या यांत्रिकी फायबर बोटी महसूल कर्मचाऱ्याच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट घडवून नष्ट केल्या आहेत. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संतोष शिंदे करीत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात लॉक डाऊन लावणे म्हणजे उद्योजकांना खुश करणे, जलील यांचे वक्तव्य लॉकडाऊनच्या विरोधात इम्तियाज जलील करणार आंदोलन. 31 मार्च ला करणार आंदोलन. वैद्यकीय विभागात भरती करावी मागणीसाठी जलील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. जलील यांचा लॉकडाऊनला विरोध
कोल्हापुरात मद्यधुंद पोलिसांची पोलीस उपअधीक्षक यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ ,
कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात दोन पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल ,
महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी शनिवारी रात्री कसबा बावडा परिसरात उघड्यावर करत होते मद्यप्राशन,
उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांना हटकले असता वादावादीला सुरुवात,
मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून केली धक्काबुक्की,
बळवंत पाटील, राजकुमार साळुंखे आणि जितेंद्र देसाई यांच्यावर गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील चोपडा उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय सूत्रांनी मात्र पाच जणांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं असलं तरी ते वयोवृद्ध असल्याने आणि गंभीरतेने मरण पावल्याच म्हटलं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता तुरुंगात देखील जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सबजेल मधील 24 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला सबजेलमध्ये 54 कैदी आहेत. त्यातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली होती. तपसणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांना सबजेलमध्येच वेगळे ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित कैद्यांना सबजेलमधील दुसऱ्या बराकमध्ये हलवले आहेत.
सोलापुरच्या शासकीय रुग्णालयातील 17 डॉक्टर आणि नर्स मिळून 30 जण कोरोना बाधीत झाल्याचं समोर आलं आहे तर सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातले 43 पोलीस प्रशिक्षार्थी बाधीत आढळले आहेत.
अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मिठाई आणि नमकीन तयार करणाऱ्या दुकानांना पहाटे आग लागली. या आगीत 4 ते 5 दुकाने जळून खाक झालीत. अग्निशमनच्या आठ गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आग लागण्याचं मुख्य कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. मात्र, येथे वापरण्यात येणाऱ्या चुलीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत दुकानांचं लाखोंचं नुकसान झालंय. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 17 डॅक्टर आणि नर्स मिळून 30 जण कोरोनाबाधित. तर सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातले 43 पोलिस प्रशिक्षार्थी बाधित आढळले आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचा मध्यरात्री एका फार्म हाउसवर छापा, गंगापूर धरणाजवळील एका फार्म हाऊसवर संगीताच्या तालावर सुरु होती हुक्का पार्टी, मद्यधूंद अवस्थेतील 25 ते 30 जण पोलिसांच्या ताब्यात, महिलांचाही सहभाग, एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असतांनाच दुसरीकडे अशाप्रकारे सुरु होता धिंगाणा, ग्रामीण पोलिसांच्या धडक कारवाईने हॉटेल आणि फार्म हाऊस चालकांचे धाबे दणाणले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी भिवंडीतील सवाद येथे 818 बेडच्या भव्य अशा अत्याधुनिक सुविधायुक्त जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार कपिल पाटील, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिप अध्यक्षा सुषमा लोणे, आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक , आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर , अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे , भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर , तहसीलदार अधिक पाटील ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार आदी लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्णालय उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या आधारे फळ भाजीपाला विक्रीस शासनाने दिलेल्या परवानगीचा नांदेडकरांकडून फज्जा उडाल्याचं दिसून येतंय. भाजीपाला विक्रीची परवानगी असताना आठवडी बाजार भरवला जातोय.
जमावबंदीच्या आदेशानंतर सकाळी दादर मार्केट परिसरात मोठी गर्दी बघायला मिळाली. याठिकाणी कोरोनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होतांना दिसली. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नव्हता. त्याचसोबत नियमांचं उल्लंघन देखील होत होते. हे मार्केट इतरत्र हलवण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं. मात्र, येथील व्यावसायिकांनी याला विरोध केला होता. महापालिका प्रशासनाकडून मार्केट परिसरात ॲंटीजन चाचणी केल्यानंतर येथील भाजी विक्रेते पाॅझिटिव्ह आले होते. तरीही व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण नसल्याचं बघायला मिळत आहे. त्याच महापालिकेच्याही ढिसाळ नियोजनाअभावी येथील गर्दी कमी होत नसल्याचं निदर्शनास येत आहे.
पार्श्वभूमी
चिंताजनक! राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज तब्बल 35 हजार 726 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात आज मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातही लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज नवीन 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 2314579 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,03475 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.58% झाले आहे.
राज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सातत्यानं वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सरकारकडून Mission Begin Again काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
गोकुळ निवडणूक : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने कार्यक्रमात एकच हशा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोणता नेता कोणत्या गाडीसोबत उभा राहणार याची गणितं सुरू झाली आहेत. बैठकांचे सत्र दिवस-रात्र सुरू आहे. अशावेळी कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या कुस्तीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. पुस्तक प्रकाशन सोहळा लांबल्यामुळे सतेज पाटील भाषणाला उभे राहिले. भाषण करताना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात देखील दुधाची कुस्ती सुरू झाली आहे. बैठकीला उशीर झाल्यामुळे अनेक पैलवान आमची वाट बघत आहेत. त्यामुळे आम्हाला कार्यक्रमातून बैठकीला जाण्याची परवानगी द्यावी. आमचे वस्ताद हसन मुश्रीफ साहेब आहेत. ते आपल्या भाषणात शेवटचा पट सांगतील. सतेज पाटील असं म्हणतात शाहू स्मारक सभागृहांमध्ये एकच हशा पिकला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -