Breaking News LIVE :मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Breaking News LIVE Updates, 8 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
मुंबईत सामान्यांसाठी लोकल 15 ऑगस्टपासून सुरू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनाची दहशत उलथून टाकावी लागणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सोलापूर शहरात निर्बंधांमध्ये कोणताही दिलासा नाही. शहराचा पॉझिटीव्हीटी रेट जवळपास 1 टक्के असताना देखील निर्बंध 'जैसे थे' आहे.राज्य शासनाकडून परवानगी मिळाली नसल्याने वेगळा निर्णय नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरातील निर्बंध कमी होतील असे शुक्रवारी आश्वासन दिले होते .मात्र अद्याप तरी सोलापूर शहरातील नागरिकांना कोणताही दिलासा नाही
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता श्रावणातील प्रत्येक रविवारी रात्री 8 ते मंगळवार पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवर फक्त नित्यसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना परवानगी राहणार आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणा म्हणजेच फेरीला बंदी घालण्यात आली आहे. यात्रेकरूंना हॉटेल, लॉजिंगमध्ये मुक्कामास बंदी आहे. एकीकडे श्रावण महिन्यात मंदिर उघडा अशी मागणी पुरोहित संघाकडून जोर धरु लागली असतांनाच दुसरीकडे प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे
अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अचलपूर येथील शिवसेना शहर प्रमुख पवन बुंदिले यांच्यावर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला शेतीच्या व्यवहारातून झाल्याचे समजते..यावेळी परतवाडा शहरातील पस्तीस चाळीस युवकांनी त्यांना घेरले आणि काही क्षणातच हल्ला चढविला. हल्ल्यात पवन राम समोर बुंदिले, योगेश योगेश जडीये, वीरेंद्र सिंगर आणि नितीन चंदेले गंभीर जखमी झाले. जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.
गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सांगोल्यात दाखल, भाजपचे कोल्हापूर नेते धनंजय महाडिक देखील पोहोचले
पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथील संदीप सुतार यांचे कुटुंबीय सुदैवाने बचावले. दहा दिवसांपूर्वी आईचे निधन झाल्याने कुटुंबीय घरात होते. एक वर्षाच्या मुलीसमवेत सुमारे 17 कुटुंबीय बचावले. घराच्या भिंतीलगतच दरड कोसळली, पण घर वाचले. घराजवळ कोसळलेल्या दरडीतून सहा ते सात गावकऱ्यांची सुटका करण्यात आली.
हार्बर लाईन ठप्प, कुर्ला आणि टिळक नगर स्टेशन दरम्यान मोठा बिघाड, ओव्हर हेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्रफ अडकला, त्यामुळे वडाळा ते मानखुर्द पर्यंत वाहतूक केली बंद, सध्या केवळ मानखुर्द ते पनवेल वाहतूक आहे सुरू,
रत्नागिरी : वीजबिल वसुलीत अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात आता बिलांची थकबाकी वाढली आहे. जिल्ह्यातील 1 लाख 57 हजार 275 ग्राहकांकडे तब्बल 60 कोटी 13 लाखांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी ग्राहक हे घरगुती वीज वापरणारे आहेत. दरम्यान, कडक लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विज बील वसुली झाली झाली होती. पण, सध्या मात्र जिल्ह्यात नेमकं उलटं चित्र दिसत आहे.
पंढरपूर : शेकापचे जेष्ठ नेते कै. भाई गणपतराव देशमुख यांचे आज दहाव्या दिवशी चंद्रभागेच्या पात्रात धार्मिक विधी करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. आज सकाळी गणपतरावांच्या पत्नी रतनबाई, मुलगा पोपटराव, चंद्रकांत, मुलगी शोभाताई पाटील, नातू डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत हे विधी पार पडले. यानंतर मोठा मुलगा पोपटराव याने हा अस्थी कलश चंद्रभागेच्या पाण्यात सोडला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील गणपतराव देशमुख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांना आपला शोक आवरता आला नाही.
कोकण रेल्वे संघटनेच्या निवडणूक निकालानंतर बॅनर फाडले, दोन संघटनांच्या वादात कणकवली रेल्वे स्थानकात तणावाचे वातावरण
नियम डावलत सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील प्रसिद्ध श्री नागनाथ मंदिर सुरूच,
दर महिन्याच्या अमावस्येला या मंदिरात होत असते मोठी गर्दी,
धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील मंदिर सुरूच,
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा पद्धतीने नियम डावलुन धार्मिक स्थळे सुरू ठेवणे धोकादायक,
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई येथे उपचारादरम्यान त्यांनी घेतला अखेरचा श्वास. मखराम पवार प्रकाश आंबेडकरांचे माजी सहकारी, बहूजन महासंघाचे होते संस्थापक. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात होते कॅबिनेट मंत्री. प्रकाश आंबेडकरांशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा राजकीय प्रवास केला. मखराम पवार यांच्या पार्थिवावर उद्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या लोहगड या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा रविवारी, 8 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आहे. त्या पोलादपूर तालुक्यातील केवनाले, साखर गाव आणि महाड तालुक्यातील तळीये , महाड मार्केट , बिरवाडी या ठिकाणी भेट देणार आहेत तसेच या ठिकाणी गॅस शेगडी , किराणा किट, साड्या वाटप, ब्लँकेट (चादरी )वाटप , कपडे वाटप करणार आहेत.
पुणे : पुण्यातील उत्तम नगर भागात एका गॅरेजमधे रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती. या आगीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री एकच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. वाहनांच्या सीट तयार करण्याचे काम या गॅरेजमधे होत होते. त्यासाठी या गॅरेजमधे असलेल्या साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली होती.
पार्श्वभूमी
MPSC उमेदारांची सुधारित यादी वादाच्या भोवर्यात, मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती
राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी नुकतीच जाहीर केलेली सुधारीत यादी वादाच्या भोवर्यात अडण्याची शक्यता आहे. या यादीला आक्षेप घेणार्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं ही यादी पुढील सुनावणीपर्यंत कार्यन्वित करू नये, असे निर्देश राज्य सरकारला देत या याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.
राज्य सरकारनं एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी 23 जुलै रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. त्यांनतर 26 जुलैला सुधारत यादी जाहिर केली. मात्र सुधारीत यादित पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं या यादीला आक्षेप घेत गौरव गणेशदास डागा आणि इतर उमेदवारांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. राजेंद्र देशमुख यांनी राज्य सरकारच्या सुधारीत यादीला जोरदार आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटातून (इडब्ल्युएस) आरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तो निर्णय पूर्वलक्षीत प्रभावानं लागू केला. तसेच भरती प्रक्रीयेत एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवांसाठी शासनानं आधी जी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली होती. त्याऐवजी शासनानं नव्यानं सुधारित यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं वगळण्यात आल्यानं अयिांत्रिकी प्रमाणेच भरती प्रकियेपासून वंचित रहाणार असल्यानं सुधारीत यादीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यावेळी राज्य सरकारच्यावतीनं अॅड. व्ही.ए.थोरात यांनी भूमीका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयानं याचिकेची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब करत तोपर्यंत या यादीला स्थगिती दिली आहे.
Rahul Gandhi Twitter Account : राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते सस्पेंन्ड, कॉंग्रेस म्हणाले...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. सहा दिवसांपूर्वी राहुल गांधीनी ट्वीट केले होते. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर राहुल गांधी इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत.
यानंतर आता कॉंग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्वीट करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे की, "राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.. . जय हिंद."
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.
ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर सुवर्ण पदक
ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -