Breaking News LIVE : नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल

Breaking News LIVE Updates, 27 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2021 07:01 AM
नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल

नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल. रात्री पावणे नऊवाजता उडणारे विमान थांबवले. बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरु. ज्या व्यक्तीने कॉल दिला त्याचे तिकीटावरुनही एअरलाईन स्टाफसोबत भांडण झाले होते, अशी प्राथमिक माहिती. त्यामुळे हा खोडसाळपणा आहे की नक्की काय प्रकार याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरु. कॉल करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात.

लातूर जिल्ह्यात 483 कोरोनाबाधित रुग्ण तर 3 रुग्णाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात 483 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 3 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात 1027 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 126 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 2536 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 338 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30821 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 3682 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 732 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26407 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 181 आहे.

यवतमाळ कोरोना अपडेट

यवतमाळ जिल्ह्यात पाच मृत्युसह जिल्ह्यात 418 जण पॉझिटिव्ह. 392 जण कोरोनामुक्त. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2448 ॲक्टीव्ह रुग्ण. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या : 27151. बरे झालेल्यांची एकूण संख्या : 24095. तर एकूण 608 मृत्युची नोंद.

परभणी कोरोना अपडेट

परभणी जिल्ह्यातील रुग्णसंख्येतील वाढ कायम. आज जिल्ह्यात 246 नवीन रुग्णांची भर तर 8 रुग्णांचा मृत्यू. दिवसभरात 116 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज. सध्या एकुण 1382 रुग्णांवर उपचार सुरू.

नांदेड कोरोना अपडेट

आज एकूण 4257 टेस्टिंगपैकी 1073 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 554 आहेत. आज 638 बरे होऊन घरी गेले असून 16 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

चंद्रपुरात गेल्या 24 तासात 223 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

चंद्रपुरात गेल्या 24 तासात 223 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 3 जणांचा मृत्यू. काल 212 कोरोना रुग्णांची नोंद आणि 2 मृत्यू. एकूण कोरोना रुग्ण 26924.

कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच

कल्याण डोंबिवली क्षेत्रात  कोरोनाचा कहर सुरूच. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 829 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 7341 तर एका दिवसात 586 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज. 24 तासात कोरोना बाधित 3 रुग्णांचा मृत्यू.

औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन, सक्तीने होणार लॉकडाऊनची अंमलबजावणी.

औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन, सक्तीने होणार लॉकडाऊनची अंमलबजावणी.

राज्य सरकारचं Mission Begin Again,  रात्रीची जमावबंदीचे आदेश

राज्य सरकारचं Mission Begin Again,  रात्रीची जमावबंदीचे आदेश, पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी, 27 मार्चपासून जमावबंदी लागू, 15 एप्रिलपर्यंत निर्बंध राहणार 

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यम्बकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यम्बकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद. उद्यापासून 7 दिवस राहणार बंद. त्र्यम्बक नगरीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंदिरातील पूजाविधी सुरु राहणार.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावती पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालयात दाखल

अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावती पोलीस उप महानिरीक्षक यांच्या कार्यालयात दाखल. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवासा रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. जर श्रीनिवासा रेड्डी यांनी त्यावेळीच दखल घेतली असती तर आज दिपालीला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. त्यामुळे रेड्डीला देखील यात आरोपी म्हणून सहभागी करावं. खासदार नवनीत राणा यांची मागणी.

आलापल्ली स्थित भामरागड वनविभागाच्या सागवान डेपोला आग

गडचिरोली: आलापल्ली स्थित भामरागड वनविभागाच्या सागवान डेपोला आग लागली आहे. डेपो क्रमांक 2 मधील घटना, सागवानच्या एका लाटला लागली आग, आग विझविण्यासाठी घटनास्थळी वन विभाग व अग्निशमन दलाचे वाहन दाखल. वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली.

MPSC आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत- राष्ट्रवादी युवक काँग्रेस


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने MPSC च्या विद्यार्थ्यांवरील आंदोलनादरम्यान राज्यभर दाखल झालेले गुन्हे हे मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.  

DFO शिवकुमार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, DFO शिवकुमार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची घोषणाबाजी, तर वन कर्मचारी महिला देखील आक्रमक, शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांना फासावर लटकवा अशी मागणी 

DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण,  DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं,  न्यायालयाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी 

जागतिक रंगभूमी दिनी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळ सदस्यांचा प्रसाद कांबळी यांच्या एकाधिकारशाहीचा निषेध

नाट्यपरिषदेचे 40 पेक्षा जास्त नियामक मंडळ विरुद्ध प्रसाद कांबळी असा वाद गेले अनेक महिने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांनी पत्र पाठवून नियामक मंडळ सदस्य व विश्वस्त यांची बैठक  घेण्याचे सुचवले होते. शिवाय  आज ठरलेली  नियोजित बैठक प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी रद्द केली. या सर्व प्रकारावर व प्रसाद कांबळी यांच्या एकाधिकारशाहीचा निषेध आजच्या जागतिक रंगभूमी दिनी राज्यभरातल्या नियामक मंडळ सदस्यांनी फलक दाखवून तर व्हिडीओ करून व्यक्त केला. यात अभिनेते विजय कदम, विजय गोखले सविता मालपेकर, यतीराज वागळे, शिवाजी शिंदे आदींनी भाग घेतला. 


 

सिंधुदुर्ग : अवैध दारू वाहतुकीवर जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडीतील सातोळी बावळट येथे नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या दारूच्या ५०० बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून होत होती‌. समोर बॅरल लावत अगदी शिताफीने दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला. मात्र जिल्हा वाहतूक पोलीसांनी अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. इंदोर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ लाख ४ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त केला आहे. गोव्यातून नांदेड इथ ही दारू वाहतूक होत होती. पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली.

नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील महाराष्ट्र फर्निचर दुकानाला भीषण आग
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या पडोली पोलीस स्टेशन मागील महाराष्ट्र फर्निचर या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे लाकूड व फर्निचर जळून राख झााले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं.  मात्र आग आटोक्यात येइपर्यंत दुकानातील साहित्याची राख झाली होती.


 

लातूर जिल्ह्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी

लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन आता कडक अंमलबजावणी करतेय. आज लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. उद्यापासून चार एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू असतील. लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, पान सेंटर ,मंगल कार्यालय, सभागृह  बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, बियर बार या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑटो रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी असणार आहे. बसमध्ये नो मास नो एन्ट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Nigh Curfew: कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला. शिवाय या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 


Pune corona Guidelines | पुण्यासाठी नवीन कोरोना नियमावली; पाहा काय बंद काय सुरू?
 मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता आता कठोर पावलं उचलण्याचा इशारा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तूर्तास पुण्यात कोरोनाचे रुग्ण पाहता रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनापुढं उभी असणारी मोठी अडचण ठरत आहे. याच धर्तीवर सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरीही पुण्यात काही निर्बंध मात्र लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं काही सेवांवर याचा परिणाम होणार आहे. 


Pune Fire | पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग
पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये  रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय रेखाकला परीक्षा न घेण्याचा निर्णय
राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती विचारात घेतात शिक्षण विभागाने शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) 2020 न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जे दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे


IND VS ENG : इंग्लंडचं जोरदार प्रत्युत्तर; भारताचा 6 गडी राखून मालिकेत 1-1 अशी बरोबरी
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 336 धावांचा डोंगर इंग्लंडपुढे उभारला होता. असे वाटत होते की इंग्लंडला 337 धावांचे कठीण लक्ष्य साध्य करण्यात अडचण येऊ शकते. परंतु, जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकामुळे आणि बेन स्टोक्सच्या 99 धावांच्या जोरदार खेळीमुळे इंग्लंडला हे लक्ष्य सहज गाठता आले. नियमित कर्णधार मॉर्गनच्या अनुपस्थितीत इंग्लंड जोस बटलरच्या नेतृत्वात उतरला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. मात्र, भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 4 धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माही 25 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. कोहलीने 66 धावा केल्या तर राहुलने शानदार शतक ठोकले. यानंतर ऋषभ पंतने 77 धावा केल्या आणि हार्दिक पांड्यानेही 35 धावा केल्या.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.