एक्स्प्लोर

Breaking News LIVE : राज्यात आज 4797 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 130 रुग्णांचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 15 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : राज्यात आज 4797 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 130 रुग्णांचा मृत्यू

Background

आज लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान करणार संबोधन, वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर 32 खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. 

देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर सकाळी 7.18 मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचतील. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित असतील. 

राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन; कोरोना लस, कृषी, जम्मू काश्मीरसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. कोरोना महामारीचा संदर्भ देत ते म्हणाले की कोरोना साथीची तीव्रता कमी झाली आहे पण कोरोना विषाणूचा प्रभाव अजून संपलेला नाही. सर्व जोखीम घेत, कोरोनाची दुसरी लाट आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रित केली जात आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी अल्पावधीत कोरोनाची लस तयार केली, असंही राष्ट्रपतींनी म्हटलं.

सर्व देशवासियांना मी विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी आणि इतरांनाही प्रेरित करावे. यावेळी लस हे आपल्या सर्वांसाठी विज्ञानाने प्रदान केलेले सर्वोत्तम संरक्षण आहे. मी सर्व देशवासियांना विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटल. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी एका वर्षाच्या कालावधीत 23,220 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, हेआनंददायक आहे, असंही त्यांनी म्हटलं. 

राज्यात काल कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 5,787 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 86 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के आहे. 

राज्यात काल 134 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 07,59, 767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,87, 863 (13.58 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,73,812 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 512व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

आयटी कायद्यातील नव्या तरतूदींना सरसकट स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
केंद्र सरकारने जारी केलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) 2021 कायद्यातव आक्षेपार्ह कलमांना सरसकट स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला. मात्र, कलम 9 नागरिकांच्या, प्रसार माध्यमांच्या भाषा व विचार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत असल्याचं स्पष्ट करत नव्या आयटी नियमांतील नियम 9 ला मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी अंशतः स्थगिती दिली. खंडपीठानं कलम 9(1) आणि 9(1) ला स्थगिती दिली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना अशंत: अंतरिम दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यातील नव्या नियमानुसार सरकार सायबर सुरक्षेच्या नावाखाली बातमीची सखोलता, डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणाऱ्याची माहिती तपासता येणार आहे. बलात्कार किंवा अन्य मजकुरावर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या तरतुदीचा या कलमात समावेश करण्यात आला आहे. मात्र, कायद्यातील ही सुधारीत कलम डिजीटल मीडिया व ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी व मनमानीकारक असल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे तसेच 'द लिफलेट' या न्यूज पोर्टलच्यावतीनेही याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूरती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं अंतरिम दिलाश्याबाबत राखून ठेवलेला निकाल शनिवारी जाहीर केला.

19:55 PM (IST)  •  15 Aug 2021

राज्यात आज 4797 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 130 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 4797 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3710 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 130 रुग्णांचा मृत्यू

19:50 PM (IST)  •  15 Aug 2021

पुणे : पानशेत धरणात कार पाण्यात बुडाल्याने महिलेचा मृत्यू, पती, मुलगा वाचले

पुणे : पानशेत धरणात कार पाण्यात बुडाल्याने महिलेचा मृत्यू, पती, मुलगा वाचले. टायर फुटल्याने कार रस्त्यावरून स्लीप झाली. रस्त्यालगत असलेल्या पानशेत धरणाच्या पाण्यात कार पडली. यामुळे कारमधील समृद्धी योगेश देशपांडे (वय 33) या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेचा पती योगेश देशपांडे (वय 35) व त्यांचा मुलगा दोघे वाचले आहेत. देशपांडे कुटुंबातील हे तिघेजण पुण्याहूण पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते.

18:00 PM (IST)  •  15 Aug 2021

कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या

कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गंगेश्वर श्रीवास्तव असं त्याचं नाव आहे. लेबर युनियनचा तो पदाधिकारी आहे. खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये ही कारवाई केली. अटकपूर्व जामीन मिळालेला श्रीवास्तव आज वाकड पोलीस स्टेशनमध्ये हजेरीसाठी येणार होता. पण कोरोनाचे कारण पुढं करून येण्यास टाळाटाळ करत होता. मात्र पोलिसांनी कोरोनाचे पुरावे सादर करायला सांगितले अन ते नसल्याने शेवटी त्याला प्रत्यक्षात हजर रहावे लागले. 

17:10 PM (IST)  •  15 Aug 2021

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सल्ला

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारण्याचा सल्ला एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. निवडणुका आल्या की संभाजीनगरचा मुद्दा पुढे काढायची ही जुनी खेळी आहे. शहरात पाच दिवसाला एकदा पाणी येतं. विकासावर कोणी बोलत नाही असेही ते म्हणाले..

12:49 PM (IST)  •  15 Aug 2021

'उमेद नवोन्मेषा'ची मोहीम

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या 4 जवानांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई सर केलं. महाराष्ट्र पोलीस ध्वज, भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा या जवानांनी तिथं फडकावला. बार्शीचे भूषण असणारे IAS रमेश घोलप यांना आणि त्यांच्या कार्याला ही मोहिम समर्पित केली. यावेळी या जवानांनी राष्ट्रगीत गात 15 ऑगस्ट साजरा केला.  या मोहिमेत सध्या नवी मुंबई पोलिसात सेवा बजावणारे मूळचे बार्शीतील जवान सुहास झालटे, मुंबई पोलीस वैजिनाथ मार्तंडे यांच्यासह तुषार पवार आणि रवींद्र कोळपे हे जवान देखील सहभागी झाले. या मोहिमेचं नेतृत्व एलब्रूस/किलीमांजारो सर करणारे तुषार पवार यांनी केलं.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget