Breaking News LIVE : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त, FEMA कायद्यार्तंगत ईडीची कारवाई

Breaking News LIVE Updates, 21st June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jun 2021 08:14 PM
मंत्रालयात पुन्हा एकदा बॉम्ब ठेवल्याचा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल

मंत्रालयात पुन्हा एकदा बॉम्ब ठेवल्याचा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल

महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या

काँग्रेसचा स्वबळाचा नारा,त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणातून काँग्रेसवर साधलेला निशाणा, प्रताप सरनाईक यांचा लेटर बॉम्ब, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या होणार

मोठा दिलासा, आज 13,758 रुग्ण बरे होऊन घरी, तर 6270 नवीन रुग्णांचे निदान, आज मृतांचा आकडाही शंभरीच्या आत 

Breaking News LIVE : मोठा दिलासा, आज 13,758 रुग्ण बरे होऊन घरी, तर 6270 नवीन रुग्णांचे निदान, आज मृतांचा आकडाही शंभरीच्या आत 
#Maharashtra #corona #coronacases  

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ED अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते.  राज्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची तीन ठिकाणी धाड; 29 लाख रुपयांच्या अवैध गुटखा जप्त, चार आरोपींना अटक

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची तीन ठिकाणी धाड; 29 लाख रुपयांच्या अवैध गुटखा जप्त, चार आरोपींना अटक

पुणे - धमकी, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे - धमकी, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल, दत्तवाडी पोलिस ठाण्यात स्थानिक भाजप नगरसेवक आनंद रिठे यांच्यावर गुन्हा दाखल, रिठे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे या इसमाने गळफास घेत आत्महत्या केलीय, आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांनी दत्तवाडी येथील इमारतीवर अनधिकृत टॉवर उभा केल्याची तक्रार नगरसेवक रिठे यांनी पालिकेत केली होती 

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त, FEMA कायद्यार्तंगत ईडीची कारवाई

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त, FEMA कायद्यार्तंगत ईडीची कारवाई

भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात भंगारच्या दुकानाला भीषण आग

भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात भंगारच्या दुकानाला भीषण आग, भंगाराच्या दुकानात मोठ्याप्रमाणात कपड्यांच्या चिंध्या ठेवण्यात आल्या होत्या, आगीचं मुख्य कारण समजू शकले नसून या आगीमुळे संपूर्ण भंगार दुकान जळून खाक झालं आहे,  कोणत्याही प्रकारची जीवित हानी नाही

एक महिन्यात निर्णय घेतला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करणार- खासदार संभाजीराजे छत्रपती

राज्याच्या समन्वयक यांनी निर्णय घेतला सरकारला 21 दिवसाची मुदत देतोय हवतर 1 महिना घ्या, एक महिन्यात निर्णय घेतला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करणार- खासदार संभाजीराजे छत्रपती

प्रदीप शर्मा यांना रोज 20 मिनिटे वकिलाला भेटता येणार

प्रदीप शर्मा यांनी वकिलाला भेटायची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. त्यानुसार त्यांना 12 ते 12:20 या काळात वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोज 20 मिनिटे भेटता येणार,  आरोपी सुनील मानेला 25 जूनपर्यंत NIA कोठडी मंजूर, न्यायालयीन कोठडीत असलेला सुनील माने पुन्हा एनआयएच्या ताब्यात, प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपींची आता होणार समोरासमोर चौकशी, या प्रकरणातले आणखी काही आरोपी फरार आहेत त्याची माहिती या आरोपींकडून मिळू शकते म्हणून आम्हाला कोठडी हवी आहे असं  एनआयएनं म्हटलं आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी शर्मा आणि वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुखची हत्या केली. मनसुखचा एकाने डावा हात पकडला होता तर एकाने उजवा. आम्हाला दोघांची अजून 10 दिवसांची कोठडी हवी आहे, एनआयएनं कोर्टाकडे केली होती मागणी.

उद्या नवी दिल्लीत विरोधकांची सर्वात मोठी बैठक

LIVE : उद्या नवी दिल्लीत विरोधकांची सर्वात मोठी बैठक, 15 पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार , शरद पवार यांचं निवासस्थान बैठकीचं केंद्रबिंदू

दिल्लीत शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसरी भेट

नवी दिल्ली : शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. मुंबईतील भेटीनंतर दिल्लीत दुसऱ्यांदा दोघांमध्ये बैठक होतेय. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान म्हणजेच, सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. कालच शरद पवार दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर पहिलीच भेट प्रशांत किशोर यांच्यासोबत होत आहे. 

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात शिबिराचे आयोजन
ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी लोणावळा इथे 26 आणि 27 जून रोजी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार असून सांगता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. या शिबिरासाठी संजय राठोड, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. तसंच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहेत.
सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका, सुनावणी सुरु

मुंबई : सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं दोन तास काम बंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी दोन तास काम बंद आंदोलन. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पूर्णपणे काम बंद करण्याचा संघटनेचा इशारा. कायमस्वरुपी पदभरती, कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरु करा यासह विविध मागण्या

नाशकात आज मराठा मूक आंदोलन, थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी दाखल होणार

नाशिक : नाशकात आज होणाऱ्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे. 

मुंबईतील मालाडमधल्या चिकुवाडी परिसरातील गोदामात लागलेली आग आटोक्यात, मोठं आर्थिक नुकसान

मुंबईतील मालाड परिसरातील चिकुवाडी परिसरात लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांच्या मदतीने आणि जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. रविवारी रात्री साडेआठ वाजता मोठी आग लागली होती. चार गोदामात ही आग पसरली होती. आगीचे मोठे लोट यावेळी परिसरात बघायला मिळाले. या गोदामात क्वॉरन्टीन सेंटरसाठी लागणारे साहित्य होते. ज्यात गाद्या, लोखंडी बेड्ससह इतर साहित्याचा समावेश होता. तर इतर गोदामात प्लास्टिक आणि फायबरचे सामान होते. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

भुसावळमध्ये वाहनाच्या धडकेत दोन तरुण मृत्युमुखी, वाहन चालक पसार
भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर रविवारी (20 जून) रात्री अकराच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. साकेगावकडून भुसावळच्या दिशेने भुसावळातील तरुण दुचाकी ने येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अल्ताउद्दीन बशिरोद्दीन शेख (वय 24 वर्ष) आणि शेख शरीफ शेख इद्रीस (वय 25 वर्ष) या तरुणांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने इतकी जोरदार धडक दिली की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

पार्श्वभूमी

रविवारी राज्यात 9,101 रुग्ण बरे होऊन घरी, 9,361 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या जवळ


राज्यात काल (20 जून) 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 9,101 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 इतकी झाली आहे. काल 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यत सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. सरसकट अनलॉकमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईत 19 जून रोजी एकही नव्या रुग्णाची नोंद नव्हती, तर 20 जून रोजी 178 नवीन रुग्णांची नोंद झाली. ठाणे शहरात परवा 61, कल्याण डोंबिवलीत 36, पालघरमध्ये 94 रुग्णांची नोंद झाली होती तर काल ठाणे शहरात 129, कल्याण डोंबिवलीत 113, पालघरमध्ये 353 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,72,781 (15.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96,297 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,683 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


आमदार प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना-भाजप युती करण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना-भाजप युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र आमचं स्पष्ट मत आहे की, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना काय उत्तर द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता कुणासोबत कुणी जायचं  त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 


'काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र' : जयंत पाटील 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर राज्यातल्या राजकारणात चर्चेला ऊत आला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) स्वबळाच्या घोषणांवर टोला लगावल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आता जरी स्वबळावर बोलत असली तर परिस्थिती येईल त्यावेळी सगळे आम्ही एकत्र लढू असं आम्हाला वाटतं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 


सचिन तेंडुलकर एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज; संगकाराला मागे टाकलं


महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. स्टार स्पोर्ट्स पोलमध्ये सचिन तेंडुलकरने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा 21 व्या शतकाच्या महान फलंदाजाच्या शर्यतीत पराभव केला. स्टार स्पोर्ट्सच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. गावस्कर म्हणाले की, एकविसाव्या शतकातील महान फलंदाजांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी 2013 मध्येच कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. मात्र, आठ वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरला या शतकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.