Breaking News LIVE : विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
Breaking News LIVE Updates, 04 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा,
एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार,
ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार,
स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग
विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता धूसर,
कोविड परिस्थितीच कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता,
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का?
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एकूण 20 विषय घेण्यात आलेले आहेत
विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ,
सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी विधान भवन परिसरात कोरोना चाचणी सुरू आहे,
शनिवारी एकूण 2200 जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह ,
एक लिपिक, फायरमन आणि दोन शिपाई यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,
रविवारी सुरू असलेल्या चाचण्यांचा अहवाल अजून येणं बाकी आहे,
भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीनची लहान मुलांसाठीची क्लिनिकल चाचणी नागपुरात सुरु असून चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात तब्ब्ल 18 टक्के मुलांच्या शरीरात आधीच अँटीबॉडी आढळून आले आहे. त्यामुळे 100 पैकी 18 मुले आधीच कोरोनाबाधित होऊन बरे झाली आहेत. याची त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्याची कल्पना नसल्याचे समोर आले आहे..
नागपूर जिल्ह्यातील खापरी येथील स्वामी विवेकानंद मिशन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लॅन्टचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्या हस्ते करण्यात आले. एनके गर्ग फाउंडेशनच्या वतीने हा रोज 70 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरू शकेल एवढ्या शखेमतेचा हा ऑक्सिजन प्लॅन्ट रुग्णलयाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे गोर गरीब रुग्णांना सेवा देणाऱ्या स्वामी विवेकानंद मिशन हॉस्पिटलची ऑक्सिजनची गरज पूर्ण होऊ शकणार आहे.
सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचं स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय. गेली दोन वर्षे झाले कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे,आमच्यावर जे संकट आले ते इतर कुणावर नको यायला अशी कळकळीची विनंती स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांनी केलीय
सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचं स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय. गेली दोन वर्षे झाले कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे,आमच्यावर जे संकट आले ते इतर कुणावर नको यायला अशी कळकळीची विनंती स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांनी केलीय
सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचं स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय. गेली दोन वर्षे झाले कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे,आमच्यावर जे संकट आले ते इतर कुणावर नको यायला अशी कळकळीची विनंती स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांनी केलीय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करु; अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
भिवंडी : इंधन दरवाढीच्या विरोधात भिवंडीत काँग्रेस ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातीलतील शेलार नदीनाका परिसरात इंधन दरवाढी विरोधात मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भिवंडी वाडा रस्ता रोखून धरला होता त्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आंदोलन संपल्यानंतर वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांनी ही वाहतूक मोकळी केली आहे.
नाशिक : नाशिक वाडा दुर्घटनेप्रकरणी 24 तास उलटूनही गुन्हा दाखल न करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. काल संध्याकाळी शहरातील घनकर लेन परिसरात असलेला वैश्य वाडा अचानक पत्त्याच्या इमल्याप्रमाणे खाली कोसळला. या दुर्घटनेत वाड्यातील संगीता वैश्य आणि रित्या वैश्य या दोन महिला दुसऱ्या मजल्यावरून खाली खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले असून सध्या जिल्हा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या वाड्याला लागूनच संजय जोशी यांचा वाडा नूतनीकरण करत उभारणीचे काम सुरू होते आणि त्याचेच हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचा आरोप केला जात असून याप्रकरणी पोलिस तसेच महापालिकेकडून अद्याप पावेतो कुठलीच कारवाई केली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 1 हजार 456 मिळकती या धोकेदायक असल्याचं महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलं असून त्यांना फक्त नोटीस देण्याचं कामं महापालिकेकडून करण्यात आलय त्यामुळे ही घटना बघता तरी पालिकेला जाग येणार का ? हा प्रश्न आहे.
स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. राज्यशासनाला पार्थ पवार, आदित्य ठाकरे यांच्या करिअरची चिंता आहे अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात लाखो शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, अनेक विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत, केवळ नियुक्त्या न दिल्याने प्रक्रिया रखडलेली आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या दारावरती एमपीएससीची पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कला दिग्दर्शक राजेश सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदन ठाकरेंना अटक करण्यात आलीये. राजेश यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. तर लेबर युनियनचे राकेश मौर्य, मिस्त्री नरेश विश्वकर्मा, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे चा शोध सुरुये. राजेश यांच्या पत्नी सोनालींनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारी 790 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 407 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजअखेर 1,96,629 बाधित सापडले आहेत तर 182,557 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला.
रत्नागिरी : रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत विरोधाची भूमिका घेतल्याने शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील 50 ते 70 कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी रिफायनरीला समर्थन केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नाणारचे विभाग प्रमुख राजा काजवे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरी आंर्बेरकर यांच्या सुद्धा समावेश आहे. पंचक्रोशीतले सक्रीय कार्यकर्ते आणि सदस्य भाजपमध्ये जाणार करणार असल्यांन शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे.
नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये एका 12 दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे. 20 जून रोजी जन्मलेल्या या बाळाला जन्मानंतर सहा दिवसांनी ताप आल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि ती पॉझिटिव्ह आली होती. तर 20 जूनला प्रसूतिपूर्वी त्याच्या आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 2 जुलै रोजी या बाळाचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही कॉम्प्लिकेशनही होते. त्याचे हृदय नीट काम करत नव्हते.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कर्ली खाडीपात्रालगत हाऊस बोट किनाऱ्यावर आणत असता अचानक जॅक सुटून अपघात घडला. यात बोट अंगावर पडल्याने संतोष सूर्यकांत सारंग या कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत निवती पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. कर्ली खाडीपात्रालगत असलेली एक हाऊसबोट किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान अचानक बोटला लावलेला जॅक अचानक सुटल्याने बोट संतोष सारंग या कामगाराचा अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बायजीपुरा येथील इंदिरानगरच्या दानिश खान यांच्या नावे हिना किराणा स्टोअर्सबर ब्लू डार्ट कुरियरने अमृतसर येथील अरमान इंटरप्राईजेसकडून लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अमृतसर येथून पार्सलमध्ये आलेल्या तलवारी पार्सल आणि पार्सलचे वाहन जप्त केले. दानिश खानला ताब्यात घेतले आहे. या पूर्वीही या व्यक्तीने अशाच प्रकारे तलवारी मागवल्या होत्या. एवढ्या तलवारी मागवण्याचे काय कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
सोलापूर : पोलिसांनी परवानगी नाकारलेली असलेली तरी सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने या मोर्च्याला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र गुन्हे दाखल झाले तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. संपूर्ण सोलापूर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून शहराकडे येणारे सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय सोलापूर शहरात आज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मध्यप्रदेश आणि गुजरातमधील पर्यटकांची संख्या जास्त आहे.
पार्श्वभूमी
Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चा, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलक ठाम
मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; आमदाराचे स्वपक्षीय मंत्र्यावरच गंभीर आरोप
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेत देखील गटबाजी असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी मी पक्ष सोडून जावे यासाठी मला स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते अपमानास्पद वागणूक देत आहेत, असा थेट आरोप एरंडोल-पारोळाचे आमदार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, "अलीकडेच पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख देण्यात आला आहे. मात्र याबाबत मला साधे विचारात सुद्धा घेतले नाही, माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत मला साधी माहिती देखील देण्यात आली नाही. ही बातमी मला वर्तमानपत्रात वाचल्यावर लक्षात आली. तसेच निधीच्या बाबतीतसुद्धा स्थानिक पातळीवर इतर आमदारांना जसा निधी दिला जातो, तसा आपल्याला दिला जात नाही.", असं म्हणत हेतुपुरस्कर आपल्याला डावलल जात असल्याचा आरोप करीत आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
शनिवारी राज्यात 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -