Breaking News LIVE : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार

Breaking News LIVE Updates, 14 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jun 2021 08:01 PM
हयात रिजन्सीच्या व्यवस्थापना विरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल,

हयात रिजन्सीच्या व्यवस्थापना विरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल, 


सहायक कामगार आयुक्तांचं कामगार हयात रिजन्सीला नोटीस , उद्या दुपारी 1 वाजता हयात रिजेसीच्या व्यवस्थापनाला कामगार आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश,


हॉटेल बंद झाल्यानंतर कामगारांच्या थकीत वेतनाबाबत केली होती तक्रार

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहे. एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार आहे. मात्र उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी देण्यात आली असून  तब्बल 13 हजार जागांसाठी भरती होणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे भरती  रखडली होती. 

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार, एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार,


 मात्र उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार,


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी,


 तब्बल 13 हजार जागांसाठी होणार भरती,


मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे रखडली होती भरती,

सांताक्रुझ पोलिसांकडून अभिनेत्रीला ड्रग्ज घेतल्याच्या प्रकरणात अटक

मुंबई: सांताक्रुझ पोलिसांकडून जुहुतील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापामारी, एका अभिनेत्रीला ड्रग्ज घेतल्याच्या प्रकरणात केले अटक, नायर शहा असं अभिनेत्रीचं नाव

रिटायर पोलीस आधिकाऱ्याने स्वत:च्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या, नवी मुंबईतील घटना

रिटायर पोलीस आधिकाऱ्याने स्वत:च्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या, नवी मुंबईतील घटना,  ऐरोली सेक्टर 2 मधील घटना,  मुलांना घरी बोलवून स्वत:कडे असलेल्या रिव्हाल्वरमधून घातल्या गोळ्या , एका मुलाला दोन गोळ्या लागल्याने मुलगा गंभीर जखमी, दुसऱ्या मुलाला गोळी चाटून गेल्याने थोडक्यात वाचला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू,  आरोपी रिटायर पोलीस अधिकारी भगवान पाटीलला रबाले पोलीसांनी अटक केली 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,


बांदा दाणोली रस्ता पाण्याखाली,


दोडामार्ग तालुक्यातील भेडशी राज्यमार्गावरील काजवे पाण्याखाली ,


कसाल मालवण रस्ता पाण्याखाली,


जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकल भागातील रस्ते पाण्याखाली,

घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू


घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू


मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे अॅड. धृती कपाडिया यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू


दक्षिणेतील आंध्रप्रदेशनंही आता ज्येष्ठ नागरीकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण सुरू केलंय, याचिकाकर्त्यांची माहिती

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात भेट, राज्य सरकारला सुचवले काही उपाय

पुणे : खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आले. या दोघांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय सुचवले.  संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक तर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असा पर्याय सुचवला तर दुसरा पर्याय हा वेगळा मागासवर्गीय आयोग नेमावा.  हा आयोग राज्यपालांकडे अहवाल देईल. राज्यपालांकडून तो राष्ट्रपतींकडे जाईल आणि तिथून तो राष्ट्रपतींना योग्य वाटल्यास  केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल आणि राष्ट्रपतींना योग्य वाटल्यास तो देशाच्या संसदेत हा विषय जाईल असा दुसरा पर्याय सुचवला.  तर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारने या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

तळकोकणातील वैभववाडीत आदम नाचरे या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्याने मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. यात वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील मेहबूब नगर येथील आदम बापू नाचरे वय वर्षे 55 हे शेतामध्ये जनावरे घेऊन गेले असता वाहून गेल्याची घटना घडली आहे. ते घरी परत न आल्याने ग्रामस्थ शोधायला गेले असता त्यांचा मृतदेह बंधा-यातील पाण्यात सापडला. ओहोळ मधील पाण्याचा अंदाज न आल्याने सदर घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेनं उभारलं लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने प्रशासन आता सज्ज झालंय. प्लेइंग वॉर्ड, पन्नास ऑक्सिजन बेड आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र बेड अशी सुविधा इथं उपलब्ध आहे. 

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल, काय सुरु काय बंद? 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले आहेत. शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरु राहणार आहेत. तर विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कारही नियमितपणे पार पाडता येणार आहेत. सोलापूर शहारातील निर्बंध पूर्णपणे शिथील झाले असले तरी ग्रामीण भागात मात्र काही निर्बंध लागू असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील नियमानुसार ग्रामीण भागात निर्बंध कायम असतील. 



सोलापूर शहरात काय सुरु काय बंद? 

 

- खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्‍के उपस्थिती
- अंत्यसंस्कारासाठी कोणतीही मर्यादा नसणार; पूर्वीप्रमाणे अंत्यविधी होतील

- लग्न सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी

- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, मॉनिंग वॉक नियमितपणे सुरु 
- क्रीडा, मनोरंजन, जीम, मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
- सलून, स्पा, ब्युटी पार्लर, बससेवा, मालवाहतूक नियमितपणेच सुरु

 

परभणीच्या पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर; फळा,सोमेश्वर,घोडा,उमरथडी,आरखेड संपर्क तुटला

परभणी : परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच पाणी पाणी झाले असुन अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पाणी आलय.पालम तालुक्यातील लेंडी नदीला तर पुर आला असुन पुरामुळे या परिसरातील आरखेड,फळा,सोमेश्वर,घोडा,उमरथडी या ५ गावांचा संपर्क तुटलाय.पुलावरून पाणी जात असल्याने गावकऱ्यांची येजा बंद झाली होती.लेंडी नदीवर कमी उंचीचा पुलं असल्याने दरवर्षी इथे हि समस्या उभी राहते वारंवार मागणी करूनही या पुलाचे काम न करण्यात आल्याने स्थानिक गावकऱ्यांना रहदारीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. 

लर्निंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही, घरबसल्या देता येणार परीक्षा

शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी अनेकांना आरटीओत जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार जोडणी महत्वाची असून कोणतीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल. ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून अंमलात आणली गेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत डीलरमार्फत वाहन नोंदणीची प्रक्रिया देखील आॅनलाइन करण्यात आल्याने. वाहन खरेदी केल्यानंतर वाहन नोंदणीसाठी आरटीओत होणाऱ्या खेपा आता कमी होणार आहे. दरम्यान, ह्या दोन्ही सेवा आॅनलाइन झाल्या असल्या तरी त्या ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे.

बीड : उसनवारीवर घेतलेली रेमेडेसिवीर औषध खाजगी रुग्णालये परत करत नसल्याने नोटीस

बीड : कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी महत्वाचे असलेले रेमेडेसिवीर औषधांचे इंजेक्शन उसनवारी खाजगी रुग्णालयांना दिले खरे पण आता बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालय प्रशासनाकडे हे औषध परत करायला तयार नाहीत. बीड जिल्ह्यातील 20 ते 25 खाजगी रुग्णालयांना 800 पेक्षा जास्त रेमेडेसिवीर इंजेक्शन हे जिल्हा प्रशासनाकडून उसनवारीवर देण्यात आले होते. मात्र वारंवार मागणी केल्यानंतरसुद्धा या खाजगी रुग्णालयाने हे औषध परत केले नाही म्हणून अखेर जिल्हा प्रशासनाने या खाजगी रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आणि लवकरात लवकर हे इंजेक्शन परत करण्यास संदर्भातली तंबी दिली आहे. 

नांदेडमध्ये गुप्तधन शोधणारी टोळीला बेड्या

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद करण्यात आली. पोलिसांनी आठ जणांविरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. वाका शिवारात ढोंगी बाबाकडून पूजाअर्चा करुन गुप्तधन शोधकार्य सुरु होते. यावेळी पोलिसांनी ढोंगीबाबासह आठ जणांना ताब्यात घेतलं. तर यातील सहा जण अद्याप फरार आहेत.  पूजा अर्चा करण्याच्या ठिकाणी हळद-कुंकू ,काळी बाहुली, लिंब, बांगड्या असा ऐवज पोलिसांच्या हाती लागला. यातील ढोंगी बाबा हा परभणी जिल्ह्यातील पूर्णा इथला मूळ निवासी असून त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : अंबुलन्स गेल्या काही दिवसांपासून उद्घाटना वाचून तशाच पडून

औरंगाबाद : सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी एक म्हण आहे. एकीकडे आजही ग्रामीण भागातील कोरोना आजही म्हणावा तसा आटोक्यात नाही. त्यात औरंगाबादच्या ग्रामीण रुग्णालयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नऊ अंबूलस मिळाल्या मात्र या अंबुलन्स गेल्या काही दिवसांपासून उद्घाटना वाचून तशाच पडून आहेत.  शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मात्र त्यांना वेळ मिळाला नाही आणि उद्घाटन राहून गेलं. केवळ मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी कोरो काळात या अम्ब्युलन्स पडून आहेत. 

बुलढाण्याच पैसे घेताना पोलीस कर्मचारी केमरात कैद; व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा : सर्व जनता कोरोना , लॉकडाऊन यामुळे आर्थिक संकटात असताना मात्र बुलढाणा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करण्यात मश्गुल आहेत. काल देऊळगाव राजा चिखली मार्गावरील वाकी फाटा येथे अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी अशाच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडून राजू गवळी नामक वाहतूक पोलीस कर्मचारी पैसे घेतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अरविंद चावरीया हे शिस्तप्रिय अधिकारी आहेत. आता बघूया या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होतेय...?

राज्यातील 68 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तकांकडून संपाचा इशारा

राज्यभरातील 68 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तकांनी संपाचा इशारा दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरेसे मानधन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यां संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्य सरकारकडून मिळणारं मानधन रखडलं असून केंद्र सरकारकडून मिळणारं मानधन तुटपुंजं आहे. शिवाय वाढीव मानधनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असा दावा कर कर्मचाऱ्यांनी 15 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, रोज 300 रुपये मानधन मिळावं, आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत तसंच सॅनिटायझर, मास्क यासह सुरक्षेचे साधनं मिळावीत इत्यादी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

सिंधुदुर्ग : खारेपाटण गगनबावडा राज्य मार्ग 171 वर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

सिंधुदुर्गातील खारेपाटण गगनबावडा राज्य मार्ग 171 वर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला, संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट ठरत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते, याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे उड्डाण पुलाला मध्यभागी रस्त्याला तडे

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे उड्डाण पुलाला मध्यभागी रस्त्याला तडे. उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक हायवे प्राधिकरणाने तात्काळ बंद केली. पहिल्याच पावसामध्ये कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे काम उघड. उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू

धुळे : रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार प्रथमच कोरोना बधितांची संख्या 0

रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार प्रथमच कोरोना बधितांची संख्या 0. जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल. नागरिकांना मिळाला दिलासा

रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार प्रथमच कोरोना बधितांची संख्या 0

रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार प्रथमच कोरोना बधितांची संख्या 0. जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल. नागरिकांना मिळाला दिलासा

कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, आजपासून निर्बंधात शिथिलता

कोविड पॉझिटिव्हीटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात गेला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात आणखी शिथिलता देण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने (सर्व बाजारपेठ, कापडपेठ, सराफपेठ) सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने (मटन, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह) सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी 7 ते सायंकाळी 4 सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार मात्र बंद राहतील. कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केटमधील सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 4  वाजेपर्यंत सुरु राहतील. बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.

राज्याच्या कृषी राज्यमंत्र्याच्या गावातच खताची टंचाई असल्याची राजू शेट्टींकडे तक्रार

सांगली : राज्याच्या कृषी राज्यमंत्र्याच्या गावातच खताची टंचाई असल्याची तक्रार राजू शेट्टीकडे यांच्याकडे करण्यात आली आहे. कडेगांव  येथील अंजली अमित पवार या शेतकरी महिलेने थेट राजू शेटटी यांच्याकडे खत टंचाईची कैफियत मांडली आहे. कृषी राज्यमंत्र्यांच्या गावात ही परिस्थीती असेल तर राज्यातील शेतकरी या खतटंचाईच्या संकटाचा कसा सामना करत असेल? असं राजू शेटटी म्हणाले आहेत. सरकारने खताच्या साठ्याची आकडेवारी जाहीर न करता खतपुरवठा होण्यासाठी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. 

हिंगोलीत राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथे घडली. चारचाकी खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा इथले रहिवाशी होते. रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही घटना घडली. 

रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात काल (रविवारी) 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 7,504 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही


Maharashtra Corona Cases : राज्यात काल 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


15 जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद


सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 9 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर शहर, चंद्रपूर जिल्हा, परभणी शहर, हिंगोली, सोलापूर शहर, नंदूरबार, धुळे शहर, धुळे जिल्हा, अहमदनगर शहर, भिवंडी शहर, उल्हासनगर शहरात एकाही मृत्यूची नोंद आजच्या सरकारी आकडेवारीत नाही. तर नवी मुंबई शहर, रायगड जिल्हा, मालेगाव शहर, जळगाव शहर, सांगली शहर, जालना, लातूर शहर, नांदेड शहर, नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया जिल्हा या ठिकाणी एका मृत्यूची नोंद झाली आहे. 


मुंबई पोलिसांना सुशांतच्या एडीआर तपासात काहीच संशायस्पद आढळलं नाही, तपास थांबवण्याच्या विचारात यंत्रणा


आज (14 जून) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु, देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळख असणाऱ्या सीबीआयच्या हातीही काहीच लागलेलं नाही. 


आजच्याच दिवशी 14 जून 2020 रोजी, एका वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळ्याला फास लावत आत्महत्या केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एजीआर रजिस्टर करत तपास सुरु केला होता. या दरम्यान बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीऱ्याच्या आधारे त्याच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिचं कुटुंब आणि मॅनेजर श्रुती मोदीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 


काही दिवसांनी हे प्रकरण बिहार सरकारच्या परवानगीनंतर सीबीआयकडे सोपण्यात आला. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एफआयआर जरी सीबीआयकडे असेल आणि तपास सुरु असेल, पण आमच्यावर अद्यापही एडीआरचा तपास सुरु आहे. ज्याला आम्ही अद्याप बंद केला नाही. कारण आम्ही प्रत्येक अँगलनं या प्रकरणी चौकशी करत आहोत. पण अद्याप आम्हाला काहीच संशयास्पद मिळालेलं नाही, ज्याच्या आधारे आम्ही एडीआरला एफआयआरमध्ये कन्वर्ट करता येईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.