Breaking News LIVE : सीबीएसई बोर्डानंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Breaking News LIVE Updates, 1 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jun 2021 09:34 PM
मुंबई : परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरण, तक्रारदार गजेंद्र पाटील यांची दुसऱ्या दिवसाची चौकशी पूर्ण

मुंबई : परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरण, तक्रारदार गजेंद्र पाटील यांची दुसऱ्या दिवसाची चौकशी पूर्ण, उद्या पुन्हा चौकशीसाठी होणार हजर, आजच्या चौकशी दरम्यान भ्रष्टाचाराचे  पुरावे केले सादर, मंत्रालयातील सह सचिव  प्रकाश साबळेआणि अवर सचिव डी एच कदम यांचाही नोंदवण्यात आला जबाब, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीची मुदत 5 दिवसांनी वाढवून दिली, या प्रकरणी सखोल चौकशी होणार, संबंधितांचे बँक खाते ही तपासले जाण्याची शक्यता

सीबीएसई बोर्डानंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सीबीएसई बोर्डानंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय


 
राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार

राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत आज झाली चर्चा, केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्यात बदल करत आहे.  या बदलांमुळे राज्यातील जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. या बँका कशा वाचवता येतील यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या मंत्र्यांची टास्क फोर्स नियुक्ती करण्याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. या कायद्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी आहे. या बँका वाचवण्यासाठी काय पावले उचलायची नवे कायदे करायची का याबाबतही टास्क फोर्स चर्चा करुन निर्णय घेणार आहे.

राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार

राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत आज झाली चर्चा, केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्यात बदल करत आहे.  या बदलांमुळे राज्यातील जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. या बँका कशा वाचवता येतील यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या मंत्र्यांची टास्क फोर्स नियुक्ती करण्याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. या कायद्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी आहे. या बँका वाचवण्यासाठी काय पावले उचलायची नवे कायदे करायची का याबाबतही टास्क फोर्स चर्चा करुन निर्णय घेणार आहे.

हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी मागितली 3 लाखांची लाच

हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी मागितली 3 लाखांची लाच. वाळूचे 5 टिप्पर सोडण्यासाठी लाचेची मागणी. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीच्या पथकाची कारवाई.

मराठा आरक्षण मुद्यावर घडामोडींना वेग

मराठा आरक्षण मुद्यावर घडामोडींना वेग. मराठा समाजाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. भाजप नेते राधाकृष्ण यांच्या समवेत झाली बैठक. राहाता तालुक्यातील लोणी गावात बैठक. पुढच्या दहा दिवसांत मराठा आमदार, खासदार यांसह राज्यातील पदाधिकारी घेणार बैठक. एकाच व्यासपीठावर येऊन लढा देण्याचं विखे यांनी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत आज बैठक झाली. सर्व संघटना एकत्रितपणे लढा देणार असून लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभे करणार. राधाकृष्ण विखे पाटील यांचं संगमनेरमध्ये वक्तव्य.

अत्यावश्यक नसलेली दुकाने सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली करण्याची मिलिंद देवरा यांची मागणी

अत्यावश्यक नसलेली दुकाने सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली करण्याची मिलिंद देवरा यांची मागणी, राज्याच्या मुख्य सचिवांसोबतही चर्चा 

शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, शरद पवार कार्यालयात पोहोचले

शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, शरद पवार कार्यालयात पोहोचले, जयंत पाटील,अजित पवार, वळसे पाटील, धनंजय मुंडे,नवाब मलिक, राजेश टोपे,बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात उपस्थित

दौंड तालुक्यातील यवत येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कांचन हॉटेलला भीषण आग

दौंड तालुक्यातील यवत येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कांचन हॉटेलला  भीषण आग. हॉटेलची संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडलीय. आग विझविण्यासाठी 2 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. आगीचे कारण अस्पष्ट, आगीत कोणतीही जीवितहानी नाही.

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत हद्दीतील सुप्रसिद्ध कांचन हॉटेलला आग, आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक.

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत हद्दीतील सुप्रसिद्ध कांचन हॉटेलला आग, आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक.

सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

सीरम इन्स्टिट्युटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. याशिवाय केंद्र सरकारतर्फे सीआरपीएफ जवानही त्यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले असल्याची हायकोर्टात माहिती देण्यात आली आहे. लसींच्या पुरवठ्यावरून पुनावाला यांना आलेल्या धमकीसंदर्भात हायकोर्टात अॅड. दत्ता माने यांनी याचिका दाखल केली होती. 

जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिडा सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नये : विजय वड्डेटीवार

जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिडा सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नये असं मंत्री विजय वड्डेटीवार म्हणाले. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, प्रत्यक्ष जाऊन भेट घेणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. जातीनुसार जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही गोष्टी करणे शक्य नाही. आगामी काळात निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण उरलेलं नाही असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक रुग्णालयात दाखल

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक रुग्णालयात दाखल. सीबीएसई बारावीच्या परिक्षांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी घेणार होते बैठक. पण, कोरोनानंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

उस्मानाबादमध्ये सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची कारवाई

उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी शिवारात सव्वा कोटींचा गांजा सोमवारी रात्री पकडण्यात आला आहे . गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दोन आरोपीनी धूम ठोकली आहे . मस्सा खंडेश्वरी शिवारातील एक शेतात गंजीमध्ये गांजा दडवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती . या पथकाने शेतातील गंजीत लपवून ठेवलेल्या गांजा पकडला तेव्हा तब्बल 47 पोत्यांमध्ये बांधून ठेवलेला गांजा या पथकास आढळून आला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे 1 कोटी 24 लाख 59 हजार 260 रुपये इतकी आहे. 

३१ जुलै पर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी

आजपासून ३१ जुलै पर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी करण्यात आली आहे. मत्स्य विभागाच्या धोरणानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जनत होते. सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पारंपारिक पद्धतीने मसेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांस याकालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981, कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शिक्षा लागण्यात येईल.

पवारांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भेट, नवाल मलिकांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला घेतली असं राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक म्हणाले. विरोधकांची भेट घेणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, यामागे दुसरा कोणताही राजकीय विषय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

पदोन्नती आरक्षण बैठकीला सुरुवात

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात , नितीन राऊत, वर्षा गायकवाड  हे मंत्री उपस्थित आहेत. 

फडणवीस- शरद पवार भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका: संजय राऊत

विरोधी पक्षाचं सरकार राज्यात येणार नाही, असंही शरद पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल: संजय राऊत 

मुलीच्या प्रेम विवाहावरुन धारदार शस्त्राने वार करून 40 वर्षीय महिलेची हत्या 

मुलीच्या प्रेम विवाहास कारणीभूत असल्याच्या वादातून किनवट तालुक्यातील इस्लापुर नजीकच्या बुरकुलवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून चाळीस वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडलीय. ईस्लापूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरुकुलवाडी या गावी द सकाळच्या सुमारास बेबीबाई भीमराव चव्हाण वय 40 वर्षे ही महिला घरासमोरील जनावराचा गोठा साफ करीत असताना सुरेश धनसिंग राठोड या निवृत्त सीआरपीएफ जवानाने  त्यांच्या मुलीचा प्रेम विवाह गेल्या सहा महिन्यापूर्वी गावातील सोनू रंगराव जाधव यांच्यासोबत  बेबी बाईने लावून दिला या संशयातून ही हत्या केलीय.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू... मूल तालुक्यातील सुशी गावाजवळील जंगलातील घटना, वैशाली मांदाडे असं मृतक महिलेचं नाव असून ती सुशी या गावातील रहिवासी आहे, आज सकाळी सरपण गोळा करायला जंगलात गेली असताना वाघाच्या हल्ल्यात झाला मृत्यू

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी गावाजवळील जंगलातील ही घटना घडली आहे. वैशाली मांदाडे असं मृतक महिलेचं नाव असून ती सुशी या गावातील रहिवासी आहे, आज सकाळी सरपण गोळा करायला जंगलात गेली असताना वाघाच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. 

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा सक्रिय, आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत चर्चा

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पक्षाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मुंबईत संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा अशा विविध मुद्द्यांवर काय भूमिका घ्यायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या हायप्रोफाईल केसेस त्यांनी पाहिल्या आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणात ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे वकील आहेत.

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्यांची; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी दहा वाजता बैठक

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणारी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी आज खास बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.  आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी दहा वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत

केमिकल घेऊन जाणारा टँकर आणि आयशर ट्रक यांच्यात सामोरा समोर धडक होऊन दोन्ही वाहनांनी घेतला पेट

केमिकल घेऊन जाणारा टँकर आणि आयशर ट्रक यांच्यात सामोरा समोर धडक होऊन दोन्ही वाहनाने पेट घेतल्याची घटना मध्य रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ घडली.अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहने जळून खाक तर झालीच शिवाय 2 जणांचा होरपळून मृत्यू  झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.केमिकल टँकर पुणे येथून राजस्थान कडे जात होता तर आयशर ट्रक  मनमाडकडे येत असतांना हा भीषण अपघात झाला.

बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल करणार घोषणा, सूत्रांची माहिती

बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून उद्या शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषीय माहिती देण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? 
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे.  वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे. 


कोरोनाची लाट ओसरतेय; राज्यात आज 15077 रुग्णांची नोंद
राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 93.88 टक्क्यांवर पोहचला आहे. 14 मार्च रोजी राज्यात 15051 रुग्णांची नोंद झाली होती. 
दरम्यान आज 184 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के आहे. राज्यात सध्या 2 लाख 53 हजार 367 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 53 लाख 95 हजार 892 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 95 हजार 344 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे. 


बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल करणार घोषणा, सूत्रांची माहिती
 बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून उद्या शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषीय माहिती देण्याची शक्यता आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे.  यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.