Breaking News LIVE : आज दिवसभरात अकोला जिल्हाभरात कोरोनाचे 473 नवे रूग्ण

Breaking News LIVE Updates, 28 February 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2021 10:09 PM
याबाबत हुपरी पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहम्मद बंडू जमादार (वय 50) रा. तळंदगे फाटा ही स्क्रॅपचा व्यवसाय करणारी व्यक्ती (दिनांक 26) पासून गायब असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने हुपरी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. तक्रारीला अनुसरून तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर संशयित आरोपी म्हणून दोन व्यक्तीना एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग) कोल्हापूर यांनी ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी कसून चौकशी केली. संशयित आरोपींकडून सखोल माहिती उपलब्ध होताच आम्ही सदर व्यक्तीचा खून करून कर्नाटकातील कोगनोळी येथे असणाऱ्या गावाच्या पूर्वेकडील ओड्यात टाकला असल्याची कबुली दिली होती.
जालन्यातील प्रतिष्ठीत उद्योजक राजेश सोनी यांच्यावर पिस्टल रोखून दिवसा ढवळ्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शोधण्यात जालना पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला जेरबंद केलं असून, त्यांच्याकडून 2 गावठी पिस्टल एक पाच जिवंत काडतुस, चाकू आणि कार जप्त केलीय. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या आरोपींनी दोन कोटीच्या खंडणीसाठी या उद्योजकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. 23 फेब्रुवारी रोजी शहराजवळील दत्ता आश्रम भागात राजेश सोनी यांच्यावर पिस्टल रोखून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता,यावेळी प्रसंगासावधानता बाळगून त्यांनी आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली होती, या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे पूजा चव्हाणची आजी आणि भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांना नोटीस बजावण्यात आलेली. शांता राठोड व तृप्ती देसाई वानवडी पोलीस स्टेशनला आल्या होत्या. शासकीय कामात अडथळा आणला म्हणूण पोलिसांनी दिली नोटीस.
आज दिवसभरात अकोला जिल्हाभरात कोरोनाचे 473 नवे रूग्ण आढळलेत. आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या. दिवसभरात एका रूग्णाचा मृत्यू. आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या पोचली 367 वर. सध्या 3476 रूग्णांवर उपचार सुरू.
अनाथ, निराश्रीत, बेघर किंवा अजुन काही कारणाने पीडित असलेल्या मुलांना संस्थांमध्ये ठेवण्याऐवजी कुटुंबात ठेवावं यासाठी महिला व बालविकास विभागाकडून बाल संगोपन योजना राबविण्यात येते. सध्या अशी 17,000 (सतरा हजार) बालकं, मुलं कुटुंबात आहेत. यावर स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी लक्ष ठेवतात. संगोपन करणाऱ्या पालकांना प्रती बालक दरमहा 425 रु अनुदान देण्यात येते ते वाढवून 1,100 करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर याची अमंलबजावणी करणार्या ज्या संस्था आहेत त्यांना प्रती बालक 75 वरुन 125 रु अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी आता 14 कोटी 57 लाख 40 हजार अतिरिक्त निधी लागणार आहे. याआधी 9 कोटी खर्च होता तो आता 24 कोटी 45 लाख झाला आहे.
मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसेच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ यांच्यासोबत बैठक सुरू आहे
बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक, भाजपच्या देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. बीडमध्ये भाजप विरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला, जोडे मारून बंजारा समाजाने भाजपचा निषेध व्यक्त केलाय.

यावेळी संजय राठोड यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप एकही आरोप सिद्ध झाला नसताना, त्यांना विरोधीपक्षातील नेते आरोपी म्हणत आहेत. यामुळं संबंध बंजारा समाजाच्या भावना दुखावत आहेत. त्यामुळं जोपर्यंत त्यांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणू नये. अशी मागणी बंजारा समाजातील तरुणांनी केलीय.
मराठा आरक्षणाच्या बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फिरवली पाठ. राज्य सरकारने आज दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली होती. याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने मंत्री रविशंकर प्रसाद सहभागी होणार होते.
रायगड जिल्ह्यातील पाली आणि महड येथील मंदिर बंद राहणार ...

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वर मंदिर आणि वरदविनायक मंदिर बंद ठेवण्यात येणार...

अष्टविनायकांपैकी दोन असलेल्या पाली आणि महड येथील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार...

२ मार्च रोजी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय ...
संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली.
पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याबाहेर तृप्ती देसाई यांचा ठिय्या. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जाणार नाही, पोलीस ठाण्याच्या गेटवर आम्ही बसणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
राठोडांनंतर मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात?,

मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु ,

पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मंत्रीपद मिळणार की मुंबईला?

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर अतिरिक्त मंत्रीपदाचा भार,
दुस-या मंत्र्यावर दिला जाण्याचीही शक्यता ,

मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांची मंत्री पदासाठी तयारी सुरु

राठोड यांच्या राजीनाम्याआधीच विविध नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु
केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या इंधन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असल्याने केंद्र शासनाच्या या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर मधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा यांच्या हत्येप्रकरणी आता रेखा जरे यांच्या मुलाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने 5 मार्च रोजी सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 30 नोव्हेंबर रोजी रेखा हजारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे हे अद्यापही फरार आहेत.
पुणे - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी तिची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करणार,

- शिवाय पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार,

- फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार,

- तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार
नागपुरात वाईन शॉप, देशी दारू दुकानं, बियर शॉपी आज बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू राहील,

काल वीकएंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी एबीपी माझाने नागपुरात चहा बंद मात्र दारू सुरू अशी बातमी लावली होती. महापौरांनी ही दारू अत्यावश्यक सेवा कशी राहू शकते असे विचारत मनपा प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सुधारित आदेश काढून दारू विक्री आज बंद राहणार असे जाहीर केले आहे
वीज वितरण कंपनीच्या विरोधात संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार....

संगमनेर अहमदनगर मार्गावर रास्तारोको आंदोलन...

वीज पुरवठा खंडीत करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयासाठी शेतकरी रस्त्यावर.....

वाढीव विजबिले रद्द करावीत मागणी करत आंदोलन...

वीज बील न भरण्याचा शेतकऱ्यांचा इशारा....

राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता,


या महापालिकांवर नियुक्त केलेल्या प्रशासकांना 30 एप्रिल पर्यंत मिळणार मुदतवाढ,

त्यामुळे या महापालिका निवडणूक कोरोना मुळे पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता,

आज कॅबिनेट मध्ये प्रशासकांना 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव,

नवी मुंबई,औरंगाबाद,कल्याण डोंबिवली,कोल्हापूर,वसई विरार महापालिका यांच्या निवडणूक पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता
सिंधुदुर्ग :

दोडामार्गमधील तिलारी घाट ब्लॉक
,
तिलारी घाटात विचित्र अवस्थेत अडकला ट्रक
,
सुदैवाने मोठा अपघात टळला
,
तिलारी घाटात वाहतूक खोळंबली
,
दोडामार्गमधून बेळगावला जाणारी तिलारी घाटातून वाहतूक खोळंबली
सिंधुदुर्ग :

दोडामार्गमधील तिलारी घाट ब्लॉक
,
तिलारी घाटात विचित्र अवस्थेत अडकला ट्रक
,
सुदैवाने मोठा अपघात टळला
,
तिलारी घाटात वाहतूक खोळंबली
,
दोडामार्गमधून बेळगावला जाणारी तिलारी घाटातून वाहतूक खोळंबली
डॉ. नानासो शिंदे यांचे अपहरण,

इंडिका कार जळालेल्या अवस्थेत सापडली, साताऱ्यातील पानवन येथील घटना,

बँके निवडणुकीच्या अनुषंगाने अपहरण झाल्याचा संशय,

पत्नीची म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार ,

अज्ञातावर रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल ,

अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील म्हसवडमध्ये दाखल ,

डॉक्टरांची अर्धवट जळालेल्या गाडीमुळे घातपात झाला की काय अशी चर्चा परिसरात सुरू

70 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या, कल्याण पश्चिमेकडील धक्कादायक घटना
,अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला
अनेक वर्षांपासून रखडलेली सरळ सेवा भरती आजपासून सुरू होत आहे. आरोग्य विभागातल्या 56 पदासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा होतेय. सकाळी नऊ वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया करत असताना एकाच उमेदवारांनी अनेक पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु अशा उमेदवाराला ज्या वेळेला प्रवेश पत्र मिळाली त्यावरून बराच गोंधळ झाला होता. आज सकाळी नऊ वाजता ज्या वेळेला हे उमेदवार परीक्षा केंद्रावर ती आले तिथे त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेत. सॅनिटायझर आणिऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी ची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु बातमी कोकणातून येत आहे. दापोली इथल्या वराडकर सेंटर मध्ये आज सकाळी विदर्भ आणि मराठवाड्यात ऊन आलेल्या 650 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती परंतु अद्यापही हे केंद्र बंद असल्यामुळे परीक्षार्थ्यांनी तिथे गोंधळ सुरू केला आहे
सातारा : पाणी आणायला गेलेली मुलगी कॕनॉलमध्ये बुडाली
, साताऱ्यातील धामणेर येथील रात्रीची घटना
,
दहा वर्षाची परिणीती काळे कॕनोलमध्ये बुडाली
,

मुलीचा शोध घेणे सुरू

कोल्हापुरातील हॉटेलमध्ये जेवणात पाल आढळून आल्याने ग्राहकांचा संताप ,

कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरातील हॉटेलमधील प्रकार,

जेवणात पाल असल्याचे हॉटेल प्रशासनाला दाखविताच हॉटेलच्या बाऊंसरकडून तरुणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप ,

हॉटेलमधील वेटर्सनी देखील ग्राहकांना केली मारहाण केल्याची माहिती, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल,

मारहाणीत कॉलेज तरुण जखमी, सीपीआर रुग्णालयात दाखल
वर्धा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर जिल्हा बंदी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलाय
रायगड : माणगाव शहरातील स्वस्तिक कॉम्प्लेक्स मधील गाड्यांमध्ये वापरलेल्या ऑईल चा साठा करणाऱ्या एका दुकानाला शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानात ऑईलचा साठा असल्यामुळे अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका उडत राहिल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच अग्नीशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. जवळपास साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग पूर्ण पणे आटोक्यात आली. तर, ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्यातील पाटस गावात एकाच घरातील तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भावांची नावं मुरलीधर रंधवे , विठ्ठल रंधवे आणि काशिनाथ रंधवे अशी आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणेतील डॉ. बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंधवे कुटुंबातील एक व्यक्ती पुण्याला काही कामानिमीत्त गेला होता. हा व्यक्ती पुण्यात आला असताना त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर रंधवे कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली. यानंतर सर्व रुग्णांवर उपचार सुरु झाले. 11 पैकी 8 जण बरे झाले परंतु दुर्दैवाने तिन्ही भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पहिला मृत्यू 19 तारखेला विठ्ठल रंधवे वय वर्ष 68 यांचा झाला त्यानंतर 21 तारखेला मुरली यांचा वयवर्षं 71 मृत्यू झाला.. 25 तारखेला काशिनाथ वय वर्ष 62 यांचा मृत्यू झालाय.

पार्श्वभूमी

वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती
मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणावरुन सरकारची नामुश्की झाल्यामुळे हा मोठा निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
संजय राठोड अधिवेशानपूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड प्रकरणी एक सूचक वक्तव्य केलं होतं की, मुख्यमंत्री सर्व काही पाहत आहेत. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.


 


पंतप्रधान मोदींची आज मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणर आहेत. आजची ही 74 वी 'मन की बात' असणार आहे. या द्वारे पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून आहे. याआधीच्या मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅली वेळी झालेला हिंसा पाहून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला त्याचे दु:ख मोदी यांनी व्यक्त केले होते


 


फ्लिपकार्टमधील डिलिव्हरी बॉयची करामत, कंपनीला 8 लाखाचा चुना, नवी मुंबईत अटक
नवी मुंबई : ऑनलाईन साईटवर जावून ॲार्डर दिल्यानंतर अनेकांच्या पदरी बनावट वस्तू मारल्याच्या तक्रारी या आदी अनेक वेळा घडलेल्या आहेत. मात्र फ्लिपकार्ट ॲानलाईन कंपनीच्याच गळ्यात चक्क बनावट वस्तू मारण्याचा प्रताप समोर आला आहे. महागड्या वस्तू चुकीच्या पत्त्यावर मागवून त्या प्रत्यक्ष ग्राहकांना न देता मध्येच हडप करून लाखो रूपयांचा चुना डिलिव्हरी बॉयने फ्लिपकार्ट कंपनीला लावला आहे. संघपाल मोरे असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. ऐरोली येथे राहणारा आरोपी संघपाल मोरे हा फ्लिपकार्ट कंपणीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करत होता. आपल्या मित्रांना घेवून तो बनावट पत्त्यावर महागडे मोबाईल, लॅपटॉप, टॅब, घड्याळे, ट्रॅव्हल्स बॅग आदी सामान मागवत असे. प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्यासाठी सामान घेवून गेल्यानंतर दिलेला मोबाईल नंबर स्विचॲाफ करून ठेवत होते. तीन वेळा जावूनही ग्राहक मिळाले नाही असे दाखवून मागवलेल्या वस्तू तीन आरोपी काढून घेत असत. यानंतर पार्सलमध्ये साबन , कांदा बटाटा भरून ते पार्सल कमीत जमा केले जात होते. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर केलेल्या तपासात आरोपींनी बनावट पत्ता देवून 8 लाख 24 हजारांच्या महागड्या वस्तू लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डिलिव्हरी बाॅय बरोबर इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.