Breaking News LIVE : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, रॅकेटच्या कारभाराबाबत कुंद्राच्या कर्मचाऱ्यांची प्रॉपर्टी सेलला सविस्तर माहिती

Breaking News LIVE Updates, 25 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2021 10:55 AM
राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, रॅकेटच्या कारभाराबाबत कुंद्राच्या कर्मचाऱ्यांची प्रॉपर्टी सेलला सविस्तर माहिती
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात तपास करत असलेल्या प्रॉपर्टी सेलला मोठं यश आलं आहे. राज कुंद्रा याच्या अडचणीत वाढ होणार असून राज कुंद्राचे चार कर्मचारी साक्षीदार बनणार आहेत. हा रॅकेटचा कारभार कसा चालत होता, याबद्दल सगळी माहिती या कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबात दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज कुंद्रा याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

अमरावती : जिल्ह्यातील पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. कृषिमंत्री यांनी आज पिकविमा कंपनीच्या इक्को टोकियो कार्यालयात भेट दिली, त्यावेळी तिथे गोदाम सारखी स्थिती आढळली. आधी कृषिमंत्री यांना जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पिकविमा कार्यालय असल्याचं सांगितलं. पण तिथं गेल्यावर कार्यालयच नव्हतं. त्यामुळे कृषिमंत्री चांगलेच संतापले. जिथं कार्यालय आहे. तिथं मला घेऊन चला म्हटल्यावर कृषी अधिकारी आणि पिकविमा अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. 

पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात आढळलं छुपं कपाट

Raj Kundra : पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राची छुपी अलमारी सापडली. काल (शनिवारी) मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला. त्या कार्यालयात गुन्हे शाखेला एक छुपं कपाट सापडलं. क्राईम ब्रँचला या कपाटातून बऱ्याच बॉक्स फाईल आढळून आल्या आहेत. गुन्हे शाखेला त्या फाईलमध्ये क्रिप्टो करन्सीशी संबंधित माहिती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पार्श्वभूमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा, 11.30 वाजता चिपळूणमध्ये मुख्यमंत्री येणार, चिपळूणनंतर जाणार साताऱ्याला


आम्ही कोणाला सुरुंग लावत नाही, मात्र तेच आम्हाला सुरुंग लावण्याची संधी देतात : गुलाबराव पाटील








आम्ही कोणाला सुरुंग लावत नाही मात्र  तो लावण्याची संधी लोक आम्हाला स्वतःहून देत असतात, अशा प्रकारचं वक्तव्य जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शिवसंपर्क अभियानात केलं आहे. मुक्ताई नगर मतदार संघातील अडी अडचणी सोडविण्यासाठी मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यासाठी शिवसंपर्क अभियान आयोजित केलं होतं. या अभियानात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताई नगर येथील पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्याकडून विकास करण्यासाठी लागणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यातील ज्या त्वरित सोडविण्यासारख्या होत्या त्या सोडविणयासाठी यंत्रणेला सूचना आणि आदेश केले आहेत. 


मुक्ताई नगर हा गेल्या चाळीस वर्षांपासून एकनाथ खडसे यांचा बाले किल्ला राहिला आहे. मात्र या चाळीस वर्षात म्हणावा असा विकास या ठिकाणी होऊ शकलेला नाही, त्या पार्शवभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची हजेरी राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय राहिला आहे. थेट एकनाथ खडसे यांच्यावर नाव घेत टीका न करता गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की, "मागच्या काळात काय काम झाली किंवा नाही, या विषयावर टीकाटिपणी आपण करणार नाही, मात्र येत्या दोन वर्षात कधी झाला नसेल असा विकास या मुक्ताईनगरचा आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी जळगाव मनपामध्ये भाजप नगरसेवकांचा एक गट फुटून सेनेला येऊन मिळाल्याने जळगाव मनपामध्ये भाजपा ची सत्ता जाऊन सेनेची सत्ता आली असल्याचं पाहायला मिळाले आहे.


राज्यात काल (शनिवारी) कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू; तर 6,269 नवीन रुग्णांची नोंद


राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,269  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 29 हजार 817 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35टक्के आहे. 


राज्यात काल 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (56), यवतमाळ (9), गोंदिया (58), गडचिरोली (81) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.