Breaking News LIVE : भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी

Breaking News LIVE Updates, 31 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Aug 2021 04:04 PM
ओबीसी राजकीय आरक्षणचा निर्णय जो पर्यंत होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नका राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा

ओबीसी  राजकीय आरक्षणचा निर्णय जो पर्यंत होत नाही. तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नका, राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

औरंगाबाद : मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत औरंगाबादेत संघर्ष, मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करत असताना पोलिसांना घेतलं ताब्यात

औरंगाबाद : मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत औरंगाबादेत संघर्ष, मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करत असताना पोलिसांना घेतलं ताब्यात, औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर येथील प्रकार, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेत

नागपूर : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेत करण्यात आलं. वाडी नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज एक दिवस काम बंद आंदोलन केले.

पुण्यातील मावळ तालुक्यात मध्यरात्रीपासून संततधार सुरू

पुण्यातील मावळ तालुक्यात मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. गेली काही आठवडे विश्राती घेतलेल्या पावसाने अचानक हजेरी लावली पण यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. कारण तालुक्यातील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये असे निर्बंध लादले आहेत. त्यावरून ठाकरे सरकारविरोधात इतर राजकीय पक्ष असा सामना सुरू झालाय. डोंबिवलीत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली. राज्य सरकारने फक्त हिंदू सणांवर बंदी घातली, सरकारने कितीही बंधने आणली तरी भाजप हिंदू सण साजरे करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पॅरालम्पिकमध्ये भारताच्या सिंघराज अधानाला कांस्य पदक

पॅरालम्पिक स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई, 10 मीटर्स एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या सिंघराज अधाना याला कांस्य पदक. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण 8 पदकांची नोंद

मुंबई शेअर बाजाराचा पुन्हा नवा विक्रम, पहिल्यांदाच सेन्सेक्स 57 हजार अंकांच्या पार

मुंबई शेअर बाजाराचा पुन्हा नवा विक्रम, पहिल्यांदाच सेन्सेक्स 57 हजार अंकांच्या पार, शेअर बाजार सुरु होताच 148 अकांची उसळी #sharemarket



 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 27 लाख 68 हजार 880
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 59 हजार 680
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 70 हजार 640
एकूण मृत्यू : चार लाख 38 हजार 560
एकूण लसीकरण : 64 कोटी 5 लाख 28 हजार लसीचे डोस

भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 68 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 59 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 70 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. 

5 दिवसांनी 40 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद

India Coronavirus Updates : भारतात पाच दिवसांनी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडाही कमी झाला आहे. मंगळवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,941 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 36,275 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. अशातच आज मात्र दैनंदिन रुग्णवाढीत काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आज 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी 46164, गुरुवारी 44658, शुक्रवारी 46759, शनिवारी 45083 आणि सोमवारी 42909 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. 

मराठा समाज आंदोलकांचे आपल्या मागण्यांसाठी पावसात भिजत आमरण उपोषण सुरूच

मराठा समाज आंदोलकांचे आपल्या मागण्यांसाठी पावसात भिजत आमरण उपोषण सुरूच, राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 जणांच्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी आणि 10 लाखाची मदत न मिळाल्याने कालपासून आमरण उपोषण सुरू.. 

अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील हॉटेल इंपेरियाला सकाळी तीनच्या सुमारास आग

अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील हॉटेल इंपेरियाला सकाळी तीनच्या सुमारास आग,


राजापेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात 5 लोक बचावले, परंतु नागपूरचे GTPL (केबल) चे दिलीप चंद्रकांत ठक्कर (55) यांचा श्वास गुदमरून मृत्यू...


फायर ब्रिग्रेडच्या कर्मचारी यांनी ही आग आणली आटोक्यात...

कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे यांचं निधन

कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे (तात्या) यांचं निधन,


कोल्हापुरातील टोल हद्दपार करण्यात निवासराव साळोखे यांचा मोठा वाटा,


आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निवास तात्या यांचे निधन

मनसेकडून कृष्णजन्माष्टमीला मध्यरात्री 12च्या सुमारास नौपाडात दहीहंडी साजरी

मुंबई : मनसेकडून कृष्णजन्माष्टमीला मध्यरात्री 12च्या सुमारास नौपाडातील मनसे कार्यालयासमोर मानाच्या दहीहंडीचे दोन थर लावत दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी पोलिसांकडून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसेकडून दरवर्षी या परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी राज्य सरकारकडून परवानगी नसल्यानं मनसे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळत आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नौपाडातल्या मैदान परिसरात बघायला मिळत आहे. यासंदर्भात बोलतानाअभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सणांच्या मागे लागण्याऐवजी सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेकरिता हा बंदोबस्त लावावा तसेच ज्याने महिला अधिकाऱ्याची बोटं तोडली त्या व्यक्तीचे हात-पाय तोडले पाहिजेत अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना पानसे यांनी व्यक्त केली आहे. 

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदिला मोठा पूर

औरंगाबाद : औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदिला मोठा पूर आला आहे. नदिलगत आसलेल्या बालाजी मंदिराच्या पायरिला पाणी लागलं आहे. बाजूला बालाजी भगवंताचे पुजारी कुटुंब नदिकाठी घर असल्यानं त्याच्या घरात पाणी शिरलं. त्यांना रात्री 3 वाजता नागरिकांनी गच्चीचे गज तोडून सुखरूप बाहेर काढलं.

महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


कोकणात काय स्थिती असणार? 


कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. 

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; हल्ल्यात दोन बोटं तुटली

ठाण्यातल्या महिला नागरिक सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेतच. मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकारी देखील असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. याचे कारण म्हणजे आजच ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता


काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


कोकणात काय स्थिती असणार? 


कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. 


मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज? 


मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 


Corona Vaccine : 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा, आरोग्य विभागाचे आदेश 


राज्यातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे, सोबतच शिक्षक दिनापूर्वी सर्व राज्यातील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले होते.


Mumbai Local : केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा का? निर्बंधांविरोधात हायकोर्टात नवी याचिका


त्या अनुषंगाने 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील शिक्षकांचे प्राध्यानक्रमाने लसीकरण करण्याबाबत सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रत्येक गावात, शहरात आणि महापालिका हद्दीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड 19 लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.